DRDO Jobs: एक लाखापेक्षा जास्त पगार, DRDO मध्ये बंपर भरती!

वास्तविक, डिफेन्स रिसर्च टेक्निकल केडर अंतर्गत (डीआरटीसी) विविध पदांच्या भरती प्रक्रियेसाठी डीआरडीओने अधिसूचना जारी केली आहे.

DRDO Jobs: एक लाखापेक्षा जास्त पगार, DRDO मध्ये बंपर भरती!
DRDO Recruitment
Follow us
| Updated on: Aug 26, 2022 | 8:38 AM

देशाची संरक्षण उत्पादने तयार करण्याची जबाबदारी संरक्षण संशोधन व विकास संस्थेकडे (DRDO) आहे. याच कारणामुळे जेव्हा जेव्हा देशातील सर्वात प्रतिष्ठित संस्थांचा विचार केला जातो, तेव्हा तेव्हा डीआरडीओचे नाव सर्वात वर येते. अशा परिस्थितीत या संस्थेसाठी काम करणे ही अभिमानाची बाब आहे. तुम्हालाही या संस्थेत काम करायचं असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. वास्तविक, डिफेन्स रिसर्च टेक्निकल केडर (Technical Cader) अंतर्गत (डीआरटीसी) विविध पदांच्या भरती प्रक्रियेसाठी डीआरडीओने अधिसूचना जारी केली आहे. डीआरडीओमध्ये वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक (बी) (एसटीए-बी) आणि टेक्निशियन-ए (टेक-ए) या पदांसह एकूण १९०१ डीआरडीओ सीसेप्टम-१० रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. या पदांच्या भरतीसाठी नोंदणी प्रक्रिया 3 सप्टेंबरपासून सुरू होणार असून ती 23 सप्टेंबरपर्यंत चालणार आहे. उमेदवार डीआरडीओ drdo.gov.in अधिकृत वेबसाइटवर (Official Website) जाऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात. भरती प्रक्रिया, पात्रता आणि निवड चाचणीबद्दल अधिक माहितीसाठी, उमेदवार अधिकृत अधिसूचना तपासू शकतात. डीआरडीओ भरती सविस्तर सूचना लिंक

डीआरडीओ भरतीसाठी पात्रता निकष काय आहेत?

  • वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक-ब : एसटीए-बी पदासाठी अर्ज करण्यास पात्र होण्यासाठी उमेदवाराकडे विज्ञान विषयातील पदवी किंवा अभियांत्रिकी, तंत्रज्ञान, संगणक विज्ञान व संबंधित विषयातील पदविका असणे आवश्यक आहे.
  • टेक्निशियन ए : उमेदवार दहावी पास किंवा त्याच्या समकक्ष शिक्षण घेतलेला असावा. याशिवाय त्याच्याकडे मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे (आयटीआय) प्रमाणपत्र असावे.

अर्ज कसा करावा?

  • डी.आर.डी.ओ.साठी अर्ज करण्यासाठी, www.drdo.gov.in त्याच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
  • CEPTM Recruitment Link वर क्लिक करा.
  • स्वत:ची नोंदणी करा.
  • आवश्यक ती सर्व माहिती भरून अर्ज भरा.
  • शेवटी सर्व माहिती तपासून सबमिट करा.
  • अॅप्लिकेशन फॉर्म डाऊनलोड करून त्याची प्रिंट काढून घ्या.

काय आहे निवड प्रक्रिया?

निवड प्रक्रिया बहुस्तरीय प्रक्रियेद्वारे केली जाईल, ज्यामध्ये उमेदवारांना शॉर्ट लिस्ट केले जाईल आणि सीबीटी मोडमध्ये परीक्षेसाठी बोलावले जाईल. उमेदवारांची अंतिम गुणवत्ता यादी CEPTAM कडून तयार करण्यात येणार असून, ती लॅब, आस्थापनेमधील संबंधित नियुक्ती अधिकाऱ्यांना देणार आहे. यानंतर उमेदवारांना नियुक्तीपत्रे दिली जाणार आहेत. कागदपत्र पडताळणीसारख्या सर्व आवश्यक नियुक्तीपूर्व औपचारिकता पूर्ण झाल्यानंतर उमेदवारांना या कामासाठी त्यांची पदे दिली जातील.

पगार किती असेल?

सीनियर टेक्निकल असिस्टंट-बी पदासाठी निवड झालेल्यांना सातव्या केंद्रीय वेतन आयोगाच्या (सीपीसी) पे मॅट्रिक्स आणि इतर लाभांनुसार ३५,४०० ते १,१२,४०० रुपये वेतन मिळेल. टेक्निशियन-ए पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना सातव्या वेतन आयोगांतर्गत मासिक वेतन व इतर लागू होणारे लाभ म्हणून १९,९०० ते ६३,२०० रुपये दिले जाणार आहेत.

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.