टोल नाक्याचा पैसा लंपास करण्यासाठी थेट कर्मचाऱ्यावर हल्ला, थरार सीसीटीव्हीत कैद

मुंबईच्या मुलुंड टोल नाक्यावर (Mulund Toll Naka) रात्रीच्या वेळी कर्मचाऱ्यावर हल्ला करुन रोकड लंपास केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे (Accused attack on Mulund toll naka's employee and loot money).

टोल नाक्याचा पैसा लंपास करण्यासाठी थेट कर्मचाऱ्यावर हल्ला, थरार सीसीटीव्हीत कैद
टोल नाक्याचा पैसा कसा आणि कुठे जातो हे माहिती, थेट कर्मचाऱ्यावर हल्ला करुन रोकड लंपास, थरार सीसीटीव्हीत कैद
Follow us
| Updated on: May 21, 2021 | 11:50 AM

मुंबई : मुंबईच्या मुलुंड टोल नाक्यावर (Mulund Toll Naka) रात्रीच्या वेळी कर्मचाऱ्यावर हल्ला करुन रोकड लंपास केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. संबंधित घटना सीसीटीव्हीत अचूकपणे कैद झाली आहे. पोलिसांनी आता आरोपींना बेड्याही ठोकल्या आहेत. मात्र, या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती. गुन्हेगारांनी थेट टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यावर हल्ला केल्याने इतर कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण होतं. मात्र, पोलिसांनी धडाकेबाज कारवाई केल्याने कर्मचारीदेखील निर्धास्त झाले आहेत. या घटनेची सध्या आजूबाजूच्या परिसरात चर्चा आहे (Accused attack on Mulund toll naka’s employee and loot money).

नेमकं प्रकरण काय?

मुलुंड टोल नाक्यावर जमा झालेला पैशांना लुटणाऱ्या तिघा जणांना नवघर पोलिसांनी मोठ्या शिताफीने अटक केली आहे. हे तिघेही या पूर्वी याच टोल नाक्यावर कार्यरत होते. त्यामुळे दिवसभरात कॅश नेमकी केव्हा जमा होते, ती कुठे नेली जाते याबाबतची संपूर्ण माहिती या आरोपींना होती. त्यानुसार त्यांनी पैसे लुटण्याचा डाव आखला. आरोपींनी पैसे लुटण्यासाठी टोल नाक्यावरील एका कर्मचाऱ्यावर हल्लाही केला (Accused attack on Mulund toll naka’s employee and loot money).

आरोपींकडून 70 हजारांची रोकड लंपास

आरोपी दुचाकीहून आले होते. मुलुंड टोल नाक्यावर एका तासात जमा झालेली 70 हजारांची रोकड टोल नाक्यावरील एक कर्मचारी घेऊन जात होता. या तिघांनी संधी साधून त्या कर्मचाऱ्यांवर हल्ला केला. आरोपींनी कर्मचाऱ्यांच्या हातातील रोकड असलेली बॅग हिसकावण्याचा प्रयत्न केला. या झटापट्टीत आरोपींना कर्मचाऱ्याच्या हातातील पैसे हिसकावण्यात यश आलं. ते रक्कम घेऊन पळाले.

पोलिसांनी आरोपींना कसं पकडलं?

मात्र, झटापटीत एका आरोपीला पकडण्यात टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यांना यश आले. त्या आरोपीच्या चौकशीतून इतर आरोपींची माहिती मिळाली. पोलिसांनी त्यानंतर इतर दोन्ही आरोपींनाही अटक केली. तिघांवर भा.द.वी कलम 392, 394, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या आरोपींकडून चोरी करण्यात आलेली रोकड पोलिसांनी हस्तगत केली आहे. हा चोरीचा संपूर्ण थरार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.

संबंधित बातम्या :

चौकावर हातात तलवार घेऊन परिसरात दहशत माजवण्याचा प्रयत्न, पोलिसांनी सापळा रचत पकडलं, कुख्यात गुंडांना बेड्या

VIDEO : पुण्यात भर दिवसा रस्त्यावर तरुणाची कोयत्याने हत्या, घटना सीसीटीव्हीत कैद

बाईकच्या सीटखाली, पेट्रोल टाकीत तब्बल 500 दारुच्या बाटल्या लपवल्या, गुपित उघडल्यानंतर अटकेचा थरार

गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्.
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त.
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य.
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?.
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा.
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार.
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'.