‘माझा नाही तर कुणाचाच नाही’, लग्न ठरलेल्या प्रियकरावर तरुणीचा संताप, अंगावर काटा आणणारा प्रताप

प्रियकराचं दुसऱ्या मुलीसोबत लग्न ठरलं म्हणून एका तरुणीने मुलाच्या अंगावर अ‍ॅसिड ओतून त्याची हत्या केल्याची धक्कादायक घटना आग्र्यात घडली आहे (Agra Girl acid attack on her Boyfriend).

'माझा नाही तर कुणाचाच नाही', लग्न ठरलेल्या प्रियकरावर तरुणीचा संताप, अंगावर काटा आणणारा प्रताप
प्रियकराला घरी बोलावलं, आधी बाचाबाची मग बाटलीभर अ‍ॅसिड ओतलं
Follow us
| Updated on: Mar 26, 2021 | 2:56 PM

नवी दिल्ली : प्रियकराचं दुसऱ्या मुलीसोबत लग्न ठरलं म्हणून एका तरुणीने मुलाच्या अंगावर अ‍ॅसिड ओतून त्याची हत्या केल्याची धक्कादायक घटना आग्र्यात घडली आहे. मुलीने आपल्या घरी बोलवून तरुणावर अ‍ॅसिड ओतलं. त्यानंतर तरुण जोरजोरात ओरडू लागला. तडफडू लागला. त्याचा ओरडण्याचा आवाज ऐकून शेजारचे आले. त्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. तरुणाला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. आग्र्याच्या हरिपर्वत भागात ही घटना घडली (Agra Girl acid attack on her Boyfriend).

आरोपी मुलीला अटक

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी मुलीने आपल्या बॉयफ्रेंडला घराचा पंखा खराब झाल्याचं सांगितलं होतं. तो पंखा दुरुस्त करण्यासाठी तिने त्याला घरी बोलावलं. मात्र, मुलगा घरी आल्यावर तिने त्याच्या अंगावर अ‍ॅसिडचा हल्ला केला. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली. तरुणाला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण दुर्दैवाने उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. दरम्यान, पोलिसांनी आरोपी मुलीला अटक केली आहे. मुलीच्याही अंगावर थोड्याफार प्रमाणात अ‍ॅसिड पडलं होतं. त्यामुळे तिच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पण ती बरी झाली की तिच्यावर कारवाई केली जाईल, अशी माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे.

लग्न ठरल्यानंतर दोघांमध्ये वाद

आरोपी मुलगी सोनम ही पेशाने नर्स आहे. तर पीडित मुलगा देवेंद्र हा आग्र्यातील एका लॅबमध्ये असिस्टंट म्हणून कार्यरत होता. तो उत्तर प्रदेशच्या कासगंज येथील रहिवासी होता. देवेंद्र आणि सोनम यांच्या गेल्या कित्येक दिवसांपासून प्रेमसंबंध होते. मात्र, देवेंद्रचं लग्न ठरल्याने दोघांमध्ये वारंवार वाद व्हायला लागले. मुलाचं लग्न ठरलं असलं तरी ते एकमेकांच्या संपर्कात होते. त्यांचं नातं पूर्णपणे संपलेलं नव्हतं.

रागाच्या भरात अ‍ॅसिडचा हल्ला

देवेंद्रचं लग्न ठरल्याने सोनमला त्याचा प्रचंड राग आला होता. याच रागाच्या भरात तिने देवेंद्रवर अ‍ॅसिड हल्ला करण्याचं ठरवलं. तिने अचानक देवेंद्रला पंखा बिघडल्याचं सांगत तो पंखा सुधारण्यासाठी घरी बोलावलं. देवेंद्र घरी पोहोचल्यानंतर तिने त्याच्यासोबत शाब्दिक बाचाबाची करण्यास सुरुवात केली. त्यानंतर रागाच्या भरात तिने त्याच्या अंगावर अ‍ॅसिड टाकलं. त्यानंतर देवेंद्र जोरजोरात आरडाओरड करायला लागला. त्याचा ओरडण्याचा आवाज ऐकून आजूबाजूचे लोक त्याला रुग्णालयात घेऊन गेले. मात्र, उपचारादरम्यानच त्याचा मृत्यू झाला (Agra Girl acid attack on her Boyfriend).

हेही वाचा : मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील महिला वनअधिकाऱ्याची आत्महत्या, सुसाईड नोटमध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यावर धक्कादायक आरोप

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.