कामानिमित्त मुंबईत राहणारा कामगार सुट्टीसाठी गावी जाणार होता, पण हेच त्यांना नको होते म्हणूनच…
रविवारी गोळीबाराच्या घटनेने कांदिवली हादरली. भररस्त्यात झालेल्या गोळीबाराच्या घटनेने सर्वांनाच धक्का बसला होता. मात्र या हत्याकांडाचा उलगडा करण्यास पोलिसांना यश आले आहे.
मुंबई : कांदिवली गोळीबार प्रकरणी आरोपीला अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. रोहित पाल असे आरोपीचे नाव असून, पोलिसांनी त्याला उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथून अटक केली आहे. आरोपीने कांदिवलीत इमिटेशन ज्वेलरीचे काम करणाऱ्या मनोज लालचंद चौहान नावाच्या तरुणाची गोळ्या झाडून हत्या केली. प्राथमिक तपासात आरोपीचे मृताच्या पत्नीशी प्रेमसंबंध होते. मयत गावी जाणार होता, मात्र त्याला हुसकावून लावण्यासाठी आरोपी उत्तर प्रदेशातून मुंबईत आले. आरोपीने दोन ते तीन दिवस रेकी केली, त्यानंतर संधी मिळताच रविवारी सकाळी 7.45 च्या सुमारास गोळ्या झाडून त्याची हत्या केली.
उत्तर प्रदेशात फायरिंगचे ट्रेनिंग घेतले
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी हा उत्तर प्रदेशातील जौनपूरचा रहिवासी असून, त्याने उत्तर प्रदेशमध्ये देसी कट्टा आणि 4 राऊंड गोळ्या खरेदी केल्या होत्या. आरोपी उत्तर प्रदेशमध्येच गोळीबाराचे प्रशिक्षणही घेतले होते. हत्येनंतर आरोपी ट्रेनने यूपीला पळून जात होता, पण त्याआधीच कांदिवली पोलिसांनी प्रयागराज गाठून आरोपीला अटक केली.
अनैतिक संबंधातील काटा दूर करण्यासाठी हत्याकांड
मनोज कुटुंबीय उत्तर प्रदेशमध्ये गावी राहत होते. मनोज कामानिमित्त मुंबईत राहत होता. आरोपीही मनोज गावातील रहिवासी आहे. आरोपीचे आणि मनोजच्या पत्नीचे अनैतिक संबंध होते. यामुळेच मनोजचा काटा काढण्याच्या उद्देशाने ही हत्या करण्यात आली. आरोपी गावी गोळीबाराचे ट्रेनिंग घेऊन मुंबईत आला. मग दोन-तीन दिवस रेकी केल्यानंतर त्याने हत्येचा कट अंमलात आणला. गोळी झाडल्यानंतर आरोपी उत्तर प्रदेशात पळून गेला. गोळीबाराची घटना सीसीटीव्हीत कैद झाली होती.