महावितरण विभागामध्ये मेगा भरती, ना परीक्षेचे टेन्शन ना मुलाखतीचे, थेट होणार उमेदवाराची निवड
दहावी पास असणाऱ्यांसाठी मोठी संधी आहे. विशेष म्हणजे थेट मेगा भरती सुरू आहे. इच्छुकांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी ही मोठी संधीच म्हणावी लागणार आहे. थेट महावितरण विभागामध्ये ही भरती प्रक्रिया सुरू आहे.

मुंबई : दहावी पास आहात आणि नोकरीच्या शोधात असाल तर ही मोठी संधी तुमच्यासाठी चालून आलीये. विशेष म्हणजे कोणत्याही परीक्षेशिवाय तुम्हाला नोकरी मिळणार आहे. मोठी बंपर भरती सुरू झालीये. या भरती प्रक्रियेबद्दलची अधिसूचना ही नुकताच प्रसिद्ध करण्यात आलीये. ही भरती प्रक्रिया महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेडकडून राबवली जातंय. दहावी पास आणि आयटीआय झालेल्या उमेदवारांसाठी ही सुवर्णसंधीच आहे. ही भरती प्रक्रिया शिकाऊ उमेदवारांसाठी पार पडत आहे. इच्छुकांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी फटाफट अर्ज करावीत.
महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेडने भरती प्रक्रियेबद्दलची अधिसूचना प्रसिद्ध केलीये. ही भरती प्रक्रिया तब्बल 80 जागांसाठी होत आहे. या भरती प्रक्रियेची सर्वात खास बाब म्हणजे कोणत्याही प्रकारची परीक्षा आणि मुलाखत न घेता उमेदवाराची निवड केली जाणार आहे. खरोखरच ही इच्छुकांसाठी मोठी संधीच म्हणावी लागणार आहे.
ही भरती महावितरणच्या हिंगोली केंद्राकडून सुरू आहे. उमेदवारांना या भरती प्रक्रियेसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज हे करावे लागणार आहेत. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 11 जानेवारी 2024 आहे. उमेदवारांना त्यापूर्वीच अर्ज करावे लागणार आहेत. उशीरा आलेले अर्ज हे ग्राह्य धरले जाणार नाहीत.
या भरती प्रक्रियेत वीजतंत्री विभाग एकून जागा 40 आणि तारतंत्री विभाग एकून जागा 40 याप्रमाणे भरल्या जाणार आहेत. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आयटीआय उत्तीर्णचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. नोकरीचे ठिकाणे हे हिंगोली असेल. ऑनलाइन अर्जानंतर उमेदवारांच्या कागदपत्रांची प्रत्यक्षात छाननी केली जाईल.
ऑनलाइन पद्धतीने अर्ज केल्यानंतर उमेदवारांना 15 जानेवारी 2024 रोजी विद्युत भवन मंडळ कार्यालय, हिंगोली येथे प्रत्यक्षात येऊन कागदपत्रांची छाननी करावी लागणार आहे. यासोबतच मुळ अर्ज सोबत असणेही आवश्यक आहे. खरोखरच नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी संधीच आहे. परत एकदा लक्षात ठेवा की, या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 11 जानेवारी 2024 आहे.
