तिरुपतीचे बनावट पास देणाऱ्या भामट्याला बेड्या, 61भाविक दर्शनाविनाच परतले होते औरंगाबादेत
औरंगाबाद: तिरुपती बालाजी देवस्थानचे (Tirupati Balaji) बनावट पास देऊन 61 जणांची फसवणूक करणाऱ्या भामट्याला औरंगाबाद पोलिसांनी (Aurangabad Police) बेड्या ठोकल्या आहेत. औरंगाबादच्या गारखेडा (Garkheda) परिसरातून याला अटक करण्यात ग्रामीण सायबर पोलिसांना यश आले. अटक केल्यानंतर सदर आरोपीने त्याने केलेल्या फसवणुकीची कबुली दिल्याचे निरीक्षक रवींद्र निकाळजे यांच्याकडे दिली. बनावट पासमुळे दर्शनाविना बालाजीची वारी गारखेडा परिसरातील गजानन […]
औरंगाबाद: तिरुपती बालाजी देवस्थानचे (Tirupati Balaji) बनावट पास देऊन 61 जणांची फसवणूक करणाऱ्या भामट्याला औरंगाबाद पोलिसांनी (Aurangabad Police) बेड्या ठोकल्या आहेत. औरंगाबादच्या गारखेडा (Garkheda) परिसरातून याला अटक करण्यात ग्रामीण सायबर पोलिसांना यश आले. अटक केल्यानंतर सदर आरोपीने त्याने केलेल्या फसवणुकीची कबुली दिल्याचे निरीक्षक रवींद्र निकाळजे यांच्याकडे दिली.
बनावट पासमुळे दर्शनाविना बालाजीची वारी
गारखेडा परिसरातील गजानन नगर, गारखेडा येथील आशिष नारायण गुणाले याने बिडकीन येथील गणेश चौधरी व त्यांच्यासोबत 60 जणांकडून प्रत्येकी 300 रुपये घेतले. या सर्व प्रवाशांना तिरुपती बालाजीचे बनावट पास दिले. ते घेऊन 61 जण 17 सप्टेंबर 2021 रोजी तिरुपतीला पोहोचले. दर्शनाच्या रांगेत उभे असताना सुरक्षा अधिकाऱ्यांनी त्यांना पास मागितले. मात्र हे सर्व पास बनावट असल्याचे आढळून आले. त्यामुळे या सर्वांनाच दर्शनाच्या रांगेतून बाहेर काढण्यात आले. या फसवेगिरीमुळे हे सर्व भाविक बालाजीच्या दर्शनाविनाच औरंगाबादेत परतले.
सायबर पोलिसांकडे तक्रार
या फसवणुकीची तक्रार गणेश चौधरी यांनी ग्रामीण सायबर पोलीस ठाण्यात दिली. पोलीस अधीक्षक निमित गोयल, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. पवन बनसोड यांच्या मार्गदर्शनात निरीक्षक रवींद्र निकाळजे, उपनिरीक्षक प्रवीण पाटील, हवालदार रवींद्र लोखंडे, कैलास कामठे, संदीप वरपे, दत्ता तरटे आदींच्या पथकाने यासंबंधी तपास सुरु केला. त्यानुसार सदर आरोपीचा शोध घेऊन त्याला अटक करण्यात आली.
गुन्ह्यासाठी वापरलेले संगणक, प्रिंटर जप्त
सायबर पोलिसांनी बारकाईने तांत्रिक पद्धतीने तपास करून बनावट पास देणाऱ्या आरोपीला म्हणजेच आशिष गुणाले याला अटक केली. सुरुवातीला पोलिसांनी चौकशी केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र पोलिसांनी पोलिसी खाक्या दाखवला. तसेच सदर गुन्ह्याचे पुरावे दाखवल्यानंतर त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली. दरम्यान सायबर पोलिसांनी या गुन्ह्यासाठी वापरलेले संगणक, कलर प्रिंटर, स्कॅनर आणि मोबाइल जप्त केले आहेत.
वाइन शॉपवरील खुनी 24 तासात अटकेत
रविवारी रात्री बजरंग चौकात वाईन शॉपीच्या काउंटरवर सिद्धार्थ रंगनाथ हिवराळे याचा खून करण्यात आला होता. विशाल राम आगळे याने चाकूने भोसकून हा खून केला आणि तो पळून गेला होता. सिडको पोलीस ठाण्यासह गुन्हे शाखेचे पथक या खुन्याच्या शोधात होते. दरम्यान सिडको पोलिसांच्या पथकाला विशाल हा जाधववाडी येथील नवा मोंढा परिसरात लपून बसलेला असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी मोठ्या शिताफीने सापळा रचत विशालला बेड्या ठोकल्या. सिद्धार्थ आणि आरोपी विशाल मित्र होते. पण त्यांच्यात बरेच वादही होते. मात्र सिद्धार्थ मला मारणार असल्याचे काही मित्रांनी सांगितल्याने मीच त्याचा खून केला, अशी कबूली विशालने दिली.
इतर बातम्या-
Aurangabad: जिल्ह्यातील प्रमुख पर्यटन स्थळे खुली, 10 ऑक्टोबरपासून सर्व वयोगटातील नागरिकांना प्रवेश