कुणी कान तर कुणी लिंग कापलं, 200 ते 400 महिलांनी मिळून भर कोर्टात ‘त्याला’ संपवलं

अक्कू यादव हा सीरियल रेपिस्टसह सीरियल किलर होता. त्याने 10 वर्षाच्या लहान मुलीलादेखील सोडलं नव्हतं. त्याच्या कृत्यांमुळे संपूर्ण कस्तूरबा वस्तीत दहशत होती. त्यामुळे तो जेव्हा वस्तीतून जायचा तेव्हा सर्व महिला घरात लपून जायच्या. महिला आपल्या मुलींना देखील घरात लपवायच्या. त्याच्या नजरेत एखादी महिला पडली आणि त्याला ती आवडली तर तो तिला कोणत्याही परिस्थीत आपलं शिकार बनवण्यासाठी प्रयत्न करायचा.

कुणी कान तर कुणी लिंग कापलं, 200 ते 400 महिलांनी मिळून भर कोर्टात 'त्याला' संपवलं
Follow us
| Updated on: Dec 29, 2023 | 3:58 PM

मुंबई | 29 डिसेंबर 2023 : काही गुन्हेगारीच्या घटना इतक्या भयानक आणि चित्तथरारक असतात की, त्या घटनांचं विस्मरण होणं हे नियतीला अमान्य असतं. या घटना त्या काळातल्या भयावह परिस्थितीची जाणून करून देत असतात, ज्याच्या जखमा या समाजावर खोलवर रूतल्या गेल्या आहेत. या घटनांनी किती जणांचा बळी घेतला याचा आकडा आजही सांगता येणार नाही. पण गुन्हेगारी, क्रूरता जितकी टोकाला जाते तितकाच भीषण त्याचा अंत होतो हे आपल्याला मान्य करावं लागेल. नागपुरात 1990 च्या दशकात असाच अराजकतेचा हैदोस माजवणाऱ्या हैवानाचा अंत देखील तसाच झाला. या हैवानाने शेकडो मुली, महिलांवर बलात्कार केला होता. अनेकांचं घरदार, संसार उद्ध्वस्त केलं, अनेकांची हत्या केली. अपहरण, दरोडा, खंडणी हा त्याचा रोजचा धंदा होता. हा नराधम इतका वासनांध होता की त्याने 10 वर्षाच्या मुलीलाही सोडलं नाही. नागपूरच्या कस्तूरबा नगर झोपडपट्टीतल्या शेकडो घरांमधील महिलांना त्याने लक्ष्य केलं होतं. त्यामुळे त्याच्याविरोधात महिलांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला होता.

स्त्रियांना भारतीय समाजात देवीचं स्थान आहे. या स्त्रिया खूप संयमी आणि हळव्या असतात. पण ज्यावेळी अधर्माचा हाहा:कार होतो, स्त्रियांवर पाशवी बलात्कार होतो, तेव्हा याच स्त्रिया अक्कू यादव सारख्या महिषासुरांना संपविण्यासाठी दुर्गा आणि चंडी बनतात. या घटनेची इतिहासात नोंद झालीय. जवळपास 200 ते 400 महिलांनी एकत्र येऊन अक्कू यादवचा खात्मा केला. या महिलांनी भर कोर्टात जजसमोर विटनेस बॉक्समध्ये उभ्या असलेल्या अक्कू यादववर हल्ला केला.

महिलांनी अक्कू यादवच्या शरीरावर चाकूने भोसकलं, त्याला चापटा मारल्या, बुक्के मारले, एका महिलेने रोषात त्याचा कान कापला, तर दुसऱ्या महिलेने त्याचं लिंग धडापासून वेगळं केलं. भर कोर्टात अक्कू यादव धारातीर्थ पडला. अखेर या २०० महिलांच्या हल्ल्यात अक्कू यादवचं रक्ताळलेलं शरीर थंड झालं. त्याने श्वास सोडला आणि महिलांचा जमाव शांत झाला. या महिलांनी अक्कू यादवच्या हत्येची जबाबदारी घेतली. पोलिसांनी त्याचवेळी काही महिलांना ताब्यात घेतलं. या हत्याकांडामागची भयावह कहाणी त्यापेक्षा कित्येक पटीने क्रूर आहे. त्यातील काही घटनांची नोंद झालीय. त्याच घटनांची सविस्तर माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत.

