एकटी असल्याची संधी साधत चिमुकलीचे अपहरण करत अत्याचार, चार दिवसातील दुसरी घटना

महिला दुपारी एक वाजता महिला घरी आली तेव्हा तीन वर्षीय मुलगी घरी दिसली नाही. महिलेने परिसरात तिचा खूप शोध घेतला. मात्र ती सापडली नाही. अखेर सायंकाळी आठ वाजता महिलेने शांतीनगर पोलीस ठाण्यात मुलगी हरवल्याची तक्रार दिली.

एकटी असल्याची संधी साधत चिमुकलीचे अपहरण करत अत्याचार, चार दिवसातील दुसरी घटना
भिवंडीत आणखी एक चिमुरडी वासनेचा बळीImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Jan 25, 2023 | 4:41 PM

भिवंडी : मुलींवरील अत्याचाराच्या घटना थांबण्याचे नावच घेताना दिसत नाहीत. रविवारी एका चिमुरडीवर लैंगिक अत्याचार करुन हत्या केल्याची घटना ताजी असतानाच आज आणखी एक चिमुरडी वासनेचा बळी ठरल्याचे उघड झाले आहे. शांतीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत नागाव परिसरात ही हृदयद्रावक घटना घडली आहे.आई वडील मजुरीच्या कामावर गेले असताना अज्ञात नराधमाने हीच संधी साधत तीन वर्षाच्या चिमुरडीचे अपहरण केले. मग तिच्यावर लैंगिक अत्याचार करुन तिची हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी शांतीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील नागाव भागातील एका चाळीत हे पीडित कुटुंबीय वास्तव्याला आहे. मुलीचे वडील भंगार फेरीवाल्याचे करतात. पती-पत्नी आणि तीन मुलं असे हे कुटुंब दोन महिन्यांपुर्वी वास्तव्यास आले आहेत.

गरिबीमुळे पत्नी सुद्धा मजुरी कामावर जाते. मंगळवारी नेहमीप्रमाणे महिला आपल्या कामावरुन निघून गेली. यावेळी घरात तीन वर्षीय मुलीसह 5 आणि 6 वर्षांच्या मुले घरात एकटी होती.

हे सुद्धा वाचा

आई कामावरुन घरी आली तर मुलगी नव्हती

महिला दुपारी एक वाजता महिला घरी आली तेव्हा तीन वर्षीय मुलगी घरी दिसली नाही. महिलेने परिसरात तिचा खूप शोध घेतला. मात्र ती सापडली नाही. अखेर सायंकाळी आठ वाजता महिलेने शांतीनगर पोलीस ठाण्यात मुलगी हरवल्याची तक्रार दिली.

चाळीतच मुलीचा मृतदेह आढळला

पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करून मुलीचा खूप शोध घेतला, मात्र मुलीचा काहीच थांगपत्ता लागला नाही. बुधवारी सकाळी त्याच परिसरातील एक चाळीच्या पहिल्या मजल्यावरील अडगळीच्या खोलीत चिमुरडीचा मृतदेह आढळून आला.

या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. शांतीनगर पोलिसांनी आरोपीचा शोध घेण्यासाठी संपूर्ण परिसरात झडती सत्र सुरू केले आहे. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मुंबईतील जे जे रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.

शहरातील चार दिवसात घडलेल्या दुसऱ्या घटनेने सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. पोलिसांनी या घटनेची गांभीर्याने दाखल घेत आरोपीच्या शोधासाठी पोलीस पथक तैनात केले आहे.

सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.