PNB India : हुर्रय्ये ! पंजाब नॅशनल बँकेत 145 जागांसाठी भरती, परीक्षा घेतली जाणार, उद्यापासून अर्जप्रक्रिया सुरु
पंजाब नॅशनल बँकेने स्पेशालिस्ट ऑफिसर पदांसाठी बंपर भरती सुरु केली आहे. बँकेत नोकरी करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी ही सुवर्णसंधी आहे. एकूण 145 पदांसाठी ही भरती प्रक्रिया सुरु करण्यात आलीये. या पदांसाठीची अर्ज प्रक्रिया उद्या म्हणजेच 22 एप्रिलला सुरु होणार आहे.
नवी दिल्ली : पंजाब नॅशनल बँकेने (Punjab National Bank) स्पेशालिस्ट ऑफिसर पदांसाठी बंपर भरती (Recruitment) सुरु केली आहे. बँकेत नोकरी (Bank Jobs) करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी ही सुवर्णसंधी आहे. एकूण 145 पदांसाठी ही भरती प्रक्रिया सुरु करण्यात आलीये. या पदांसाठीची अर्ज प्रक्रिया उद्या म्हणजेच 22 एप्रिलला सुरु होणार आहे आणि अर्जाची शेवटची तारीख 7 मे 2022 आहे. योग्य उमेदवारांची निवड परीक्षेद्वारे होणार आहे. परीक्षा 12 जून 2022 रोजी होणार आहे. या नोकरीसाठी ऑनलाईन अर्ज करायचा आहे. अधिक माहितीसाठी पंजाब नॅशनल बँकेच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या. वयाची अट, शैक्षणिक पात्रता पदांनुसार वेगवेगळी आहे आणि वयाच्या अटीत मागासवर्गीय प्रवर्गाला नियमानुसार सूट देण्यात आलेली आहे.
अर्ज कसा करावा
- अर्ज करण्यासाठी पंजाब नॅशनल बँकेच्या pnbindia.in अधिकृत वेबसाईटला जायचं
- वेबसाईटच्या होम पेजवर रिक्रूटमेंट्स / करियर वर क्लिक करा
- यामध्ये तज्ञ अधिकारांच्या 145 पदांसाठीच्या भरतीच्या लिंकवर क्लिक करा
- अर्ज सुरु झाले कि तिथे ऑनलाईन अर्ज भरता येतील
- अर्ज भरण्यापूर्वी नोंदणी करावी लागते
- नोंदणी केली कि तुम्ही अर्ज भरू शकता
पदांचं नाव आणि उपलब्ध जागा
एकूण जागा 145
मॅनेजर (रिस्क) – 40
मॅनेजर (क्रेडिट) – 100
सिनिअर मॅनेजर (ट्रेझरी) – 05
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव
एमबीए इन फायनान्स किंवा पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन फायनान्स असलेले उमेदवार पीएनबीमध्ये मॅनेजर पदांसाठी अर्ज करण्यास पात्र आहेत. भरती अधिसूचनेतील तपशीलवार शैक्षणिक पात्रता पहा. व्यवस्थापक पदांसाठी १ वर्षाचा अनुभव आणि वरिष्ठ व्यवस्थापक पदांसाठी किमान 3 वर्षांचा अनुभव असलेले उमेदवार अर्ज करू शकतात.
महत्त्वाचे
नोकरीचं ठिकाण – संपूर्ण भारत
निवड करण्याची पद्धत – ऑनलाईन परीक्षा, मुलाखत
ऑनलाईन परीक्षा – 12 जून 2022
अर्ज करायची शेवटची तारीख – 7 मे 2022
अधिकृत वेबसाईट – pnbindia.in
Notification – Click Here
टीप : अधिकृत माहितीसाठी कृपया पंजाब नॅशनल बँकेच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.
इतर बातम्या :