दुसरीत शिकणाऱ्या नातीसोबत अश्लील कृत्य, मुलीवरही अनेकदा बलात्कार, 65 वर्षीय वृद्धाचा संतापजनक प्रताप

माणसाच्या आतली विकृती कोणत्या थरावर जाईल याची आपण कधीही कल्पना करु शकत नाही (65 year old man sexual assault on daughter and granddaughter).

दुसरीत शिकणाऱ्या नातीसोबत अश्लील कृत्य, मुलीवरही अनेकदा बलात्कार, 65 वर्षीय वृद्धाचा संतापजनक प्रताप
प्रातिनिधिक फोटो
Follow us
| Updated on: Mar 27, 2021 | 2:53 PM

मुंबई : माणसाच्या आतली विकृती कोणत्या थरावर जाईल याची आपण कधीही कल्पना करु शकत नाही. मुंबईत एक घाणेरडा आणि संताजनक प्रकार समोर आला. एका 65 वर्षीय वृद्धाने आपल्या मुलीवर लहानपणासून वारंवार बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. त्याचबरोबर विकृत वृद्धाने स्वत:च्या मुलीच्या दोन वर्षांच्या चिमुकलीसोबतही अश्लील आणि किळसवाणं कृत्य केल्याचं उघड झालं आहे. या प्रकरणी पीडित मुलीने आपल्या वडिलांविरोधात पोलिसात तक्रार केली होती. या प्रकरणी मुंबईच्या विशेष कोर्टाने विकृत वृद्धाला जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे (65 year old man sexual assault on daughter and granddaughter).

कुणाला सांगितलं तर मुलांना छळेल, अशी धमकी

पीडित मुलगी ही लग्ननानंतरही आपल्या आई-वडिलांकडे राहत होती. ती आपल्या आईला घरकामात मदत करते. तर तिचा भाऊ, पती आणि वडील हे चित्रकार आहेत. पीडितेचा वडीत ती 15 वर्षांची असल्यापासून तिच्यावर वारंवार बलात्कार करत होता, असं तिने कोर्टात सांगितलं आहे. त्याचबरोबर याबाबत कुणालाही सांगितलं तर तिच्या लहान मुलांना त्रास देईल, अशी धमकी नराधम बापाने दिली होती, असंही तिने कोर्टात सांगितलं.

पीडितीने आपल्यावर होत असलेल्या बलात्काराची माहिती शेजारच्या महिलेला दिली होती. मात्र, काही दिवसांनी त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर या प्रकाराबद्दल आपण कुणालाही सांगितलं नाही, असं पीडितेने कोर्टात सांगितलं (65 year old man sexual assault on daughter and granddaughter).

नराधमाचं नातीसोबतही अश्लील कृत्य

दरम्यान, 2017 साली पीडितेची मुलगी ही दुसरी इयत्तेत शिकत होती. तिच्या लहान मुलीने सांगितलं की, आजोबा जेव्हा रात्री सोबत झोपतात तेव्हा चुकीच्या पद्धतीने स्पर्श करतात. पीडितेने मुलीची तक्रार ऐकल्यानंतर तातडीने पोलीस ठाणे गाठले. तिथे तिने आपल्या वडिलांविरोधात तक्रार दाखल केली.

आरोपीला जन्मठेपेची शिक्षा

मुंबईच्या विशेष कोर्टात याबाबत सुनावणी सुरु होती. आरोपी वृद्धावर प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन फ्रॉम सेक्सुअल ऑफेंस (पोक्सो) कायद्याअंतर्गत जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. न्यायाधीश रेखा पंधारे यांनी याबाबत शिक्षा सुनावली. कोर्टाने आरोपीच्या मुलीसाठी 50 हजार तर नातीसाठी 25 रुपये नुकसान भरपाई देण्याचे आदेशही दिले.

हेही वाचा : मुंबईतील अभियंत्यावर बलात्काराचा आरोप, 47 वर्षीय महिला पोलिसाची पुण्यात आत्महत्या

थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.