अक्कू यादवची कस्तूरबा नगरमध्ये दहशत

भरत कालीचरण उर्फ अक्कू यादवचा जन्म 1971 मध्ये नागपूर शहराबाहेरच्या परिसरात झाला होता. संबंधित परिसर कस्तूरबा नगर झोपडपट्टी म्हणून प्रसिद्ध होता. अक्कू यादवला दोन भाऊ होते. एकाचं नाव संतोष, तर दुसऱ्याचं नाव युवराज होतं. त्याचं कुटुंब तिथेच लहान-मोठा व्यवसाय करुन उदरनिर्वाह भागवत होतं. त्या वस्तीत दोन गुंडांच्या गँग होत्या. यापैकी एका गँगसोबत अक्कू यादव काम करत होता. या दोन्ही गँग कस्तूरबा नगरच्या झोपडपट्टीवर वर्चवस्व निर्माण करण्यासाठी आपापसात संघर्ष करायच्या. यादरम्यान 1990 च्या दशकात अक्कू यादवने कस्तूरबा नगर झोपडपट्टीत दहशत निर्माण केली.

अक्कू यादव तक्रार करणाऱ्यांना खूप छळायचा

अक्कू यादवचा मृत्यू होण्याआधी त्याच्याविरोधात दोन डझनपेक्षा जास्त गुन्हे दाखल झाले होते. तसेच त्याला 14 वेळा अटक करण्यात आली होती. त्याच्याविरोधात बलात्कार, हत्या, दरोडा, हल्ल्याचा प्रयत्न, हल्ल्याची धमकी अशा प्रकारचे अनेक गुन्हे दाखल करण्यात आले होते. अक्कू यादव हा अतिशय भयानक गुंड होता. तो गुन्हेगारी जगतातले काळे धंदे करायचा. त्याच्या या काळ्या धंद्यांचा सुगावा कुणाला लागला आणि त्याने पोलिसात तक्रार देण्याचा प्रयत्न केला तर अक्कू यादव संबंधित व्यक्तीला जीवे मारण्याची धमकी द्यायचा. अक्कू यादव अशा व्यक्तीचं जीवन जगणं कठीण करुन बसायचा. त्या व्यक्तीच्या घरात घुसून त्याला मारहाण करायचा. अक्कू यादव अशा नागरिकांचं अपहरण करायचा. वेळप्रसंगी तो त्याची हत्या करायचा.

अक्कू यादवला पोलिसांची साथ असल्याचा आरोप

विशेष म्हणजे या विकृत अक्कू यादवला पोलिसांची देखील साथ होती, असा आरोप नेहमी होत आला आहे. याशिवाय अक्कू यादवच्या हत्याकांडावर जे चित्रपट, वेबसीरिज निर्माण झाले आहेत त्यामध्ये पोलिसांच्या मदतीवे अक्कू यादवने कशाप्रकारे गुन्हेगारीचा हैदोस माजवला ते स्पष्टपणे दाखवण्यात आलं आहे. अक्कू यादव पोलिसांना लाच द्यायचा. त्यामुळे पोलीस या अक्कू यादवच्या मुसक्या आवळण्याऐवजी त्याला अभय द्यायचे.

अक्कू यादव हा सीरियल रेपिस्ट आणि सीरियल किलर

अक्कू यादव हा सीरियल रेपिस्टसह सीरियल किलर होता. त्याने 10 वर्षाच्या लहान मुलीलादेखील सोडलं नव्हतं. त्याच्या कृत्यांमुळे संपूर्ण कस्तूरबा वस्तीत दहशत होती. त्यामुळे तो जेव्हा वस्तीतून जायचा तेव्हा सर्व महिला घरात लपून जायच्या. महिला आपल्या मुलींना देखील घरात लपवायच्या. त्याच्या नजरेत एखादी महिला पडली आणि त्याला ती आवडली तर तो तिला कोणत्याही परिस्थीत आपलं शिकार बनवण्यासाठी प्रयत्न करायचा. यासाठी तो गोड बोलून अत्याचार करायचा किंवा अतिशय निर्घृणपणे अत्याचार करायचा. त्यानंतर तो महिलांची हत्यादेखील करायचा. पीडित व्यक्तीला तो इतकं जखमी करायची की त्या व्यक्तीचा वेदनांनी तडफडून मृत्यू व्हायचा.

