AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

TET Exam 2021 | टीईटीची तारीख पुन्हा बदलली; आता ‘या’ तारखेला होणार परीक्षा

देगलूर-बिलोली विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक असल्याने परीक्षेची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. आता 21 नोव्हेंबर 2021 रोजी टीईटी परीक्षा घेण्यात येणार आहे.

TET Exam 2021 | टीईटीची तारीख पुन्हा बदलली; आता 'या' तारखेला होणार परीक्षा
आता 21 नोव्हेंबरला टीईटी परीक्षा होणार
| Edited By: | Updated on: Oct 21, 2021 | 9:45 PM
Share

मुंबई : शिक्षकांच्या पात्रतेसाठी घेण्यात येणारी टीईटी परीक्षेची तारीख पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आली आहे. आतापर्यंत तीन वेळा परीक्षेची तारीख बदलण्यात आली आहे. राज्यात 30 ऑक्टोबर 2021 रोजी शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) घेण्यात येणार होती. मात्र 30 ऑक्टोबर रोजी देगलूर-बिलोली विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक असल्याने परीक्षेची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. आता 21 नोव्हेंबर 2021 रोजी टीईटी परीक्षा घेण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने सुधारित वेळापत्रक जाहीर केले आहे. (Now the TET exam will be held on November 21; Date postponed)

देगलूर-बिलोली मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीमुळे तारीख बदलली

याआधी 10 ऑक्टोबर रोजी टीईटी परीक्षा नियोजित होती. मात्र त्या दिवशी केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा असल्याने परीक्षेच्या तारखेत बदल करुन 31 ऑक्टोबर रोजी परीक्षा घेण्याचे ठरले. मात्र या दिवशी देगलूर-बिलोली मतदारसंघाची पोटनिवडणूक असल्याने परीक्षेची तारीख पुन्हा बदलली असून आता 21 नोव्हेंबर रोजी परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. मात्र उमेदवारांमध्ये यामुळे नाराजीचे वातावरण आहे. टीईटी परीक्षेला राज्यातून 3 लाख 30 हजार 642 उमेदवार बसणार आहेत. यासाठी 5 हजार परीक्षा केंद्राचे नियोजन महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने केले आहे. राज्यभरात होणारी ही परीक्षा आता 21 नोव्हेंबर रोजी घेण्यात येणार असल्याचे सुधारीत वेळापत्रक संकेतस्थळावर जारी करण्यात आले आहे.

राज्य सेवा परीक्षेसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ

महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021 ची जाहिरात प्रसिद्ध केली होती. राज्य सेवा परीक्षा 2021 अंतर्गत 390 पदांसाठी प्रक्रिया सुरु आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं अर्ज दाखल करण्यासाठी 25 ऑक्टोबरपर्यंत मुदत दिली होती.एमपीएससीकडून अर्ज दाखल करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. उमेदवार आता राज्य सेवा पूर्व परीक्षेसाठी 31 ऑक्टोबरपर्यंत अर्ज दाखल करु शकतात. 390 पदांसाठी 2 जानेवारी 2022 ला एमपीएससीकडून राज्य सेवा पूर्व परीक्षा आयोजित केली जाईल. अर्ज दाखल करण्यास मुदतवाढ मिळाल्यानं विद्यार्थ्यांनी आनंद व्यक्त केला आहे.

एमपीएससीकडून नवं परिपत्रक

आज एमपीएससीनं नवीन परिपत्रक काढत अर्ज दाखल करण्यास मुदतवाढ दिल्याचं जाहीर केलं आहे. राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021 करीता अर्ज सादर करण्यास दिनांक 31 ऑक्टोबर 2021 रोजी 23:59 वाजेपर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे. एकूण 20 संवर्गातील 390 पदांची जाहिरात आली आहे. विद्यार्थ्यांना विहित मुदतीत अर्ज दाखल करण्याचं आवाहन करण्यात आलंय. (Now the TET exam will be held on November 21; Date postponed)

इतर बातम्या

पेपल 45 अब्ज डॉलर्समध्ये Pinterest खरेदी करणार

सप्टेंबरच्या तिमाहीत आर्थिक वाढ 7.7 टक्के असणार; ICRA म्हणते…

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.