Assam Rifle Recruitment 2021: आसाम रायफल्समध्ये 1230 जागांवर भरती, टेक्निकल आणि ट्रेडसमन पदांवर भरती

आसाम रायफल्सनं जारी केलेल्या नोटिफिकेशननुसार उमेदवाराचं वय हे किमान 18 वर्ष पूर्ण ते 23 वर्षापर्यंत असावं. अर्ज करणाऱ्या उमदेवाराचा जन्म हा 1 ऑगस्ट 1998 ते 1 ऑगस्ट 2003 दरम्यान झालेला असावा, असं निश्चित करण्यात आलं आहे.

Assam Rifle Recruitment 2021: आसाम रायफल्समध्ये 1230 जागांवर भरती, टेक्निकल आणि ट्रेडसमन पदांवर भरती
job
Follow us
| Updated on: Sep 13, 2021 | 1:15 PM

नवी दिल्ली: सुरक्षा दल आसाम रायफल्समध्ये 1230 पदांवर भरती सुरु झाली आहे. आसाम रायफल्समधील टेक्निकल आणि ट्रेडसमन पदांसाठी नोटिफिकेशन जारी केलं आहे. आसाम रायफल्समध्ये नोकरी करण्यास इच्छुक असणारे विद्यार्थी आणि पात्र उमेदवारांनी अर्ज दाखल करण्यापूर्वी अधिकृत नोटिफिकेशन वाचण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. अधिकृत नोटिफिकेशन आसाम रायफल्सच्या वेबसाईटवर वाचायला मिळेल.

पात्रता

आसाम रायफल्समधील टेक्निकल आणि ट्रेडसमन पदासाठी अर्ज करणारे उमेदवारांची शिक्षण दहावी, बारावी आणि पदवी असं पदनिहाय असणं आवश्यक आहे. शैक्षणिक पात्रतेविषयी अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट देऊन नोटिफिकेशन पाहावं.

वयोमर्यादा

आसाम रायफल्सनं जारी केलेल्या नोटिफिकेशननुसार उमेदवाराचं वय हे किमान 18 वर्ष पूर्ण ते 23 वर्षापर्यंत असावं. अर्ज करणाऱ्या उमदेवाराचा जन्म हा 1 ऑगस्ट 1998 ते 1 ऑगस्ट 2003 दरम्यान झालेला असावा, असं निश्चित करण्यात आलं आहे.

अर्ज करण्याचा अंतिम दिनांक

पात्र उमेदवार आसाम रायफल्सच्या अधिकृत वेबसाईटवर 25 सप्टेंबरपर्यंत अर्ज सादर करु शकतात.

अर्ज कसा सादर करावा?

  1. प्रथम आसाम रायफल्सच्या वेबसाईट assamrifles.gov.in वर भेट द्या
  2. वेबसाईटवरील ऑनलाईन अ‌ॅप्लिकेशन या लिकंवर क्लिक करा
  3. आता तुमच्यासमोर नवीन विंडो ओपन होईल
  4. अर्जातील संपूर्ण माहिती आणि इतर तपशील भरा
  5. पुढील माहितीसाठी अर्जाची प्रिटंआऊट सोबत ठेवा

एमपीएससीचं पुढील वर्षाचं वेळापत्रक नोव्हेंबरमध्ये जाहीर होणार

महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं एमपीएससीतर्फे घेतल्या जाणाऱ्या परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना दिलासा देणारा निर्णय जाहीर केला आहे. राज्यसेवा मुख्य परीक्षा 2020 आणि महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षेचं वेळापत्रक पुढील आठवड्यात प्रसिद्ध करण्यात येणार आहे. राज्य सेवा पूर्व परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला होता. तर, महाराष्ट्र लोकसेवा आयोग यंदा 2022 मध्ये घेतल्या जाणाऱ्या परीक्षांचं अंदाजित वेळापत्रक एक महिना अगोदर जाहीर करणार आहे. आयोगाकडून वेळापत्रक साधारणपणे डिसेंबरमध्ये जाहीर केलं जातं.

नोव्हेंबरमध्ये येणार वेळापत्रक

महाराष्ट्र लोकसेवा आयोगन 2022 मध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या परीक्षांच अंदाजित वेळापत्रक नोव्हेंबरमध्ये प्रसिद्ध करणार आहे. दरवर्षी डिसेंबर महिन्यात आयोगाकडून पुढील वर्षाच अंदाजित वेळापत्रक जाहीर केलं जातं, मात्र यंदा नोव्हेंबरमध्येच वेळापत्रक जाहीर होत असल्यानं विद्यार्थ्यांना परीक्षांचा अंदाज येणार आहे.

राज्य सेवा पूर्व परीक्षा 2020 चा निकाल जाहीर

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे घेण्यात आलेल्या राज्य सेवा पूर्व परीक्षेचा निकाल गेल्या आठवड्यात जाहीर करण्यात आला आहे. कोरोना विषाणू संसर्ग आणि आरक्षणाच्या मुद्यामुळं परीक्षा लांबणीवर पडली होती. कोरोनाचं कारण देत आयोगानं परीक्षा लांबणीवर टाकल्यानंतर विद्यार्थ्यांनी पुण्यासह राज्यभरात चक्काजाम आंदोलन केल्यानंतर परीक्षा 21 मार्चला सकाळी 10 ते दुपारी 12 व दुपारी 3 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत अशा दोन सत्रात ही परीक्षा झाली होती. राज्यसेवा पूर्व परीक्षेचा निकाल अखेर जाहीर झाला आहे. 200 पदांसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं गट अ वर्गाची परीक्षा घेतली होती.

इतर बातम्या:

राज्य सेवेच्या नियुक्त्या द्या, आयोगासमोर आत्मदहन करु, MPSC ला विद्यार्थ्यांचा 10 सप्टेंबरचा अल्टिमेटम

MPSC तर्फे संयुक्त पूर्व परीक्षेसंदर्भात महत्वाची अपडेट; परीक्षा ‘या’ तारखेला होणार, ॲडमिट कार्ड जारी

तयारी लागा..! राज्यसेवा पूर्व परीक्षा 2020 चा निकाल MPSC कडून जाहीर, विद्यार्थ्यांना आता मुख्य परीक्षेची उत्सुकता

Assam Rifle Recruitment 2021 for 1230 technical and tradesmen post check details at here

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.