दहावी फेल, पण तीन लग्न, 6 मुले अन् 50 पेक्षा जास्त महिलांची फसवणूक, महिला न्यायाधीश अडकली त्याच्या जाळ्यात

Crime News: अय्यूबच्या शोधासाठी वेगवेगळ्या राज्यात छापे दिल्ली पोलिसांच्या टाकले. त्यानंतर तो वडोदराहून दिल्लीत येत असल्याची बातमी पोलिसांना मिळाली. पोलिसांनी आपले पथक तैनात केले आणि निजामुद्दीन रेल्वे स्थानकावरून त्याला अटक केली.

दहावी फेल, पण तीन लग्न, 6 मुले अन् 50 पेक्षा जास्त महिलांची फसवणूक, महिला न्यायाधीश अडकली त्याच्या जाळ्यात
Follow us
| Updated on: Sep 22, 2024 | 9:15 AM

सरकार नोकरीत आहे. चांगला पगार आहे. परंतु एकटा आहे. पत्नीचा मृत्यू झाला आहे. परिवारात फक्त एक लहान मुलगी आहे. तिच्यासोबत जीवन जगत आहे…या पद्धतीची कहाणी सांगून दहावी फेल अय्यूब खान महिलांना आपल्या जाळ्यात ओढत असतो. मग त्याने एक, दोन नव्हे 50 पेक्षा जास्त महिलांची या पद्धतीने फसवणूक केली. त्याचे तीन लग्न झाले आहेत. त्याला सहा मुले आहेत. त्याच्या बोलण्यामुळे सामान्य महिलाच नाही तर एका महिला न्यायाधीशाची सुद्धा फसवणूक झाली आहे. तो घटस्फोट घेतलेल्या, विधवा असलेल्या किंवा आपल्या घरापासून लांब असलेल्या महिलांना फसवत असतो.

महिलांकडून घेत होता किंमत वस्तू

अय्यूब खान याने 50 पेक्षा जास्त महिलांची फसवणूक केली आहे. त्याने त्यांच्याकडून रुपये, दागिने आणि अन्य किंमती वस्तू घेतल्या आहेत. या महिलांची त्याने कोट्यवधी रुपयांत फसवणूक केल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. तो फसवण्यात इतका निष्णात होता की त्याच्या जाळ्यात उच्चभ्रू महिलासुद्धा आल्या आहेत. एक महिला न्यायाधीशही तिच्या मुलीसह त्याच्या जाळ्यात सापडली आहे.

पोलिसांनी काढली कुंडली

दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेने अय्यूब खान याला अटक केली. त्यानंतर त्याची संपूर्ण कुंडलीच बाहेर काढली आहे. उत्तर प्रदेशातील प्रतापगढ येथील रहिवासी असलेल्या अय्युब याने आपल्या समोरील महिलांना इम्प्रेस करण्यासाठी गुजरातमधील वडोदरा येथील असल्याचे भासवले. या महिलांच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांनी लग्नाबाबत चर्चा केली. त्यानंतर लग्नासाठी रिसॉर्ट, मॅरिज हॉल, हॉटल बुक करण्यासाठी पैसे घेत होता अन् रफूचक्कर होत होता.

हे सुद्धा वाचा

लग्न करुन फरार होत होता…

अय्यूबचे लग्न 2014 मध्ये झाले. त्याला तीन मुलेही आहेत. 2020 मध्ये, त्याने मॅट्रिमोनिअल साइटवर बनावट प्रोफाइल तयार केले. त्यानंतर तो वडोदरा येथील एका घटस्फोटित महिलेला भेटला. दोघांचे बोलणे सुरू झाले आणि एके दिवशी तो तिला भेटायला वडोदरा येथे आला. त्यावेळी त्या महिलेकडून 30 हजार रुपये लग्नाचे आमिषाने घेतले. मग त्याने त्या महिलेसोबत लग्न केले. त्यापासून त्याला तीन मुले झाली. 2023 एका विधवा महिलेशी त्याने लग्न केले. त्यानंतर तिच्याकडून पैसे घेऊन फरार झाला.

महिला तक्रार करत नव्हत्या, कारण…

अय्यूबच्या जाळ्यात अडकलेल्या महिला बदनामी होण्याच्या भीतीने पोलिसांत तक्रार करत नव्हत्या. त्याने आपल्या मुलीसाठी मुलगा शोधणाऱ्या एका महिला न्यायाधीशालाही आपल्या जाळ्यात ओढले. त्याने त्या महिलांकडून पैसे घेऊन त्यांच्या नावावर महाग मोबाईल, दागिने आणि गाड्याही घेतल्या. नंतर ते विकून टाकत होता.

असा आला जाळ्यात

अय्यूबच्या शोधासाठी वेगवेगळ्या राज्यात छापे दिल्ली पोलिसांच्या टाकले. त्यानंतर तो वडोदराहून दिल्लीत येत असल्याची बातमी पोलिसांना मिळाली. पोलिसांनी आपले पथक तैनात केले आणि निजामुद्दीन रेल्वे स्थानकावरून त्याला अटक केली.

अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?.
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका.
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर.
बोट अपघात 13 मृत्यू, मृतांच्या नातेवाईकांना सरकारकडून किती लाखांची मदत
बोट अपघात 13 मृत्यू, मृतांच्या नातेवाईकांना सरकारकडून किती लाखांची मदत.
'महिलांना 2100 रू. कधी देणार? लाडक्या बहिणी वाट बघताय, आता...'
'महिलांना 2100 रू. कधी देणार? लाडक्या बहिणी वाट बघताय, आता...'.
एलिफंटाला जाणारी बोट उलटली, समुद्रात काय झालं? अपघात नेमका कसा झाला?
एलिफंटाला जाणारी बोट उलटली, समुद्रात काय झालं? अपघात नेमका कसा झाला?.
आंबेडकरांबाबतच्या वक्तव्यावरून शाहांची कोंडी, अडकले वादाच्या भोवऱ्यात
आंबेडकरांबाबतच्या वक्तव्यावरून शाहांची कोंडी, अडकले वादाच्या भोवऱ्यात.
'फडणवीस तुम्हाला सरपंचाच्या...',देशमुखांच्या हत्येचे पडसाद विधानसभेत
'फडणवीस तुम्हाला सरपंचाच्या...',देशमुखांच्या हत्येचे पडसाद विधानसभेत.
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.