Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Noida IT Raid: माजी आयपीएसच्या बंगल्यातील तळघरात 700 लॉकर्स, 5.77 कोटींची रक्कम जप्त

बंगल्यातील तळघरात सापडलेल्या लॉकर्स पाहून आयकर विभागाचे पथकही चक्रावून गेले आहे. लॉकर चालवणाऱ्या एजन्सीच्या कर्मचाऱ्याला बोलावून एक एक लॉकर खोलण्यास सुरुवात केली. पथकाने पैसे मोजण्यासाठी तीन मशिन्स आणली असून सतत पैशाचे मोजमाप सुरु असल्याने या मशिन्सही हँग होत आहेत.

Noida IT Raid: माजी आयपीएसच्या बंगल्यातील तळघरात 700 लॉकर्स, 5.77 कोटींची रक्कम जप्त
Follow us
| Updated on: Feb 02, 2022 | 6:54 PM

नोएडा : माजी आयपीएस अधिकारी आर एन सिंग(R.N.Sing) यांच्या घरी गेले चार दिवस आयकर विभागाची छापेमारी(Income Tax Raid) सुरु आहे. सिंग यांच्या नोएडा सेक्टर 50 मधील बंगल्यातील तळघरात 700 लॉकर्स(Lockers) आयकर विभागाच्या पथकाला आढळून आले असून आतापर्यंत सुमारे 5 कोटी 77 लाख रोख रक्कम हस्तगत करण्यात आली आहे. यापैकी ज्या लॉकरच्या मालकांचे नाव आणि पत्ता स्पष्टपणे कळले नाही असे 10 लॉकर आयकर विभागाने कापून काढले. छापेमारीच्या पहिल्या दिवशी 16 लॉकर्सची माहिती उघड झाली होती. यापैकी 14 लॉकर्सच्या मालकांची चौकशी करण्यात आली आहे. सिंग यांची पत्नी आणि मुलगा बंगल्यातील तळघरात सिक्युरिटी व्हॉल्ट एजन्सी चालवतात. मॅनसम नोएडा व्हॉल्ट एजन्सी असे या एजन्सीचे नाव आहे. या एजन्सीच्या एका लॉकरमध्ये बेनामी 20 लाखाची रक्कम असल्याची तक्रार आयकर विभागाकडे आली होती. त्या तक्रारीनुसार आयकर विभागाने सिंग यांच्या बंगल्यावर छापेमारी सुरु केली. (5.77 crore seized from former IPS officer’s house; Officers, professionals and doctors also found lockers)

या लॉकरमध्ये बेनामी रक्कम असल्याची तक्रार मिळाल्यानंतर छापेमारी

आर. एन. सिंग हे 1983 चे आयपीएस अधिकारी आहेत. ते यूपीचे डिजी प्रोसिक्युशन होते. नोएडा सेक्टर 50 मध्ये ए-6 या बंगल्यात सिंग हे कुटुंबियांसोबत राहतात. या लॉकरमध्ये बेहिशेबी रक्कम असल्याची तक्रार मिळाल्यानंतर आकर विभागाच्या पथकाने बंगल्यात हजर होत छापेमारी सुरु केली. बंगल्यातील तळघरात सापडलेल्या लॉकर्स पाहून आयकर विभागाचे पथकही चक्रावून गेले आहे. लॉकर चालवणाऱ्या एजन्सीच्या कर्मचाऱ्याला बोलावून एक एक लॉकर खोलण्यास सुरुवात केली. पथकाने पैसे मोजण्यासाठी तीन मशिन्स आणली असून सतत पैशाचे मोजमाप सुरु असल्याने या मशिन्सही हँग होत आहेत. आतापर्यंत एकूण 700 लॉकर्सची माहिती मिळाली असून यातील अनेक लॉकर्समध्ये बेनामी संपत्ती असल्याचे सूत्रांकडून कळते.

