Government Job | सरकारी नोकरी शोधताय? ‘इएसआयसी’त विविध पदांसाठी अर्ज प्रक्रिया, जाणून घ्या स्टेप्स
‘इएसआयसी’ म्हणजेच कर्मचारी राज्य विमा महामंडळ (ESIC)तर्फे काढण्यात आलेल्या पदभरतीमध्ये अप्पर डिव्हिजन क्लर्क (UDC), लघुलेखक (स्टेनो) आणि मल्टी टास्किंग स्टाफ (MTS) या पदांचा समावेश आहे. लवकरच याची अर्ज प्रक्रिया सुरु होणार आहे.
नवी दिल्ली : शासकीय सेवांच्या शोधात असलेल्या दहावी, बारावी आणि पदवीधर उमेदवारांसाठी कर्मचारी राज्य विमा महामंडळ (ESIC) तर्फे मोठ्या संख्येने रिक्त जागांसाठी पदभरती करण्यात आली आहे. या रिक्त पदासाठी अर्ज प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे. ज्या उमेदवारांना या पदांसाठी अर्ज करायचा आहे ते अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अर्ज करू शकतात. अप्पर डिव्हिजन क्लर्क (UDC), स्टेनोग्राफर आणि मल्टी टास्किंग स्टाफ (MTS) या पदांचा यात समावेश आहे. एकूण 3847 पदांवर ही भरती होणार आहे. ‘इएसआयसी’ हे भारत सरकारच्या कामगार आणि रोजगार मंत्रालयाअंतर्गत येते. जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, अर्जाची प्रक्रिया 15 जानेवारीपासून सुरू होईल. यासाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज केले जातील.
असा करा अर्ज
अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम अधिकृत वेबसाइटला भेट देऊन त्यावर स्वतःची नोंदणी करा. त्यानंतर अर्ज भरा. तुमचा अर्ज सत्यापित करण्यास विसरू नका आणि नंतर ‘सेव्ह’ आणि ‘नेक्स्ट’ बटण दाबा. यानंतर, अर्ज शुल्क भरुन कागदपत्र स्कॅन करा आणि अपलोड करा.
रिक्त जागांचा तपशील
एकूण 3847 पदांसाठी ही भरती केली जाईल. अप्पर डिव्हिजन क्लर्क (UDC) साठी 1726 पदांची भरती होणार आहे. स्टेनोग्राफर पदासाठी 163 जागा भरण्यात येणार आहेत. याशिवाय मल्टी टास्किंग स्टाफच्या पदासाठी 1931 जागा निश्चित करण्यात आल्या आहेत. वेबसाइटला भेट देऊन उमेदवार रिक्त जागांचा तपशील तपासू शकतात. ही भरती देशातील विविध राज्यांमध्ये केली जाईल, ज्याची संपूर्ण माहिती अधिसूचनेमध्ये देण्यात आली आहे.
पात्रता आणि वयोमर्यादा
‘इएसआयसी’तर्फे जाहीर केलेल्या अधिसूचनेनुसार, उच्च विभाग लिपिक पदांसाठी अर्ज करणार्या उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेतून पदवीधर असणे आवश्यक आहे. यासोबतच अर्जदाराला संगणकाचे ज्ञान असावे. दुसरीकडे, लघुलेखक पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी बारावी उत्तीर्ण तसेच हिंदी आणि इंग्रजी भाषेत टंकलेखन केलेले असावे. याशिवाय, एमटीएस पदासाठी अर्ज करणारे उमेदवार दहावी उत्तीर्ण असावेत.
संबंधित बातम्या :
एसबीआयच्या ‘सीबीओ’ भरतीचे प्रवेशपत्र घेतले का ? असे करा डाउनलोड…
मार्कशीट, डिग्रीचा कागद जपून ठेवायची चिंता कायमची संपली? होय, खरंच!