Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Murder: आईची अब्रू वाचवण्यासाठी वृध्दाची केली हत्या; दोन अल्पवयीन मुली गजाआड

पोलिसांनी सांगितले की, 15 आणि 16 वयोगटातील मुलींना सुधारगृहात ठेवण्यात आले आहे. या दोन्ही मुलींना बुधवारी बाल न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. पोलिसांचे म्हणणे आहे की, मृत वृद्धाची पत्नी काही कामानिमित्त कोझिकोडला गेली होती. त्यावेळी त्याने महिलेच्या लैंगिक शोषणाचा प्रयत्न केल्याची ही घटना घडली.

Murder: आईची अब्रू वाचवण्यासाठी वृध्दाची केली हत्या; दोन अल्पवयीन मुली गजाआड
प्रातिनिधिक छायाचित्र
Follow us
| Updated on: Dec 29, 2021 | 5:55 PM

कोझिकोड : दोन अल्पवयीन मुलींनी त्यांच्या आईचे लैंगिक शोषण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या 70 वर्षीय वृद्धाला बेदम मारहाण करून हत्या केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणात दोन्ही मुलींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या वृद्धाने अल्पवयीन मुलींच्या आईवर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला, त्यानंतर मुलींनी आईची इज्जत वाचवण्यासाठी हे पाऊल उचलल्याचे पोलिसांनी सांगितले. ही घटना वायनाड जिल्ह्यातील ऐरमकोल्ली येथे घडली आहे. दोन्ही मुली अल्पवयीन असल्याने पोलिसांनी त्यांची शेल्टर होममध्ये रवानगी केली आहे.

पोलिसांकडून मुलींच्या आईला अटक

पोलिसांनी दोन्ही मुलीच्या आईला हत्येच्या आरोपाखाली अटक केली आहे. ठार झालेला वृद्ध हा मुलींचा नातेवाईक असल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेनंतर दोन्ही मुली आणि त्यांच्या आईने पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले. या मुली आणि त्यांची आई मारल्या गेलेल्या व्यक्तीच्या घराजवळच्या घरात राहत होत्या. पोलिसांना एका प्लॉटमध्ये वृद्धाचा मृतदेह आढळून आला. मृतदेह एका गोणीत भरून खड्ड्यात ठेवण्यात आला होता.

पोलिसांनी सांगितले की, 15 आणि 16 वयोगटातील मुलींना सुधारगृहात ठेवण्यात आले आहे. या दोन्ही मुलींना बुधवारी बाल न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. पोलिसांचे म्हणणे आहे की, मृत वृद्धाची पत्नी काही कामानिमित्त कोझिकोडला गेली होती. त्यावेळी त्याने महिलेच्या लैंगिक शोषणाचा प्रयत्न केल्याची ही घटना घडली.

आईला लैंगिक अत्याचारापासून वाचवण्यासाठी केली हत्या

पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीत, अल्पवयीन मुलींनी म्हटले आहे की, रात्री 11 वाजण्याच्या सुमारास वृद्धाने त्यांच्या आईवर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुली आणि त्यांच्या आईला लैंगिक अत्याचारापासून वाचण्यासाठी प्रतिकार केला. पण वृद्धाने महिलेची अब्रू लुटण्याचा प्रयत्न केला. यानंतर मुलींनी वृद्धावर हल्ला केला आणि डोक्यावर आणि मानेवर वार करून त्याचा खून केला. (An old man who tried to sexually abuse women was murdered by her daughters)

इतर बातम्या

धक्कादायक! दहिसरमधील एका प्रतिष्ठित बँकेत गोळीबार, लूटमारीच्या उद्देशानं गोळीबार?

Italy Murder : पत्नीने सेक्स नकार दिला म्हणून पतीने चाकूने भोसकले, चारित्र्यावरही घ्यायचा संशय

संभाजीनगरच्या कुटुंबांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच थाटले संसार
संभाजीनगरच्या कुटुंबांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच थाटले संसार.
'हो, मीच हत्या केली..'; सुदर्शन घुलेचा कबुली जबाब
'हो, मीच हत्या केली..'; सुदर्शन घुलेचा कबुली जबाब.
पाणीबाणीला सुरुवात; 2 हंड्यापेक्षा जास्त पाणी घेतलं तर 100 रुपये दंड
पाणीबाणीला सुरुवात; 2 हंड्यापेक्षा जास्त पाणी घेतलं तर 100 रुपये दंड.
'कुणाल कामराला थर्ड डिग्रीचा वापर', शिवसेनेच्या बड्या मंत्र्याचा इशारा
'कुणाल कामराला थर्ड डिग्रीचा वापर', शिवसेनेच्या बड्या मंत्र्याचा इशारा.
मी नार्को टेस्टसाठी तयार, पण.. ; सतीश सालियान नेमकं काय म्हणाले?
मी नार्को टेस्टसाठी तयार, पण.. ; सतीश सालियान नेमकं काय म्हणाले?.
'तो' बलात्कार नाही, अलाहाबाद कोर्टाला फटकारल, 'राज्य महिला'कडून स्वागत
'तो' बलात्कार नाही, अलाहाबाद कोर्टाला फटकारल, 'राज्य महिला'कडून स्वागत.
धनंजय मुंडे यांनीच हे सगळं करायला सांगितलं; जरांगेंचा गंभीर आरोप
धनंजय मुंडे यांनीच हे सगळं करायला सांगितलं; जरांगेंचा गंभीर आरोप.
बाळासाहेबांच्या 'त्या' सूचना तरी मनसेकडून गुढीपाडवा मेळाव्याचे बॅनर्स
बाळासाहेबांच्या 'त्या' सूचना तरी मनसेकडून गुढीपाडवा मेळाव्याचे बॅनर्स.
महामार्गावर दारूच्या बॉटल्सने भरलेला ट्रक, मिटकरींनी पाठलाग केला अन्..
महामार्गावर दारूच्या बॉटल्सने भरलेला ट्रक, मिटकरींनी पाठलाग केला अन्...
सरकारला कोण जगतं, कोण मरतं याच्याशी देणघेण नाही; अंबादास दानवेंचा टोला
सरकारला कोण जगतं, कोण मरतं याच्याशी देणघेण नाही; अंबादास दानवेंचा टोला.