Oil India Limited Recruitment 2021: ऑईल इंडियामध्ये 535 पदांसाठी भरती, 47 हजारांपर्यंत पगाराची संधी

ऑईल इंडिया लिमिटेड आसाममधील डिब्रूगढ, तिनसुकिया, शिवसागर आणि चराईडो आणि अरुणाचल प्रदेशातील चांगलांग जिल्ह्यांमधील उत्पादन आणि शोध क्षेत्रासाठी ग्रेड III पदांच्या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज आमंत्रित करण्यात आले आहेत.

Oil India Limited Recruitment 2021: ऑईल इंडियामध्ये 535 पदांसाठी भरती, 47 हजारांपर्यंत पगाराची संधी
oil india recruitment
Follow us
| Updated on: Sep 09, 2021 | 10:44 AM

Oil India Limited Recruitment 2021 नवी दिल्ली: ऑईल इंडिया लिमिटेडमध्ये ग्रेड III च्या पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू आहे. ऑईल इंडिया लिमिटेड आसाममधील डिब्रूगढ, तिनसुकिया, शिवसागर आणि चराईडो आणि अरुणाचल प्रदेशातील चांगलांग जिल्ह्यांमधील उत्पादन आणि शोध क्षेत्रासाठी ग्रेड III पदांच्या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज आमंत्रित करण्यात आले आहेत. अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 23 सप्टेंबर 2021 आहे. ऑईल इंडिया लिमिटेडने जारी केलेल्या नोटिफिकेशन नुसार एकूण 535 पदांवर भरती आयोजित करण्यात आली आहे. ऑईल इंडिया लिमिटेडनं त्यांच्या अधिकृत वेबसाईट oil-india.com वर याबाबत सविस्तर माहिती देणारे नोटिफिकेशन प्रसिद्ध केलं आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार ऑइल इंडिया लिमिटेडच्या वेबसाईटवर जाऊन अर्ज दाखल करु शकतात. पात्र उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी संपूर्ण नोटिफिकेशन वाचून घेणे आवश्यक आहे.

अर्ज प्रक्रिया

ऑईल इंडिया लिमिटेडमध्ये विविध पदांवर भरती प्रक्रिया सुरू आहे. या पदांसाठी अर्ज करण्यास सुरुवात झाली आहे तर अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 23 सप्टेंबर 2021 असा आहे. वेबसाईटवर अर्ज दाखल करताना उमेदवारांनी काळजीपुर्वक अर्ज दाखल करणे आवश्यक आहे. अन्यथा उमेदवाराचा अर्ज बाद होऊ शकतो.

अर्ज दाखल कसा करायचा

स्टेप 1: उमेदवारांनी प्रथम ऑईल इंडियाच्या ऑफिशिअल वेबसाईट oil-india.com ला भेट द्यावी. स्टेप 2: ग्रेड III पदासाठी भरती या लिंक वर क्लिक करा. स्टेप 3: यानंतर नवीन वेब पेज ओपन होईल आवश्यक ती माहिती भरुन वेबसाईटवर नोंदणी प्रक्रिया पूर्ण करा स्टेप 4: यानंतर तुम्ही ईमेल आयडी आणि पासवर्ड टाकून ओटीपी मिळवा. स्टेप 5: यानंतर ओटीपी मिळवल्यानंतर रजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण होईल. स्टेप 6: संपूर्ण अर्ज भरून आवश्यक ती कागदपत्रे अपलोड करा. स्टेप 7: शेवटी परीक्षा शुल्क ऑनलाइन पद्धतीने भरा आणि भविष्यातील माहितीसाठी ऑनलाइन अर्जाची प्रिंट आउट काढून सोबत ठेवा.

पदांचा तपशील

इलेक्ट्रीशियन – 38, फिटर – 144, मेकॅनिक मोटर वाहन – 42, मशीनिस्ट ट्रेड – 13 , मेकॅनिक डिझेल ट्रेड – 97, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक ट्रेड – 40 , बॉयलर अटेंडंट – 08,टर्नर ट्रेड – 04, ड्राफ्ट्समन सिव्हिल ट्रेड – 08, इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक व्यापार – 81, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित सह – 44, सर्वेक्षक व्यापार – 05, वेल्डर व्यापार – 06, IT आणि ESM / ICTSM / IT व्यापार – 05

वयोमर्यादा:

ऑईल इंडियामध्ये अर्ज करणाऱ्या खुल्या प्रवर्गातील उमेदवारांचं वय किमान 18 वर्षे आणि जास्तीत जास्त 30 वर्षे या दरम्यान असावं. एससी आणि एसटी प्रवर्गातील उमदेवाराचं वय किमान 18 वर्षे आणि कमाल 35 वर्षे असावं तर नॉन -क्रीमी लेयरची अट पूर्ण करणाऱ्या ओबीसी प्रवर्गातील उमेदवाराचं वय किमान 18 वर्षे आणि कमाल 33 वर्षे असावं. निवड झालेल्या उमेदवारांना 27700 ते 44770 रुपये या दरम्यान वेतन दिलं जाईल.

शैक्षणिक पात्रता

ऑईल इंडिया मधील या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी शासकीय मान्यताप्राप्त मंडळाकडून दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. याशिवाय सरकारी मान्यताप्राप्त संस्थेकडून संबंधित व्यापारातील आयटीआय / व्यापार प्रमाणपत्र अभ्यासक्रम उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. अर्ज प्राप्त झाल्यानंतर ऑईल इंडियाकडून लेखी परीक्षा आयोजित केली जाणार आहे. त्यानंतर मुलाखतीचं आयोजन केलं जाणार आहे.

अर्ज फी

खुल्या प्रवर्गातील उमदेवारांसाठी 200 रुपये शुल्क निश्चित करण्यात आलं आहे.परीक्षा शुल्क ऑनलाईन पद्धतीनं सादर करावं लागणार आहे. एससी, एसटी, इडब्ल्यूएस आणि दिव्यांग उमेदवारांसाठी कोणतेही शुल्क निश्चित करण्यात आलेलं नाही.

इतर बातम्या:

शरद पवार-मुख्यमंत्र्यांच्या भेटीकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष, 5 मुद्द्यांवर चर्चा अपेक्षित!

गब्बरच्या आयुष्यातलं वादळ शमेना, पहिल्यांदा घटस्फोट आता BCCI कडून शिखर धवनला मोठा झटका

Oil India Recruitment 2021 for grade iii 535 post check details here

Non Stop LIVE Update
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले..
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले...
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी.
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल.
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप.
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार.
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ.
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार.
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.