बहुचर्चित एटीएम कॅश व्हॅन लूट प्रकरण, अखेर 10 वर्षांनी बंद फाईल ओपन झाली अन्…

दहा वर्षापूर्वी ते दोघे एटीएम कॅश व्हॅन लुटून फरार झाला. पोलिसांना कोणताही सुगावा न लागल्याने त्यांनी ही केस बंद केली. पण म्हणतात ना गुन्हा कधी लपत नाही.

बहुचर्चित एटीएम कॅश व्हॅन लूट प्रकरण, अखेर 10 वर्षांनी बंद फाईल ओपन झाली अन्...
एटीएम कॅश व्हॅन लूट प्रकरणी दोघांना अटकImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: May 24, 2023 | 10:34 AM

मुंबई : बहुचर्चित एटीएम कॅश व्हॅन दरोडा प्रकरणातील आरोपींना अटक करण्यात पोलिसांना अखेर यश आले आहे. मुंबईतील कांदिवली पोलिसांनी 10 वर्षांनी आरोपींना अटक केली आहे. नोटांनी भरलेल्या एटीएम कॅश व्हॅनवरील दरोडा हा 2012 मधील सर्वात मोठा दरोडा होता. एटीएम कॅश व्हॅनमधून सुमारे 80 लाख रुपये लुटून ते पळून गेले होते. सध्या कांदिवली पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली असून, त्यांनी लुटलेली रक्कम कोठे ठेवली होती, त्यांच्यासोबत आणखी किती जणांचा सहभाग होता, हा दरोड्याचा प्रकार याआधी किंवा नंतर झाला आहे का? याबाबत पोलीस तपास सुरू आहे. अरुण सहदेव वाघमारे आणि सतीश संभाजी आगडे अशी अटक आरोपींची नावे आहेत.

दहा वर्षानंतर आरोपी अटक

दोन्ही आरोपी हे एटीएम कॅश व्हॅनवर चालक म्हणून कार्यरत होते. दहा वर्षांपूर्वी 2012 मध्ये एटीएम कॅश व्हॅनमधून सुमारे 80 लाख रुपये लुटून आरोपी पळून गेले होते. कोणताही सुगावा न लागल्याने 10 वर्षांपूर्वी हे प्रकरण बंद करण्यात आले होते. मात्र कांदिवली पोलिसांच्या सतर्कतेमुळे दरोडेखोरांची माहिती मिळाली आणि पोलिसांनी 10 वर्षांनंतर त्यांना अटक केली.

दोघेही एटीएम कॅश व्हॅनवर चालक होते

अरुण सहदेव वाघमारे याला सांगली विश्रामबाग येथून अटक करण्यात आली आहे, तर दुसरा आरोपी सतीश संभाजी आगडे याला लातूरच्या साई गावातून पोलिसांनी अटक केली आहे. हे दोन्ही आरोपी मुंबईतील दहिसर पश्चिम कांदरपाडा येथे राहत होते. हे दोन्ही आरोपी एटीएम कॅश व्हॅन डिपॉझिट व्हॅनमध्ये चालक म्हणून काम करायचे. दोन्ही आरोपींनी 2012 मध्ये कॅश व्हॅन लुटली आणि व्हॅन कांदिवली पश्चिम एमजी रोड येथे सोडून पळ काढला होता.

हे सुद्धा वाचा

गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्.
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त.
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य.
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?.
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा.
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार.
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'.