महिलेवर 16 वर्षाच्या नातीसमोर बलात्कार करुन हत्या

अक्कू यादवने कस्तूरबा नगरच्या अनेक झोपड्यांमधील महिलांवर बलात्कार केला. तो कधी कुणाची दुचाकी हिसकावून घ्यायचा. त्याने एकदा अंजनाबाई बोरकर यांच्या मुलगी आशाबाई यांची 16 वर्षाच्या नातीसमोर बलात्कार करुन हत्या केली होती. तो एवढ्यावरच थांबला नाही तर आशाबाईच्या मृत्यनंतर त्याने त्यांच्या कानातील आणि हाताच्या बोटामधील सोनं पळवून नेण्यासाठी थेट कान आणि बोट कापलं होतं. इतका क्रूर हा अक्कू यादव होता.

पहाटे दरवाज्यावर आला, पतीवर हल्ला, नंतर निर्जनस्थळी नेत बलात्कार

एका पीडित महिलेने तर अक्कू यादवच्या क्रूरतेबाबत आणखी एक आपबिती सांगितली होती. अक्कू यादव पहाटे चार वाजता घराच्या दरवाजावर आला. त्याने दरवाजा ठोठावला. त्याला आतून कोण आहे? असं विचारलं तर त्याने पोलीस असल्याचं भासवलं. महिलेच्या पतीने दरवाजा उघडताच तो घरात शिरला. त्यानंतर त्याने लगेच महिलेच्या पतीवर चाकूने वार केला. त्याला जखमी करत बाथरुममध्ये बंद केलं. त्यानंतर तो पीडित महिलेच्या केसांना धरुन तिला एका सामसूम ठिकाणी घेऊन गेला. तिथे त्याने महिलेवर अमानुष अत्याचार केला. महिलेवर बलात्कार केल्यानंतर काही महिन्यांनी तिने प्रचंड विनवण्या केल्यानंतर अक्कू यादवने तिची सुटका केली.

कल्पनाही करता येणार नाही इतकं क्रूर कृत्य

अक्कू यादवने एका व्यक्तीला सर्वांसमोर नागडं करुन त्याला सिगारेटने जाळलं होतं. त्याने एकदा एका महिलेवर इतके भयानक अत्याचार केले होते की आपण तशी कल्पना देखील करु शकत नाही. त्याने एका महिलेला तिच्या मुली आणि शेजाऱ्यांसमोर अत्याचार केला होता. त्याने सर्वांसमोर त्या महिलेला विवस्त्र करत तिचे स्तन कापले होते. त्यानंतर त्याने तिच्या शरीराचे तुकडे-तुकडे करत तिची हत्या केली होती.

अक्कू यादवने त्याच्या सहकाऱ्यांसोबत एका महिलेवर तिच्या डिलीवरीनंतर अवघ्या दहा दिवसांनंतर सामूहिक अत्याचार केला होता. त्यानंतर त्या महिलेने स्वत:वर रॉकेल टाकून पेटवून घेतलं होतं. अक्कू यादवचा शेजारी असलेल्या अविनाश तिवारीने त्याच्याविरोधात पोलिसात तक्रार देण्याचा निश्चय केला होता. पण तो तसं करु शकला नाही. कारण त्याआधीच अक्कू यादवने त्याची हत्या केली होती.

उषा नारायण महिलेने आवाज उठवला

अक्कू यादवच्या विरोधात उषा नारायण नावाच्या महिलेने आवाज उठवला होता. या महिलेने अक्कूच्या गँगच्या विरोधात लोकांना जागरुत करण्याचा प्रयत्न केला होता. लोक उषा नारायणच्या आवाहनाने प्रभावित झाले. उषा नारायण यांनी लढा दिला. त्याने उषा नारायण यांनाही धमकावण्याचा प्रयत्न केला. त्याने उषा यांच्या घराबाहेर चारही बाजूने घेरलं होतं. त्यावेळी उषा यांनी घरातील गॅस सिलेंडरचा स्फोट घडवून आणण्याची धमकी दिली होती. ते पाहून अक्कूचे सर्व सहकारी मागे फिरले होते. आपल्यासोबत कुणीच थांबायला तयार नाही हे पाहून अक्कूदेखील मागे फिरला. ही बाब आजूबाजूच्या लोकांच्या लक्षात आली.

त्यांनी अक्कू यादव आणि त्याच्या माणसांच्या दिशेने आक्रमण केलं. लोकांनी अक्कू यादवच्या गँगवर दगडफेक केली. एवढंच नाही तर संतप्त जमावाने अक्कूचं घरही जाळून टाकलं. लोकांचा आक्रोश पाहता अक्कूने स्वत:ला पोलिसांच्या स्वाधिन केलं. तो पोलिसांकडे सरेंडर झाला. त्याच्या विरोधात अनेक गुन्हे दाखल झाले होते. त्याच्यावर आता कोर्टात सुनावणी होणार होती.

