Thane : खुशखबर ! ठाणे महापालिका तब्बल 880 पदं भरणार ! रोस्टरचे काम सुरु, प्रस्तावाला अखेर मंजुरी

वाढलेल्या लोकसंख्येमुळे आणि प्रशासनातील अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे नागरिकांना सोयीसुविधा पुरवण्यात अडचणी येत होत्या. महापालिकेत वाढीव पदांची भरती करण्यात यावी यासाठी प्रशासनाने राज्य शासनाला प्रस्ताव पाठवला होता.

Thane : खुशखबर ! ठाणे महापालिका तब्बल 880 पदं भरणार ! रोस्टरचे काम सुरु, प्रस्तावाला अखेर मंजुरी
ठाणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने 'राष्ट्रीय जंतनाशक मोहिमेचे आयोजन'Image Credit source: Facebook
Follow us
| Updated on: Apr 12, 2022 | 1:36 PM

ठाणे : ठाणे (Thane) शहराची लोकसंख्या 2012 च्या जनगणनेनुसार 18.41 लाख इतकी आहे. आता अंदाजे ठाण्याची लोकसंख्या (Population) 24 लाखांवर गेलीये. वाढलेल्या लोकसंख्येमुळे आणि प्रशासनातील अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे नागरिकांना (Citizens) सोयीसुविधा पुरवण्यात अडचणी येत होत्या. महापालिकेत वाढीव पदांची भरती करण्यात यावी यासाठी प्रशासनाने राज्य शासनाला प्रस्ताव पाठवला होता. या प्रस्तावाला अखेर मंजुरी मिळालीये. वाढती लोकसंख्या आणि महापालिकेचा पसारा लक्षात घेऊन राज्य शासनाने पालिकेच्या वाढीव आकृतिबंधाला मंजुरी दिलीये. या मंजुरीमुळे विविध खात्यांमधील एकूण 880 पदे भरणं शक्य होणार आहे परिणामी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची संख्या वाढेल. नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी यासाठी पुढाकार घेतला होता. याबाबतचा शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आलाय.

कर्मचाऱ्यांची संख्या 11 हजारांवर जाऊन पोहचेल

स्मार्ट सिटीकडे वाटचाल करत असलेली ठाणे महापालिका आता वाढीव आकृतिबंधाच्या मंजुरीनंतर सक्षमतेने काम करू शकते. कर्मचाऱ्यांची संख्या 11 हजारांवर जाऊन पोहचेल या सगळ्यामुळे शहराच्या विकासकामाला चालना मिळेल त्याचबरोबर रखडलेले प्रकल्प पूर्ण होतील.

रोस्टरचे काम सुरु

ठाणे महापालिकेत सध्या अधिकारी आणि कर्मचारी मिळून संख्या 9 हजार 980 इतकी आहे. आता 880 पदांची भर पडेल आणि यंत्रणा सक्षम होईल. भरतीप्रक्रिया व्यवस्थित पार पडावी यासाठी रोस्टरचे काम सुरु करण्यात आलंय. रोस्टरमुळे भरती व्यवस्थित पार पडेल असा विश्वास वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्यक्त केलाय. मालमत्ता व कर, रस्ते, समाज कल्याण, पाणीपुरवठा, शहर विकास असे अनेक विभाग महापालिकेत आहेत.

ठाणेकरांना सक्षम सोयीसुविधा मिळाव्यात यासाठी वाढीव आकृतिबंधाच्या प्रस्तावाला मंजुरी मिळणं गरजेचं होतं.

इतर बातम्या :

NCP’s mission | राष्ट्रवादी काँग्रेसचं मिशन विदर्भ! पश्चिम विदर्भात शरद पवार घेणार शिबिर, जयंत पाटलांची माहिती

‘तुझ्या माझ्या संसाराला..’मध्ये रेवाच्या एण्ट्रीमुळे सिड-अदितीमध्ये रंगणार चुरस

मुंबईत उष्णतेची लाट, वाढत्या उन्हाचा माशे विक्रेत्यांना फटका; शासनाकडे मदतीची मागणी

महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?.
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य.
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप.
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली.
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला.
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट.
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?.
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.