AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

चेक सोडवण्याची बतावणी करुन महिलेला फसवले, दागिने पळवणाऱ्या भामट्याला बेड्या

सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने या तपासात संबंधित व्यक्ती सापडली. पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर त्याने त्याचे नाव शेख फेरोज शेख अहेमद (वय 42 वर्षे) असे सांगितले.

चेक सोडवण्याची बतावणी करुन महिलेला फसवले, दागिने पळवणाऱ्या भामट्याला बेड्या
औरंगाबाद स्थानिक गुन्हे शाखेने ताब्यात घेतलेला सराईत गुन्हेगार
| Edited By: | Updated on: Aug 27, 2021 | 6:48 PM
Share

औरंगाबाद: तुम्ही घरकुल योजनेचा फॉर्म भरला होता, त्या योजनेचा अडीच लाख रुपयांचा चेक आला असून तो सोडवून घेण्यासाठी 10 हजार रुपयांची गरज आहे, असे सांगत महिलेला गंडा घातल्याचा प्रकार औरंगाबाद शहरातीलनन (Aurangabad City) मिसारवाडी परिसरात घडला. विशेष म्हणजे, या भामट्याने आधी सदर महिलेच्या घरावर पाळत ठेवून, ज्या घरात कोणीही पुरूष नसल्याचे पाहून ही फसवणुकीची संधी साधली. महिलेकडे पैशांची मागणी करताना, आपण तिच्या पतीसोबत फोनवर बोलत असल्याचे खोटे नाटकही त्याने केले. तसेच तुमच्याकडे रोख रक्कम नसेल तर कानातील तसेच गळ्यातील दागिने काढून देण्यासही सांगितले. सदर महिलाही भामट्याच्या जाळ्यात आल्याने तिने पैसे व दागिने दिले. मात्र चोर निघून गेल्यावर आपण फसवले गेल्याचे संबंधित महिलेच्या लक्षात आले व पोलिसांकडे (City Police) तक्रार करण्यात आली. (Aurangabad crime branch arrests thief who stole jewellery of women)

सीसीटीव्हीच्या मदतीने चोर पकडला

संबंधित चोरीचे दृश्य एका सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाले होते. अशा प्रकारे चोरी झाल्याच्या तक्रारी आधीही नोंदवण्यात आल्याची माहिती, स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी मिसारवाडी परिसरात, सीसीटीव्ही मधील फुटेजनुसार संबंधित इसमाचा शोध सुरु केला. त्यानुसार पोलिसांनी शुक्रवारी 27 ऑगस्ट रोजी एका इसमाला ताब्यात घेतले. अधिक चौकशीनंतर संबंधित व्यक्तीने त्याचे  नाव शेख फेरोज शेख अहेमद (वय 42 वर्षे) असे सांगितले.

पोलिसांनाही उडवाउडवीची उत्तरं

शहारातील मिसारवाडी परिसरातून ताब्यात घेतलेल्या इसमाची पोलिसांनी चौकशी केली. सुरुवातीच्या चौकशीत त्याने औरंगाबादमधील मिसारवाडी भागातीलच रहिवासी असल्याचे सांगितले. मात्र पोलिसांनी  आणखी खोलात जाऊन चौकशी केली असता, तो बुलडाणा जिल्ह्यातील खामगाम येथील रहिवासी असल्याचे सांगितले. तसेच खामगावमधील शिवाजी नगर पोलिस ठाण्यात त्याच्यावर गुन्हेही दाखल आहेत.

सदर आरोपीकडून 60,000 रुपये किंमतीची होंडा शाईन मोटर सायकल जप्त करण्यात आली आहे. तसेच सदर गुन्ह्याचा पुढील तपास करण्यासाठी खामगावमधील शिवाजी नगर पोलिस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.

खोट्या थापांना भुलू नका- पोलिसांचे आवाहन

दिवसेंदिवस चोरीचे प्रमाण वाढत असून महिला किंवा ज्येष्ठ नागरिकांनी अनोळखी व्यक्तीवर पटकन विश्वास ठेवू नये, असे आवाहन स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी केले आहे. पती संकटात आहे किंवा तुमच्या महत्त्वाच्या कामासाठी पैसे हवे आहेत, मी तुमच्या पतीचा मित्र आहे अथवा तुमच्या मुलाचा मित्र आहे, असा बनाव करून अनेक महिला व ज्येष्ठ नागरिकांना गंडवल्याचे प्रकार वारंवार घडत आहेत. त्यामुळे नागरिकांनी खबरदारी बाळगण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. (Aurangabad crime branch arrests thief who stole jewellery of women)

रस्त्यावर चालताना मोबाईल घेऊन पळायचे, औरंगाबादेत दोन अट्टल चोरांना बेड्या

औरंगाबाद मोहटादेवी भाजी मंडई तोडफोडप्रकरणी भाजप शहराध्यक्षासह 25 जणांवर गुन्हे

ठाकरे बंधूंचं मराठी-मुस्लीम कॉम्बिनेशन, BMC निवडणुकीसाठी मतांची रणनीती
ठाकरे बंधूंचं मराठी-मुस्लीम कॉम्बिनेशन, BMC निवडणुकीसाठी मतांची रणनीती.
'लाव रे तो व्हिडीओ'तून भाजपनं काढले राज ठाकरेंचे जुने VIDEO
'लाव रे तो व्हिडीओ'तून भाजपनं काढले राज ठाकरेंचे जुने VIDEO.
निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शेलारांनी घेतली शिंदेंची भेट, कुठं एकत्र?
निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शेलारांनी घेतली शिंदेंची भेट, कुठं एकत्र?.
मतदारांना डांबलं तर 100 महिला नजरकैदेत! स्थानिक म्हणाले, भाजपच्या....
मतदारांना डांबलं तर 100 महिला नजरकैदेत! स्थानिक म्हणाले, भाजपच्या.....
अजित पवार कुठं स्वतंत्र लढणार? फडणवीसांसोबतच्या तासभर बैठकीत काय ठरल?
अजित पवार कुठं स्वतंत्र लढणार? फडणवीसांसोबतच्या तासभर बैठकीत काय ठरल?.
काँग्रेसचा 'मविआ'ला जबर धक्का, BMC निवडणुकीच्या तोंडावर मोठी घोषणा
काँग्रेसचा 'मविआ'ला जबर धक्का, BMC निवडणुकीच्या तोंडावर मोठी घोषणा.
राऊत पुन्हा शिवतीर्थवर, राज ठाकरेंसह युती, जागावाटप नेमकी कशावर चर्चा?
राऊत पुन्हा शिवतीर्थवर, राज ठाकरेंसह युती, जागावाटप नेमकी कशावर चर्चा?.
300 GB डेटा अन् 95 हजार फोटो... Epstein वरून पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
300 GB डेटा अन् 95 हजार फोटो... Epstein वरून पृथ्वीराज चव्हाणांचा दावा.
कुठं बोगस मतदार, कुठं पैशांचं वाटप तर..; अंबरनाथमध्ये मतदानाला गालबोट
कुठं बोगस मतदार, कुठं पैशांचं वाटप तर..; अंबरनाथमध्ये मतदानाला गालबोट.
निवडणूक आयोग नालायक... विजय वडेट्टीवार यांची तीव्र शब्दांत टीका
निवडणूक आयोग नालायक... विजय वडेट्टीवार यांची तीव्र शब्दांत टीका.