Govt.Jobs : पदवीधारकांना सरकारी नोकरीची सुवर्णसंधी !
कामगार आणि रोजगार मंत्रालयात तरुण व्यावसायिकांची भरती सुरवातीला दोन वर्षांसाठी असणार आहे. पुढे ती ५ वर्षांपर्यंत वाढवली जाऊ शकते. नोटिफिकेशन नुसार तरुण व्यावसायिकांच्या एकूण ११२ रिक्त जागा आहेत.
नवी दिल्ली : केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्रालयाने नॅशनल करिअर सर्व्हिस ( National Career Service) अंतर्गत तरुण व्यावसायिकांची भरती सुरु केली आहे. संबंधित क्षेत्रातील अनुभव असलेले पदवीधर (Degree Holder) किंवा पदव्युत्तर पदवीधर अर्ज करू शकतात. कामगार (Worker) आणि रोजगार मंत्रालयात तरुण व्यावसायिकांची भरती सुरवातीला दोन वर्षांसाठी असणार आहे. पुढे ती 5 वर्षांपर्यंत वाढवली जाऊ शकते. नोटिफिकेशन नुसार तरुण व्यावसायिकांच्या एकूण 112 रिक्त जागा आहेत. या जागेसाठी ऑनलाईन अर्ज करायचा आहे. या अर्जासाठी तुम्ही त्यांच्या www.ncs.gov.in या अधिकृत वेबसाईटवर भेट देऊ शकता.
कामगार आणि रोजगार मंत्रालयाच्या तरुण व्यावसायिकांच्या 2022 च्या या भरती प्रक्रियेसाठी अर्जदाराकडे बीए (BA), बीई (BE), बीटेक (BTech) ,बीएड (BEd) यापैकी कोणतीही एक पदवी आणि चार वर्षांचा अनुभव असावा.
पदव्युत्तर पदवी एमबीए, अर्थशास्त्र, मानसशास्त्र, समाजशास्त्र, ऑपरेशन रिसर्च, स्टॅटिक्स, सोशल वर्क, मॅनेजमेंट, फायनान्स, कॉमर्स इत्यादी मध्ये असावी. सोबतच 2 वर्षाचा अनुभवही आवश्यक आहे. पदवी असो किंवा पदव्युत्तर पदवी किमान 50 टक्के गुणांसह उत्तीर्ण होणं आवश्यक.
वयाची अट
तरुण व्यावसायिक पदासाठी अर्जदाराचे वय किमान 24 वर्षे आणि कमाल 40 वर्षे असावे.
पगार
तरुण व्यावसायिक पदावर भरती झाल्यानंतर दरमहा 50,000 रुपये पगार मिळेल
इतर बातम्या :