अक्कूचा 200 ते 400 महिलांनी केला खात्मा

अक्कू यादवला 13 ऑगस्ट 2004 ला कोर्टात हजर करण्यात आलं. त्याला कोर्टात हजर करणार ही बातमी संपूर्ण नागपुरात वाऱ्यासारखी पसरली होती. त्याला कोर्ट नंबर 7 मध्ये हजर करण्यात आलं होतं. या दिवशी शेकडो महिला कोर्ट परिसरात हजर होत्या. त्याला कोर्टात नेल्यानंतर 200 ते 400 महिलांचा भलामोठा जमाव कोर्टाच्या दिशेला गेला. या महिलांनी कोर्टात विटनेस बॉक्समध्ये उभ्या असलेल्या अक्कू यादववर हल्ला केला.

महिलांनी आधी त्याच्या डोळ्यात मिरची पूड टाकली. त्यानंतर त्याच्यावर प्रचंड चाकूने वार केले. एका महिलेने तर त्याचं लिंग कापलं. तर एका महिलेने त्याचा कान कापला. हा हल्ला पाहून कोर्टाचे न्यायाधीशही जागेवर स्तब्ध झाले. पोलीसही काहीच करु शकले नाहीत. सर्व महिलांनी अक्कू यादवच्या हत्येची जबाबदारी घेतली. पोलिसांनी काही महिलांना अटक केली. या प्रकरणी महाराष्ट्राच्या सीआयडीने देखील तपास केला. पोलिसांचं म्हणणं होतं की, जेव्हा अक्कू यादववर मॉब लिंचिंग झालं तेव्हा चार पुरुषांनी मिळून त्याची हत्या केली. पण महिला त्या चार पुरुषांना वाचवत आहेत. पण महिलांना तो दावा फेटाळला होता.

Non Stop LIVE Update
शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार आजच होणार जाहीर, संजय शिरसाट म्हणाले...
शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार आजच होणार जाहीर, संजय शिरसाट म्हणाले....
शरद पवारांच्या NCPकडून एबी फॉर्मचं वाटप सुरू, 3 जणांची उमेदवारी फिक्स
शरद पवारांच्या NCPकडून एबी फॉर्मचं वाटप सुरू, 3 जणांची उमेदवारी फिक्स.
झिशान सिद्दीकी वांद्रे पूर्व मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात
झिशान सिद्दीकी वांद्रे पूर्व मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात.
'राऊतांना झोपताना झाडं अन् उठताना डोंगर...', शहाजी बापूंचं प्रत्युत्तर
'राऊतांना झोपताना झाडं अन् उठताना डोंगर...', शहाजी बापूंचं प्रत्युत्तर.
उन्मेष पाटलांना उमेदवारी, ठाकरे गटाकडून होणार अधिकृत घोषणा?
उन्मेष पाटलांना उमेदवारी, ठाकरे गटाकडून होणार अधिकृत घोषणा?.
अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या 'या' नेत्यानं घेतली ठाकरेंची 'मशाल' हाती
अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या 'या' नेत्यानं घेतली ठाकरेंची 'मशाल' हाती.
अमोल मिटकरींना उमेदवारी मिळणार की नाही?, अजितदादांनी तडकाफडकी बोलावलं
अमोल मिटकरींना उमेदवारी मिळणार की नाही?, अजितदादांनी तडकाफडकी बोलावलं.
'भाई को उडा देंगे, 5 करोड दे दो..', म्हणणारा आता म्हणतो, सलमान भाईजान
'भाई को उडा देंगे, 5 करोड दे दो..', म्हणणारा आता म्हणतो, सलमान भाईजान.
'ते 5 कोटी शहाजी बापूंचे? एकच गाडी सापडली अशा..',रोहित पवारांचा निशाणा
'ते 5 कोटी शहाजी बापूंचे? एकच गाडी सापडली अशा..',रोहित पवारांचा निशाणा.
'भाजपच्या यादीत धक्कातंत्र नव्हतं पण आमची यादी...', कोणाचा गौप्यस्फोट?
'भाजपच्या यादीत धक्कातंत्र नव्हतं पण आमची यादी...', कोणाचा गौप्यस्फोट?.