अद्याप 100 हून लॉकर्सची तपासणी बाकी

तळघरात सापडलेल्या लॉकरपैकी बऱ्याच लॉकर्सच्या मालकांचे नाव आणि पत्ता याची स्पष्ट माहिती लिहिलेली नाही. तर काही लॉकर्सच्या मालकाचे नाव आणि पत्ताही सापडला नाही. असे लॉकर्स आयकर विभागाने कापून काढले आणि त्यातील रोख रक्कम काढली. मंगळवारी उशिरापर्यंत आयकर विभागाकडून छापेमारी सुरुच होती. सूत्रांच्या माहितीनुसार जवळपास 80 टक्के लॉकर्सची तपासणी झाली असून अजून 100 हून अधिक लॉकर्सची तपासणी बाकी आहे, अशी नवभारत टाईम्सने आपल्या वृत्तात दिली आहे.

IAS, IPS, PCS, डॉक्टरांचेही लॉकर सापडले

आयकर विभागाची टीम सिक्युरिटी व्हॉल्टमध्ये सापडलेल्या सर्व लॉकर्सची तपासणी करत आहे आणि त्यांच्या मालकांना चाव्यांसह चौकशीसाठी बोलावत आहे. यात अनेक सेवानिवृत्त आणि सध्याचे आयएएस, आयपीएस, पीसीएस, डॉक्टर, व्यावसायिक यांचे लॉकर्स आहेत. एजन्सीवर छापा पडल्यानंतर हे अधिकारी आयकर विभागाच्या पथकासमोर येण्याचे टाळत असून आपले प्रतिनिधी पाठवत आहेत. यापैकी काही जण लखनौमध्ये राहतात. (5.77 crore seized from former IPS officer’s house; Officers, professionals and doctors also found lockers)

इतर बातम्या

Nagpur Crime : पगार न देणाऱ्या मालकाच्या घरी नोकराने केली चोरी; नागपुरात अल्पवयीन मुलाने असा घेतला बदला

CCTV | कोंबड्या नेणाऱ्या टेम्पोची बाईकला समोरासमोर धडक, दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू

गीतेचा उपदेश याच संविधानात दाखवलेला आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
गीतेचा उपदेश याच संविधानात दाखवलेला आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.
आव्हाड-राणे विधानभवनाच्या पायऱ्यांवर आमने-सामने, मग हस्तांदोलन अन्...
आव्हाड-राणे विधानभवनाच्या पायऱ्यांवर आमने-सामने, मग हस्तांदोलन अन्....
'...त्याला महाराष्ट्र बाहेर हाकला', कोणत्या मुद्द्यावरून कडूंचा संताप
'...त्याला महाराष्ट्र बाहेर हाकला', कोणत्या मुद्द्यावरून कडूंचा संताप.
वाल्मिक कराडच्या वकिलांनी आरोप मुक्तीसाठी केला अर्ज
वाल्मिक कराडच्या वकिलांनी आरोप मुक्तीसाठी केला अर्ज.
मुंबईत येत्या शनिवारपासून उकाडा तर 'या' महिन्यात धुव्वाधार बरसणार
मुंबईत येत्या शनिवारपासून उकाडा तर 'या' महिन्यात धुव्वाधार बरसणार.
'ठाणे, रिक्षा, चश्मा..', पुण्यात कुणाल कामराच्या समर्थनार्थ बॅनरबाजी
'ठाणे, रिक्षा, चश्मा..', पुण्यात कुणाल कामराच्या समर्थनार्थ बॅनरबाजी.
साडीवाली दीदी..शिंदेंनंतर भाजपच्या बड्या महिला नेत्यावर कामराचा निशाणा
साडीवाली दीदी..शिंदेंनंतर भाजपच्या बड्या महिला नेत्यावर कामराचा निशाणा.
पत्रकार परिषदेत उज्वल निकम यांचा मोठा दावा
पत्रकार परिषदेत उज्वल निकम यांचा मोठा दावा.
संभाजीराजे 'वाघ्या'बाबत म्हणाले, 'महाराजांना अग्नि दिला त्यावेळी...'
संभाजीराजे 'वाघ्या'बाबत म्हणाले, 'महाराजांना अग्नि दिला त्यावेळी...'.
संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पुढची सुनावणी 10 एप्रिलला
संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पुढची सुनावणी 10 एप्रिलला.