दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना 50 हजार महिना पगाराच्या सरकारी नोकरीची संधी
दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना सरकारी नोकरीची सुवर्णसंधी आहे. या नोकरीच्या माध्यमातून तरुण महिन्याला 50 हजार रुपयांपर्यंत पगार मिळवू शकणार आहेत. या भरतीसाठी इच्छूक असणारे उमेदवार 8 मार्चपर्यंत ऑनलाईन अर्ज करु शकणार आहेत.
नवी दिल्ली | 18 फेब्रुवारी 2024 : दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे. दिल्ली सबऑर्डिनेड सर्विस सिलेक्टीव बोर्डाकडून मल्टी टास्किंग स्टाफच्या पदांसाठी भरतीची अधिसूचना जारी केली आहे. या पदांसाठी अर्ज करण्यासाची मुदत 8 फेब्रुवारी ते 8 मार्चपर्यंत आहे. इच्छुक उमेदार बोर्डाच्या dsssbonline.nic.in या वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन अर्ज करु शकतात. या भर्तीच्या माध्यमातून महिला आणि बालविकास विभाग, समाज कल्याण, प्रशिक्षण, प्रधान लेखा, विधानसभा कार्यालय, सचिवालय मुख्य निर्वाचन अधिकारी, डीएसएसएसबी, आर्थिक आणि सांख्यिकी निदेशालय, योजना, प्रशिक्षण निदेशालय यासह विविध विभागांमध्ये एमटीएसच्या एकूण 567 जागांसाठी पदे भरली जाणा आहेत.
या पदासांठी इच्छूक उमेदवाराचं शिक्षण दहावी पास असणं अनिवार्य आहे. तसेच अर्ज भरणाऱ्याचं वय 18 ते 27 वर्षाच्या दरम्यान असणं आवश्यक आहे. काही पदांसाठी 18 ते 25 वयाची मर्यादा ठेवण्यात आली आहे. याबाबतची अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आपण या पदाची जाहिरात पाहू शकता. या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना 100 रुपये फिज असणार आहे. महिला, एससी आणि एसटी वर्गाच्या उमेदवारांना अर्जाच्या फिजपासून सूट देण्यात आली आहे. या वर्गाच्या उमेदवारांना फीज देण्याची आवश्यकता नाही.
उमेदवारी अर्ज कसा भरावा?
- सर्वात आधी dsssbonline.nic.in या वेबसाईटवर जा
- एमटीएस नोटीसद्वारे देण्यात आलेल्या अर्जाच्या लिंकवर क्लिक करा.
- अर्ज भरा आणि तुमचे आवश्यक कागदपत्रांचे डॉक्युमेंट अपलोड करा.
- फीज जमा करा आणि सबमीट करा.
निवड प्रक्रिया कशी असेल?
अर्जदाराची निवड ही टियर 1 आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या अंतर्गत केली जाईल. परीक्षा ऑनलाईन पद्धतीने होईल. निवड समिती परीक्षाची तारीख योग्य वेळी बोर्डाच्या वेबसाईटच्या माध्यमातून जाहीर करेल. परीक्षेसाठी पात्र ठरणाऱ्या उमेदवारांना हॉल तिकीट दिलं जाईल. या परीक्षेत निवड झालेल्या उमेदवारांना नोकरीवर रुजू झाल्यानंतर 18 हजार ते 56,900 रुपयांपर्यंत पगार मिळेल.