KDMC : केडीएमसीत असिस्टंट नर्स पदांसाठी भरती! थेट मुलाखत होणार, अप्लाय कसं करायचं? जाणून घ्या
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत सहाय्यक परिचारीका प्रसविका पदासाठी थेट मुलाखतीव्दारे भरती केली जाणार आहे. यासाठी महापालिकेच्या संकेतस्थळावर जाहिरात प्रसिध्द करण्यात आली आहे. त्यावर आवश्यक पात्रता, वयाची मर्यादा व भरती प्रक्रियेची संपूर्ण माहिती देण्यात आली आहे.
कल्याण डोंबिवली महानगरपालिककडून (KDMC) सहाय्यक परिचारीका (Assistant Nurse) प्रसविका पदांच्या 34 जागांसाठी भरती (KDMC Recruitment) प्रक्रिया राबविण्यात येत आहे. थेट मुलाखतीव्दारे भरती केली जाणार आहे. या भरतीसाठी महापालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर भरती प्रक्रियेचा तपशिल देण्यात आला आहे. या पदासाठी 11 व 12 एप्रिल रोजी मुलाखत घेण्यात येणार आहे. त्यानंतर मुलाखतीत पात्रता, अनुभव, वय व गुणवत्तेच्या आधारावर आलेल्या उमेदवारांमधून योग्य उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे. निवड झालेल्या उमेदवारांना 18 हजार रुपये मासिक वेतन राहणार आहे. भरतीसाठी इच्छूक उमेदवारांनी महानगरपालिकेच्या संकेतस्थळाला भेट देउन पदाशी संबंधित पात्रतेची संपूर्ण माहिती घेता येणार आहे.
- परीक्षा नाही थेट मुलाखत – सहाय्यक परिचारीका प्रसविका पदाच्या 34 जागांसाठी ही भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. परंतु यासाठी कुठलीही लेखी परीक्षा घेण्यात येणार नसून केवळ मुलाखतींच्या माध्यमातून आलेल्या उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे. त्यामुळे उमेदवारांमध्ये नोकरी मिळवण्यासाठी चुरस बघायला मिळण्याची शक्यता आहे. उमेदवारांची पात्रता, वय व कामातील गुणवत्ता बघून निवड करण्यात येणार आहे.
- अप्लाय करण्यासाठी नेमकी पात्रका काय हवी? 1) दहावी उत्तीर्ण आवश्यक. 2) एएनएम अभ्यासक्रम पूर्ण झालेला असावा. 3) उमेदवार अनुभवी असणे आवश्यक.
- आवश्यक कागपत्रे – भरतीसाठी अर्ज, दहावी, बारावी, शाळा सोडल्याचा दाखला, जातीचा दाखला, ओळखपत्र, पासपोर्ट आकाराचे फोटो.
- मुलाखत कुठे होणार? मुलाखतीसाठी महानगरपालिकेकडून उमेदवारांना पत्ता देण्यात आला आहे, तो पुढील प्रमाणे : कॉन्फरन्स हॉल, आचार्य अंत्रे रंगमंदिर, कै. शंकरराव झुंझारराव संकुल सुभाष मैदान परिसर, शंकरराव चौक, कल्याण (पश्चिम), जि. ठाणे
वाचा संबंधित बातम्या :
तरुण उद्योजकांना सुवर्णसंधी… कामगार मंत्रालयाकडून 112 जागांसाठी भरती
यंदा नोकरीच्या प्रचंड संधी! PhonePay कर्मचाऱ्यांची संख्या दुप्पट करणार, 2800 जणांना रोजगार मिळणार
10वी पास असणाऱ्यांसाठी रेल्वे मध्ये बंपर भरती ! परीक्षा न देताच मिळणार नोकरी