NIACL Recruitment 2021: न्यू इंडिया अॅश्युरन्स कंपनीमध्ये 300 पदांवर भरती, अर्ज करण्यासाठी वाचा सविस्तर

न्यू इंडिया अॅश्युरन्स कंपनी लिमिटेडद्वारे प्रशासकीय अधिकारी पदासाठी भरतीसाठी नोटिफिकेशन जारी करण्यात आली आहे. नोटिफिकेशननुसार एकूण 300 पदांवर भरती होणार आहे.

NIACL Recruitment 2021: न्यू इंडिया अॅश्युरन्स कंपनीमध्ये 300 पदांवर भरती, अर्ज करण्यासाठी वाचा सविस्तर
NIACL Recruitment 2021
Follow us
| Updated on: Aug 24, 2021 | 3:17 PM

नवी दिल्ली: न्यू इंडिया अॅश्युरन्स कंपनी लिमिटेडद्वारे प्रशासकीय अधिकारी पदासाठी भरतीसाठी नोटिफिकेशन जारी करण्यात आली आहे. नोटिफिकेशननुसार एकूण 300 पदांवर भरती होणार आहे. सरकारी नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांसाठी संधी आहे. न्यू इंडिया अॅश्युरन्स कंपनी लिमिटेडमध्ये अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाईट newindia.co.in वर भेट द्यावी लागेल.

न्यू इंडिया अॅश्युरन्स कंपनी लिमिटेडने जारी केलेल्या नोटिफिकेशननुसार, अर्ज सादर करण्याची प्रक्रिया 1 सप्टेंबर 2021 पासून सुरू होईल. अर्ज दाखल करण्यासाठी 21 सप्टेंबरपर्यंत वेळ दिला जाईल. अर्जाचं शुल्क 21 सप्टेंबर रोजीचं जमा करावं लागेल. दोन टप्प्यात परीक्षा आयोजित केली जाईल. त्यानंतर उमेदवारांची निवड केली जाईल.मात्र, परीक्षेची तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही.

रिक्त पदाचा तपशील

या पदांसाठी अर्ज प्रक्रिया 1 सप्टेंबरपासून सुरू होईल. भरती प्रक्रियेंतर्गत एकूण 300 पदांची भरती केली जाणार आहे. यामध्ये खुल्या प्रवर्गासाठी 104 जागा निश्चित करण्यात आल्या आहेत. ओबीसीसाठी 81 जागा, आर्थिकदृष्ट्या दुर्बल म्हणजेच ईडब्ल्यूएससाठी 30 जागा, एससीसाठी 46 जागा, एसटीसाठी 22 जागा आणि दिव्यांग उमेदवारांसाठी 17 जागा निश्चित करण्यात आल्या आहेत.

पात्रता

उमेदवारांकडे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी किंवा पदव्युत्तर पदवी असणं आवश्यक आहे. अर्जदार 60% गुणांसह पदवीधर असावेत. इतर पात्रता तपशीलांसाठी, आपण अधिकृत अधिसूचना पाहू शकता.

वयोमर्यादा

न्यू इंडिया अॅश्युरन्स कंपनी लिमिटेडमधील प्रशासकीय अधिकारी पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचं वय 21 वर्षांपेक्षा जास्त आणि 30 वर्षांपेक्षा कमी असणं आवश्यक आहे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादेत सूट असेल. 1 एप्रिल 2021 रोजी वय मोजले जाईल.

अर्जाचं शुल्क

न्यू इंडिया अॅश्युरन्स कंपनी लिमिटेडमधील प्रशासकीय अधिकारी पदासाठी खुल्या आणि ओबीसी आणि ईडब्ल्यूएस उमेदवारांसाठी अर्जाचं शुल्क 600 रुपये निश्चित करण्यात आले आहे.एससी, एसटी आणि दिव्यांग उमेदवारांना अर्ज शुल्क म्हणून 100 रुपये जमा करावे लागतील. डेबिट किंवा क्रेडिट कार्ड आणि नेट बँकिंगद्वारे ऑनलाईन पद्धतीने फी भरता येईल.

इतर बातम्या:

ISRO LPSC Recruitment 2021: इस्त्रो एलपीएससीमध्ये विविध पदांवर भरती, अर्ज कुठे करायचा?

SBI SCO Recruitment 2021: स्टेट बँकेत नोकरी मिळण्याची संधी, स्पेशालिस्ट केडर ऑफिसर पदासाठी भरती

Niacl recruitment 2021 vacancy for administrative officer post in new india assurance company ltd

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.