AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Government Jobs: सरकारी नोकरी…अजून काय हवं! 8 वी ते 10 वी पास उमेदवारांसाठी सरकारी नोकरी

Government Jobs: या पदांसाठी ऑनलाईन अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 ऑगस्ट आहे त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करावा.

Government Jobs: सरकारी नोकरी...अजून काय हवं! 8 वी ते 10 वी पास उमेदवारांसाठी सरकारी नोकरी
LIC HFL Recruitment Image Credit source: Social Media
| Updated on: Jul 26, 2022 | 11:16 AM
Share

Government Jobs: सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या 8 वी ते 10 वी पास उमेदवारांसाठी सुवर्णसंधी आहे. मद्रास उच्च न्यायालयाने (MHC) 1,400 हून अधिक रिक्त जागांची भरती सुरु केलीये. या रिक्त पदांतर्गत परीक्षक, वाचक, ज्येष्ठ बेलिफसह अनेक पदांवर भरती करण्यात येणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार या अधिकृत संकेतस्थळावर https://www.mhc.tn.gov.in/ भेट देऊन या पदांसाठी ऑनलाईन अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 ऑगस्ट आहे त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करावा.

व्हेकन्सी डिटेल्स

  1. परीक्षक – 118 पदे
  2.  वाचक – 39 पदे
  3. सीनियर बेलिफ – 302 पदे
  4. ज्युनिअर बेलिफ – 574 पदे
  5. प्रोसेस सर्व्हर – 41 पदे
  6. प्रक्रिया लेखक – 3 पदे
  7. झेरॉक्स ऑपरेटर – 267 पदे
  8. लिफ्ट ऑपरेटर – 9 पदे
  9. ड्राइवर – 59 पदे

सॅलरी

एक्झामिनर, रीडर, ड्रायव्हर आणि सिनिअर विश्वास या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना सुरुवातीला दरमहा 32 हजार रुपये पगार दिला जाणार आहे. त्याचबरोबर इतर पदांचे वेतन पदानुसार निश्चित करण्यात आले असून, वेतनश्रेणीनुसार 19 हजार ते 69 हजार 900 रुपये, 16 हजार  ते 600 हजार 800 रुपये आणि 15 हजार 900 ते 58 हजार 500 रुपये देण्यात येणार आहेत.

आवश्यक पात्रता

  • परीक्षक, वाचक, चालक आणि वरिष्ठ बेलिफ – या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डातून दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
  • ज्युनिअर बेलिफ, प्रोसेस सर्व्हर, प्रोसेस रायटर, झेरॉक्स ऑपरेटर आणि लिफ्ट ऑपरेटर – या पदांसाठी अर्ज करणारा उमेदवार किमान इयत्ता 8 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. याशिवाय उमेदवारास विहित क्षेत्रात काम करण्याचा अनुभवही असावा.

वयोमर्यादा

  • एससी आणि एसटी उमेदवारांसाठी – 18 वर्षे ते 37 वर्षे
  • अतिरिक्त मागासवर्ग, विमुक्त समाज व मागास प्रवर्गासाठी – 18 वर्षे ते 34 वर्षे
  • अनारक्षित प्रवर्गासाठी – 18 वर्षे ते 32 वर्षे

अर्ज शुल्क

  • सर्वसाधारण, ओबीसी व इतर प्रवर्गातील उमेदवारांसाठी – 550 रुपये
  • एससी आणि एसटी प्रवर्गातील उमेदवारांसाठी – अर्ज शुल्क नाही

निवड प्रक्रिया

या पदांसाठी उमेदवारांची निवड लेखी परीक्षेच्या आधारे केली जाणार आहे.

अर्ज असा करा

  • उमेदवारांनी प्रथम या अधिकृत संकेतस्थळाला mhc.tn.gov.in भेट द्यावी.
  • यानंतर अर्ज करण्यासाठी आणि अर्ज भरण्यासाठी नियुक्त केलेल्या पोस्टवर क्लिक करा.
  • आता आपले फोटो, सही आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
  • त्यानंतर शेवटी अर्ज शुल्क भरून सबमिट बटणावर क्लिक करा.
  • अर्जाची प्रिंट काढून भविष्यासाठी ती तुमच्याकडेच ठेवा.
त्यांच्यासोबत जाणं परवडणारं नाही! मलिकांबाबत शिरसाट यांचं मोठं विधान
त्यांच्यासोबत जाणं परवडणारं नाही! मलिकांबाबत शिरसाट यांचं मोठं विधान.
सुप्रिया सुळेंकडून मुख्यमंत्र्यांचे तोंडभरून कौतुक! म्हणाल्या...
सुप्रिया सुळेंकडून मुख्यमंत्र्यांचे तोंडभरून कौतुक! म्हणाल्या....
नाना पटोलेंचा भाजपवर सत्तेतून आमदार विकत घेतल्याचा आरोप
नाना पटोलेंचा भाजपवर सत्तेतून आमदार विकत घेतल्याचा आरोप.
हिंगोलीत कॉंग्रेसला खिंडार! प्रज्ञा सातव यांचा भाजपात प्रवेश
हिंगोलीत कॉंग्रेसला खिंडार! प्रज्ञा सातव यांचा भाजपात प्रवेश.
नागपूर सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी!
नागपूर सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी!.
ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा
ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा.
दोन मंत्री गेले, हा काळिमा! राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप
दोन मंत्री गेले, हा काळिमा! राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप.
त्यांना पुन्हा मंत्री करणं सोपं नाही! संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले
त्यांना पुन्हा मंत्री करणं सोपं नाही! संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले.
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!.
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!.