झारखंडमध्ये अंधश्रद्धेचा कळस! चेटकीण असल्याचे सांगत आधी महिलांना मारहाण, नंतर शरीराचे मांस काढून खाल्ले

पीडित महिलांनी पोलीस ठाण्यात लेखी तक्रार करून जीव वाचवण्याची विनंती केली आहे. सिसाई पोलीस स्टेशनच्या आसरो गावातील रहिवासी सरिता देवी यांनी शनिवारी डायन-बिसाहीच्या विरोधात एफआयआर दाखल केला आहे.

झारखंडमध्ये अंधश्रद्धेचा कळस! चेटकीण असल्याचे सांगत आधी महिलांना मारहाण, नंतर शरीराचे मांस काढून खाल्ले
चेटकीण असल्याचे सांगत आधी महिलांना मारहाण, नंतर शरीराचे मांस काढून खाल्ले
Follow us
| Updated on: Nov 07, 2021 | 5:34 PM

रांची : झारखंडमधील गुमला जिल्ह्यात मानवतेला काळिमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. अंधश्रद्धेच्या नावाखाली दोन महिलांना मारहाण करीत त्यांच्या शरीराचे मांस काढून खाल्ल्याची अंगावर शहारे आणणारी धक्कादायक घटना झारखंडमध्ये घडली आहे. राज्यात अंधश्रद्धेने कळस गाठला असून महिलांवरील अन्याय आणि अत्याचाराचा मोठी खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. गुमला जिल्ह्यातील घाघरा पोलीस स्टेशन अंतर्गत गमहरिया गावात ही घटना घडली आहे. टेंबो ओराव आणि बिपत ओराव अशी पीडित महिलांची नावे आहेत.

नेमकी घटना काय?

पीडित महिला शनिवारी रात्री आपल्या मुलीसह धान्य कोठारात भात काढण्याचे काम करीत होते. त्याचवेळी आरोपी तिथे आले आणि त्यांनी तिला चेटकीण म्हणत त्यांच्यावर हल्ला केला. हल्ल्यादरम्यान पीडितेने आरडाओरडा केल्याने गावकरी धावत आले. लोकांना पाहून हल्लेखोरांनी तेथून पळ काढला आमि महिलेचे घर गाठत तिच्या पतीला मारहाण केली. मारहाण करत असतानाच एक आरोपी चमू उराव याने महिलेच्या शरीराचा लचका तोडला आणि मांस चावून खाल्ले. गावकऱ्यांनी दोघींची सुटका करत तिघाही जखमींना उपचारासाठी रेफरल हॉस्पिटलमध्ये दाखल केले.

दोघींनी जादूटोणा करीत गाव उद्ध्वस्त केल्याचा आरोपींनी सांगितले

गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, या दोघांनी जादूटोणा करून संपूर्ण गाव उद्ध्वस्त केल्याचे हल्लेखोरांनी सांगितले. पीडित महिलांनी पोलीस ठाण्यात लेखी तक्रार करून जीव वाचवण्याची विनंती केली आहे. सिसाई पोलीस स्टेशनच्या आसरो गावातील रहिवासी सरिता देवी यांनी शनिवारी डायन-बिसाहीच्या विरोधात एफआयआर दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे स्टेशन प्रभारींनी सांगितले. या घटनेबाबत ग्रामस्थांकडून विचारपूस केली जात आहे. आरोपी फरार असून त्यांचा शोध सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले. फगुवा गोप, बेनी गोप, पवन गोप आणि पंकज गोप अशी फरार आरोपींची नावे आहेत. एसएचओ अभिनव कुमार यांनी सांगितले की, याप्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आला आहे. घटनेचा तपास करण्यात येत आहे. दोषींना शिक्षा केली जाईल. ठाणेदार म्हणाले की, जादूटोणा प्रकरणातून खून करणे हा अत्यंत गंभीर गुन्हा आहे. लोकांमध्ये जागृतीचा अभाव आहे. गावोगावी जाऊन जनजागृती करण्याचा पोलिसांचा प्रयत्न आहे. (Attempt to kill women in Jharkhand under the guise of superstition)

इतर बातम्या

Video |माळशिरसमध्ये बेकायदेशीररित्या रेड्यांच्या झुंजीचे आयोजन; एका रेड्याचा मृत्यू, कार्यक्रमाला सरपंच,उपसरपंच उपस्थित

चोरट्यांचा दिवाळीबारः नाशिकमध्ये घरफोडी करून मोत्याचा हार, सोन्या-चांदीचे दागिने, ताट-वाट्या लंपास

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.