Job Offers: सैनिक शाळेत वॉर्डबॉय आणि इतर अनेक पदांसाठी भरती, 19 हजार 900रुपयांपर्यंत मिळणार पगार
सैनिक शाळा भरती 2022 : सैनिक शाळेत वॉर्डबॉय आणि इतर अनेक पदांसाठी भरती,19 हजार 900 रुपयांपर्यंत वेतन मिळणार आहे. असा करा अर्ज
सैनिक स्कूल तिलैया (sainik school tilaiya recruitment) मध्ये नोकरीची संधी चालून आली आहे. वॉर्डबॉयसह इतर अनेक पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी नशीब आजमावल्यास ही नोकरी त्यांना सहज मिळू शकते. या सैनिक शाळेत नोकरीसाठी अर्ज (Job Application) प्रक्रिया सुरू झाली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार येत्या 23 एप्रिलपूर्वी सैनिक शाळेच्या sainikschooltilaiya.org या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन अर्ज करू शकतात. ही सैनिकी शाळा सीबीएसई पॅटर्नआधारे शिक्षण देणारी निवासी शाळा आहे. 16 सप्टेंबर 1963 रोजी देशात स्थापन झालेल्या सैनिकी शाळेत ही शाळा पण होती. या शाळेतील विद्यार्थ्यांनी अनेक क्षेत्रात त्यांच्या नावाचा डंका वाजविला आहे. या शाळेत नोकरीची संधी उमेदवारांना (Applicant) उपलब्ध झाली आहे. 18 ते 50 वयोगटातील उमेदवारांना विविध पदासाठी या शाळेच्या संकेतस्थळावर जाऊन नोकरीसाठी अर्ज करता येईल.
पद आणि पगाराचा तपशील
या भरती प्रक्रियेतून एकूण 24 पदे भरण्यात येणार असून यामध्ये वॉर्ड बॉईजच्या 2 जागा, जनरल स्टाफच्या 19, नर्सिंग सिस्टरच्या 1 आणि जनरल स्टाफच्या 2 पदांचा समावेश आहे. निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 19 हजार 900 रुपयांपर्यंत पगार दिला जाणार आहे.
शैक्षणिक पात्रता
वॉर्ड बॉय या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना सरकारने मान्यता प्राप्त बोर्डाची इयत्ता दहावीची परीक्षा उत्तीर्णतेसह इंग्रजीत अस्खलितपणे बोलता येणे आवश्यक आहे. सर्वसाधारण कर्मचारी या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे सरकारने मान्यता प्राप्त बोर्डातून दहावीची परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तर नर्सिंग सिस्टर पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे सरकारने मान्यता प्राप्त बोर्डातून दहावीची परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. नर्सिंगमधील पदवी / पदवी व्यतिरिक्त पदविका अर्थात डिप्लोमा असणे गरजेचे आहे.
वयाची अट
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 18 वर्षे ते 50 वर्षे दरम्यान असावे. सरकारी नियमानुसार राखीव प्रवर्गासाठी वयामध्ये सूट देण्यात आली आहे.
असा करा अर्ज
इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपला अर्ज सर्व आवश्यक कागदपत्रांच्या सत्यप्रतींसह आणि 25 रुपयांच्या स्टॅम्पसह मुख्याध्यापक, सैनिक स्कूल तिलैया या पत्त्यावर 23 एप्रिल 2022 रोजी पूर्वी पाठवावा. या भरतीशी संबंधित कोणत्याही प्रकारच्या माहितीसाठी उमेदवार अधिकृत अधिसूचना sainikschooltilaiya.org या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन तपासू शकतात. राखीव प्रवर्गातील पुरुष उमेदवारांना 250 रुपये अर्ज शुल्क म्हणून भरावे लागणार आहे. त्याचबरोबर सर्वसाधारण, ओबीसी पुरुष आणि ईडब्ल्यूएस उमेदवारांना 400 रुपये भरावे लागणार आहेत. या परीक्षा शुल्काचा भरणा डीडीद्वारेच करता येणार आहे.