Railway Recruitment 2022 : एक वर्षाचं प्रशिक्षण ! ‘आग का दरिया है, डूब कर जाना है’, 8वी, 10वी उत्तीर्ण ITI उमेदवारांसाठी सुवर्णसंधी
या अंतर्गत 8वी, 10वी उत्तीर्ण ITI कोर्स करणाऱ्या उमेदवारांना रेल्वेकडून एक वर्षासाठी प्रशिक्षण दिले जाईल. निवड झालेल्या उमेदवारांना स्टायपेंड देखील मिळेल.
नवी दिल्ली : रेल्वे भरती सेल, RRCने पूर्व रेल्वेमध्ये शिकाऊ पदाच्या भरतीसाठी अर्ज (Application) मागवले आहेत. या पदांसाठी 11 एप्रिल 2022 पासून RRCCR, rrcer.com या अधिकृत वेबसाईटला (Website) भेट देऊन अर्ज केले जाऊ शकतात. अर्ज करण्याची अंतिम तारीख 10 मे 2022 असेल याची नोंद घ्यावी. रेल्वेकडून दरवर्षी तरुणांना इंटर्नशिपच्या (Internship) माध्यमातून रोजगाराची संधी दिली जाते. यावर्षी देखील 2,792 शिकाऊ पदांवर भरती घेण्यात आली आहे. या अंतर्गत 8वी, 10वी उत्तीर्ण ITI कोर्स करणाऱ्या उमेदवारांना रेल्वेकडून एक वर्षासाठी प्रशिक्षण दिले जाईल. निवड झालेल्या उमेदवारांना स्टायपेंड देखील मिळेल.
प्रशिक्षण कालावधी पूर्ण केल्यानंतर उमेदवारांना येणाऱ्या गट डी भरतीमध्ये 20 टक्के आरक्षण देखील दिलं जाणार आहे. सध्याच्या RRB गट डी भरतीमध्ये देखील शिकाऊ प्रशिक्षणार्थी उमेदवारांना शारीरिक कार्यक्षमतेच्या परीक्षेसाठी सूट देण्यात आली आहे.
2792 पदांचं खालीलप्रमाणे वर्गीकरण
हावडा विभागात – 659
आसनसोल विभागात – 412
लिलुआ विभागात – 612
कांचरापारा विभागात – 187
मालदा विभागात – 138
सियालदह विभागात – 297
कांचरापारा विभागात 187
मालदा विभागात – 138
जमालपूर विभागात – 667
शैक्षणिक पात्रता :
10वी उत्तीर्ण सोबतच या जागांवर ITI प्रमाणपत्रधारक देखील अर्ज करू शकतात. या पदांसाठी किमान वय 15 आणि कमाल वय 24 असावं