CISF Recruitment 2022 : सीआयएसएफमध्ये खेळाडूंसाठी 249 पदांवर मोठी भरती, 81 हजारांपर्यंत पगाराची संधी

केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलामध्ये  नोकरी करण्याची खेळाडूंसाठी ही सुवर्णसंधी आहे. सीआयएसएफकडून जारी करण्यात आलेल्या नोटिफिकेशननुसार 249 जागांवर पात्र उमेदवार अर्ज दाखल करु शकतात. 

CISF Recruitment 2022 : सीआयएसएफमध्ये खेळाडूंसाठी 249 पदांवर मोठी भरती, 81 हजारांपर्यंत पगाराची संधी
job alertImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Mar 22, 2022 | 1:23 PM

नवी दिल्ली : केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल (CISF) या केंद्रीय निमलष्करी दलाच्यावतीनं स्पोर्टस कोट्याअंतर्गत (Sports Quota) हेड कॉन्स्टेबल पदासाठी अर्ज मागवले आहेत. सीआयसएसफनं पात्र आणि इच्छुक उमेदवारांना सीआयसएसएफच्या अधिकृत वेबसाईटवर अर्ज दाखल करण्यास सांगितले आहेत. इच्छुक उमदेवार cisf.gov.in या वेबसाईटला भेट देऊन ऑनलाईन अर्ज (Online Application) सादर करु शकतात. तर, खेळाडू कोट्यातील पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 31 मार्च निश्चित करण्यात आली आहे. तर, उत्तर विभागातील उमेदवार 7 एप्रिल 2022 पर्यंत अर्ज सादरकरु शकतात. 249 पदांसाठी अर्ज मागवले जात आहेत. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल यांच्याकडील खेळाडू कोट्यातील जागांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदावांनी वेबसाईटवरील अटी व नियम वाचून घेणं आवश्यक आहे. त्यानंतर अर्ज दाखल करावेत, असं आवाहन करण्यात आलं आहे.

पात्रता

सीआयएसफमधून स्पोर्टस कोट्यातून अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांनी राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील क्रीडा स्पर्धेत सहभाग घेतलेला असणं आवश्यक आहे. याशिवाय त्यानं सरकारनं मान्यता दिलेल्या शिक्षण संस्थेनं 12 वी उत्तीर्ण असलं पाहिजे. तर, हेड कॉन्स्टेबल या पदासाठी निवड झालेल्या उमदेवाराला वेतनश्रेणी 4 प्रमाण 25500 ते 81100 रुपये वेतन मिळणार आहे.

वयोमर्यादा

सीआयएसएफ हेड कॉन्स्टेबल भरती 2022 साठी अर्ज करणाऱ्या उमदेवारांचं वय 1 ऑगस्ट 2021 रोजी 18 ते 23 वर्षांदरम्यान असणं आवश्यक आहे. उमेदवारांचा जन्म 2 ऑगस्ट1998 ते 1 ऑगस्ट 2003 च्या दरम्यान असणं आवश्यक आहे. जारी करण्यात आलेल्या नोटिफिकेशननुसार उमेदवारांना भरती प्रक्रियेदरम्यान रोल नंबर, प्रवेशपत्र दिलं जाईल. त्यानंतर विद्यार्थ्यांची शारीरीक क्षमता चाचणी घेतली जाईल. त्यानंतर कागदपत्र तपाणी केली जाईल. त्यानंतर वैद्यकीय परीक्षेसाठी प्रवेशपत्र जारी केली जातील.

खेळाडूंसाठी चांगली संधी

केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलामध्ये  नोकरी करण्याची खेळाडूंसाठी ही सुवर्णसंधी आहे. सीआयएसएफकडून जारी करण्यात आलेल्या नोटिफिकेशननुसार 249 जागांवर पात्र उमेदवार अर्ज दाखल करु शकतात.

इतर बातम्या:

Banana आता फळपिक, ‘मनरेगा’ मधूनही करता येणार लागवड, शेतकऱ्यांना नेमका फायदा काय?

“तो मी नव्हेच! ‘आप’ल्याला ह्यात ओढू नका”, Aap ची उमेदवार यादी जाहीर, अभिनेता Sandeep Pathak ची प्रतिक्रिया…

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.