लग्झरी हॉटेल, 2 किलो सोने, 14 किलो चांदी, महागडी दारू, कोट्यवधीची जमीन… सरकारी अधिकाऱ्याची काळी कमाई

घरातून सुमारे दोन किलो सोन्याचे दागिने, 13.70 किलो चांदीचे दागिने आणि सुमारे 3 लाख रुपयांची रोकड सापडली आहे. घरात 100 हून अधिक महागड्या दारूच्या बाटल्या मिळाल्या. याशिवाय बँक लॉकरची माहिती मिळाली.

लग्झरी हॉटेल, 2 किलो सोने, 14 किलो चांदी, महागडी दारू, कोट्यवधीची जमीन... सरकारी अधिकाऱ्याची काळी कमाई
आरोपी जयमलसिंग राठोड याचे हॉटेल
Follow us
| Updated on: Oct 27, 2024 | 11:30 AM

ACB Action in Udaipur: सरकारी अधिकाऱ्यांचा मोठा थाट असतो. त्यात वर्ग एकचे अधिकारी असल्यास त्यांना घसघशीत पगारासोबत लग्झरी सुविधाही मिळत असतात. त्यानंतरही काही अधिकारी सरकारकडून मिळालेल्या पदाचा गैरवापर करत काळी कमाई करत असतात. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) टाकलेल्या छाप्यात विभागीय ग्राहक संरक्षण अधिकारी जयमलसिंग राठोड यांच्याकडे संपत्तीचा खजीना मिळाला. त्याच्याकडे पत्नीचा नावार 26 खोल्यांचे चार मजली लग्झरी हॉटेल, घरात 2 किलो सोन्याचे दागिणे, 14 किलो चांदी, महागडी दारू, कोट्यवधीची जमिनीचे कागदपत्रे मिळाली. राजस्थानमधील उदयपूरमध्ये विभागीय ग्राहक संरक्षण अधिकारी म्हणून जयमलसिंग राठोड कार्यरत आहे. आता त्याला अटक करण्यात आली आहे.

एससीबीने जयमल सिंह राठौड याच्या उदयपूर, भीलवाडा येथील चार ठिकाणांवर छापेमारी केली. तसेच त्याच्या जन्मगावीसुद्धा एसीबीची टीम पोहचली. त्यानंतर त्याने कमवलेली संपत्ती पाहून अधिकाऱ्यांचे जणू डोळेच फाटाले.

अशी संपत्ती मिळाली

आरोपी जयमलसिंग राठोड व त्याच्या कुटुंबियांच्या नावे अनेक ठिकाणी संपत्ती मिळाली. उदयपूर येथील सरदारपुरात पाच निवासी भूखंड, मदार बडगाव येथील एक निवासी भूखंड, सिसरमा येथील सुमारे शेतजमीन, आलिशान चार चारचाकी महागडी वाहने, उदयपूर येथील सरदारपुरा घरातून सुमारे दोन किलो सोन्याचे दागिने, 13.70 किलो चांदीचे दागिने आणि सुमारे 3 लाख रुपयांची रोकड सापडली आहे. घरात 100 हून अधिक महागड्या दारूच्या बाटल्या मिळाल्या. याशिवाय बँक लॉकरची माहिती मिळाली. ते अद्याप उघडले नाही. तसेच मनविलास रिसॉर्ट, आरोपीची पत्नी अनुराधा आणि मुलगा हनुतसिंग यांच्या नावावर आठ हजार स्क्वेअर फूट जागेवर चार मजली आणि 26 खोल्यांचे आलिशान हॉटेल बांधले आहे. त्यामध्ये रुफटॉप रेस्टॉरंटही चालवले जाते. राठोड याने या हॉटेलमध्ये कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक केली आहे. तसेच वन्य प्रण्याचे अवशेष मिळाले आहे.

हे सुद्धा वाचा

जयमलसिंग राठोडकडे उत्पन्नापेक्षा जास्त संपती

जयमलसिंग राठोड याने त्यांच्या सेवेच्या कार्यकाळात कोट्यवधी रुपयांच्या अनेक चल आणि जंगम मालमत्ता भ्रष्ट मार्गाने मिळवली आहे. ही संपत्ती त्याच्या वैध उत्पन्नापेक्षा जास्त आहे. तसेच राठोड आणि त्याच्या कुटुंबियांनी अनेक बेनामी मालमत्तांमध्ये गुंतवणूक केल्याचे पुरावे सापडले आहेत.

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.