Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अज्ञात वाहनाच्या धडकेत 4 जण ठार; नाशिक-मुंबई महामार्गावरील घटना

नाशिक-मुंबई महामार्गावर एका अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत 4 जण ठार झाले आहेत. मृतात एका लहान मुलाचा समावेश असल्याचे समजते.

अज्ञात वाहनाच्या धडकेत 4 जण ठार; नाशिक-मुंबई महामार्गावरील घटना
संग्रहित छायाचित्र.
Follow us
| Updated on: Nov 08, 2021 | 6:24 PM

नाशिकः नाशिक-मुंबई महामार्गावर एका अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत 4 जण ठार झाले आहेत. मृतात एका लहान मुलाचा समावेश असल्याचे समजते.

नाशिक-मुंबई महामार्ग हा अत्यंत धोकादायक झाला आहे. या रस्त्यावर वारंवार अपघात घडत आहेत. सोमवारीही त्याची पुनरावृत्ती झाली. चौफुली घाटात एका अज्ञात वाहनाने मोटारसायकलवर जाणाऱ्यांना मागून धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, यात 4 जणांचा मृत्यू झाला. मृतामध्ये एका लहान मुलाचा समावेश आहे. साधारणतः दुपारी साडेचारच्या सुमारास ही घटना घडली आहे. दुचाकीला धडक दिल्यानंतर वाहनचालक फरार झाला आहे. दरम्यान, पंधरा दिवसांतला हा दुसरा अपघात आहे. यापूर्वी मुंबई – नाशिक महामार्गावर बोरटेंभे ब्रिजजवळ भीषण अपघात झाला होता. त्यात आयशर आणि पिकअप गाडी धडकून तिघे जण जखमी झाले. अपघातात पिकअप कारचा अक्षरशः चक्काचूर झाला. शुक्रवारी सकाळी 7 वाजताच्या सुमारास हा अपघात झाला. यामध्ये एक जण गंभीर जखमी झाला असून, दोघा जणांना किरकोळ दुखापत झाली आहे. जखमींना रुट पेट्रोलिंग टीमने वाहतूक पोलिसांच्या मदतीने बाहेर काढले.

दुचाकी-कारची टक्कर

नाशिक जिल्ह्यात इगतपुरी परिसरातील पारदेवीजवळ बाईक आणि क्रेटा कार यांचा भीषण अपघात झाला. कार आणि बाईक यांची समोरासमोर धडक झाली. धडकेनंतर बाईकसकट तरुण फरफटत गेला, तर एक जण फेकला गेला. हा अपघात इतका भीषण होता, की अपघातात नाशकातील डाक बंगला परिसरात राहणाऱ्या करण मनोहर या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. शनिवारी सायंकाळी 5 वाजताच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेनंतर परिसरावर शोककळा पसरली आहे. संतप्त झालेल्या नागरिकांनी गाडी पेटवून दिली. या आगीत गाडी जळून खाक झाली आहे.

कारची उभ्या ट्रकला धडक

नाशिक जिल्हात एका कारने उभ्या असलेल्या आयशर ट्रकला पाठीमागून धडक दिली. नाशिक-पुणे महामार्गावर नांदुरशिंगोटे परिसरात ही घटना घडली. त्यात एका औषध कंपनीचे दोन मॅनेजर, एक मार्केटिंग प्रतिनिधी जागीच ठार झाले. मृतांमध्ये शरद गोविंदराव महाजन (वय 39, रा. म्हसरूळ, नाशिक), भूषण बाळकृष्ण बधान (वय 36, रा. पाथर्डी फाटा, नाशिक) आणि राजेश तिवारी (वय 34, रा. कल्याण, ठाणे) या तिघांचा समावेश आहे. तिन्ही मृतदेहांचे दोडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन करण्यात आले. अपघाताने घटनास्थळी काही काळ वाहतूक कोंडी झाली होती. मात्र, महामार्ग पोलिसांनी तात्काळ धाव घेत अपघातग्रस्त वाहने हटवली आणि मदतकार्यही केले. (3 killed, 1 seriously injured in unidentified vehicle crash; Incident on Nashik-Mumbai Highway)

इतर बातम्याः

Special Report: स्वातंत्र्याचं बेफाम वारं, अनंतराव नावाचा झंझावात अन् महाराष्ट्रातलं ‘मॅन्चेस्टर गार्डियन’

साहित्य संमेलनाच्या उद्घाटनासाठी दिग्गजांच्या नावांचा विचार; उत्सुकता शिगेला!

'आकाच्या सांगण्यावरून..',आरोपींच्या कबुलीनंतर धसांची पहिली प्रतिक्रिया
'आकाच्या सांगण्यावरून..',आरोपींच्या कबुलीनंतर धसांची पहिली प्रतिक्रिया.
कोणी महत्वाचं व्यक्ती असतं तर..; रोहित पवारांचा गोपीचंद पडळकरांना टोला
कोणी महत्वाचं व्यक्ती असतं तर..; रोहित पवारांचा गोपीचंद पडळकरांना टोला.
'...त्यांना मन की बात सांगावी', राष्ट्रवादीच्या महिला नेत्यानं डिवचलं
'...त्यांना मन की बात सांगावी', राष्ट्रवादीच्या महिला नेत्यानं डिवचलं.
'कराडच्या सांगण्यावरून देशमुखांनी घुलेला मारहाण...', आरोपींचा खुलासा
'कराडच्या सांगण्यावरून देशमुखांनी घुलेला मारहाण...', आरोपींचा खुलासा.
'त्यांचंही दूध काढू', पिसाळलेला कुत्रा उल्लेख करत शिरसाटांचा पटलवार
'त्यांचंही दूध काढू', पिसाळलेला कुत्रा उल्लेख करत शिरसाटांचा पटलवार.
'वाघ्या'ची चर्चा असताना शाहूंच्या प्रिय खंड्या श्वानाचीही होतेय चर्चा
'वाघ्या'ची चर्चा असताना शाहूंच्या प्रिय खंड्या श्वानाचीही होतेय चर्चा.
कोरटकर थांबलेल्या हॉटेलांना नोटिस दिली; पोलिसांची कोर्टात माहिती
कोरटकर थांबलेल्या हॉटेलांना नोटिस दिली; पोलिसांची कोर्टात माहिती.
कराड-मुंडेंच्या सांगण्यावरून देशमुखांची हत्या,ठाकरेंच्या नेत्याचा आरोप
कराड-मुंडेंच्या सांगण्यावरून देशमुखांची हत्या,ठाकरेंच्या नेत्याचा आरोप.
बंगरुळू हत्या प्रकरण : आरोपीच्या वडिलांनी सांगितला संपूर्ण घटनाक्रम
बंगरुळू हत्या प्रकरण : आरोपीच्या वडिलांनी सांगितला संपूर्ण घटनाक्रम.
देशमुखांच्या हत्येचं शूटींग ज्या फोनमधून केल, त्याचा तपासणी अहवाल समोर
देशमुखांच्या हत्येचं शूटींग ज्या फोनमधून केल, त्याचा तपासणी अहवाल समोर.