Government Job : भारतीय नौदलाकडून 1159 पदांवर भरती, असं करा अप्लाय

सैन्यात सरकारी नोकरी शोधत असलेल्या तरुणांसाठी ही एक खास संधी आहे. 1159 पदांवर ही भरती होणार आहे.

Government Job : भारतीय नौदलाकडून 1159 पदांवर भरती, असं करा अप्लाय
भारतीय नौदल
Follow us
| Updated on: Feb 16, 2021 | 10:01 AM

नवी दिल्ली : भारतीय नौदलाकडून (Indian NAVY) ट्रेड्समॅनच्या पदांवर जागा रिक्त (Tradesman Vacancy) करण्यात आल्याची माहिती आहे. सैन्यात सरकारी नोकरी शोधत असलेल्या तरुणांसाठी ही एक खास संधी आहे. 1159 पदांवर ही भरती होणार आहे. यासाठी 22 फेब्रुवारी 2021 पासून अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. अर्ज करण्यासाठी, तुम्ही joinindiannavy.gov.in या अधिकृत वेबसाईटवर भेट देऊ शकता. (government job in indian navy as tradesman know how to apply)

भारतीय नौदलात दरवर्षी लाखो विद्यार्थी नोकरीसाठी प्रयत्न करत असतात. यावेळी पूर्व नौदलच्या 710, पश्चिम नौदल कमांडच्या 324 आणि दक्षिणी नौदल कमांडच्या 125 पदांवर भरती होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. यामध्ये अर्ज करण्यासाठी 7 मार्च 2021 ही अंतिम तारीख निश्चित करण्यात आली आहे.

काय आहे अर्ज करण्यासाठी फी?

सामान्य श्रेणी उमेदवारांना या पदांवर अर्ज करण्यासाठी 250, ओबीसी उमेदवारांना 250 भरावे लागणार आहेत. तर ईडब्ल्यूएस, एससी एसटी आणि महिला उमेदवारांना अर्ज मोफत असणार आहे. सगळ्यात महत्त्वाची माहिती म्हणजे तुम्ही इंटरनेट बँकिंगच्या मदतीनेही अर्जाची फी देऊ शकता.

कोण करू शकेल अर्ज ?

भारतीय नौदलाच्या ट्रेडमॅन पदाची नोकरी मिळवण्यासाठी हायस्कूल पास प्रमाणपत्र आणि मान्यताप्राप्त संस्थेचं आयआयटी प्रमाणपत्र असणं महत्त्वाचं आहे. यासाठी उमेदवारांचं किमान वय 18 वर्षे आणि कमाल वय 25 वर्षे निश्चित करण्यात आलं आहे.

निवड प्रक्रिया

लेखी परीक्षेच्या आधारे उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे. ही परीक्षा एकूण 100 गुणांसाठी असेल. जनरल इंटेलिजेंसमध्ये 25 गुण, न्यूमेरिकल एप्टीट्यूडमध्ये 25 गुण, इंग्रजीमध्ये 25 आणि जनजागृतीत 25 गुण असतील. यामध्ये शॉर्टलिस्टेड उमेदवारांना इंटरव्ह्यूसाठी बोलावलं जाईल. (government job in indian navy as tradesman know how to apply)

संबंधित बातम्या – 

IB मध्ये अधिकाऱ्यांच्या प्रवेशासाठी अ‍ॅडमिट कार्ड जारी, 1.42 लाखांपर्यंत पगार

Government Job: JPSC नं 252 पदांसाठी काढली भरती; आजच अर्ज करा

Air Force Group C Recruitment 2021: हवाई दलात 255 पदांसाठी भरती; अर्ज करा अन् मिळवा नोकरी

(government job in indian navy as tradesman know how to apply)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.