AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ambernath | राष्ट्रवादी शहराध्यक्षावर भावाचा हल्ला, मोबाईलच्या टॉवरवरुन वाद

मोबाईल टॉवरच्या वादातून राष्ट्रवादी काँग्रेसचे अंबरनाथ शहराध्यक्ष सदाशिव पाटील यांच्यावर त्यांच्या भावानेच हल्ला केला. त्यापूर्वी सदाशिव पाटील आणि टॉवर दुरुस्त करणाऱ्या इंजिनिअरमध्ये वाद सुरु होता. हा वाद विकोपाला जात असल्यामुळे पाटील यानी भांडण येत सोडवण्याचा प्रयत्न केला. मात्र पाटील मध्ये पडल्यामुळे त्यांचा भाऊ जनार्दन पाटील यांनी त्यांना थेट मारहण केली.

Ambernath | राष्ट्रवादी शहराध्यक्षावर भावाचा हल्ला, मोबाईलच्या टॉवरवरुन वाद
संग्रहित छायाचित्र.
| Edited By: | Updated on: Nov 23, 2021 | 10:13 PM
Share

ठाणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे अंबरनाथ शहराध्यक्ष सदाशिव पाटील यांच्यावर हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडलीय. मोबाईल टॉवरच्या वादातून सख्ख्या भावानेच हा हल्ला केल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रकरणी सदाशिव पाटील यांचे भाऊ जनार्दन पाटील आणि त्यांच्या मुलाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय.

भाऊ जनार्दन पाटील यांनी त्यांना थेट मारहण केली

मिळालेल्या माहितीनुसार मोबाईल टॉवरच्या वादातून राष्ट्रवादी काँग्रेसचे अंबरनाथ शहराध्यक्ष सदाशिव पाटील यांच्यावर त्यांच्या भावानेच हल्ला केला. त्यापूर्वी सदाशिव पाटील आणि टॉवर दुरुस्त करणाऱ्या इंजिनिअरमध्ये वाद सुरु होता. हा वाद विकोपाला जात असल्यामुळे पाटील यानी भांडण सोडवण्याचा प्रयत्न केला. मात्र पाटील मध्ये पडल्यामुळे त्यांचा भाऊ जनार्दन पाटील यांनी त्यांना थेट मारहण केली. तसेच जनार्दन पाटील यांनी दुरुस्ती करणाऱ्या इंजिनिअरलाही मारहाण केली.

पोलिसात गुन्हा दाखल, तपास सुरु

हा प्रकार घडल्यानंतर सदाशिव पाटील यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात जनार्दन पाटील आणि त्यांचा मुलगा कल्पेश यांच्याविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

भाजपच्या माजी आमदाराचा आत्महत्येचा प्रयत्न

तर दुसरीकडे अहमदनगर जिल्ह्यात भाजपचे माजी आमदारी बाळासाहेब मुरकुटे यांनी गळफास लावून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. नेवासा येथील कृषीपंपांची वीज तोडण्यात येऊ नये अशी मागणी भाजपकडून केली जात आहे. या आंदोलनात भाजपचे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनीदेखील सहभाग घेतला होता. मात्र आंदोलन करुनदेखील मागण्या मान्य होत नसल्यामुळे भाजपने आक्रमक पवित्रा धारण केला. त्यानंतर मुरकुटे यांनी नेवासा वीज वितरण कार्यालयात जाऊन गळफास लावून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यांची प्रकृती सध्या स्थीर असून त्यांच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

इतर बातम्या :

Muslim Reservation : ‘एमआयएम’चा 11 डिसेंबरला एल्गार, मुस्लिम आरक्षणासाठी ‘चलो मुंबई’चा नारा

‘तलवार नही, कलम जिंदा रखेगी तुमको’, सोलापुरात ओवेसींकडून ‘फुले आंबेडकरांचा’ धडा, नेमके काय म्हणाले?

Breaking : एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर तोडगा निघण्याची शक्यता, शरद पवारांच्या अनिल परबांना कोणत्या महत्वाच्या सूचना?

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.