Aurangabad | 5 वर्षे मोठी पत्नी, स्वयंपाक येत नाही, हॉटेलमध्ये गेल्यावर प्लेट उचलून ठेवते… औरंगाबादेत I Quit म्हणत तरुणाची आत्महत्या!!

आत्महत्या करण्यापूर्वी अजयने आय क्वीट असे व्हॉट्सअप स्टेटस ठेवले. ते पाहून त्याचे मित्र घरी भेटण्यासाठी आले. मित्र खोलीत गेले असता अजयने गळफास घेतल्याचे दिसले.

Aurangabad | 5 वर्षे मोठी पत्नी, स्वयंपाक येत नाही, हॉटेलमध्ये गेल्यावर प्लेट उचलून ठेवते... औरंगाबादेत I Quit म्हणत तरुणाची आत्महत्या!!
Follow us
| Updated on: May 17, 2022 | 9:57 AM

औरंगाबादः पत्नी (My wife) माझ्यापेक्षा वयाने पाच वर्षाने मोठी आहे. तिला नीट स्वयंपाकही येत नाही. साडीही चांगली नेसत नाही. हॉटेलमध्ये (Hotel) जेवायला गेल्यावरही ती प्लेट उचलून ठेवते. त्यामुळे ती आवडत नाही, अशी भावना बळावल्याने एका तरुणाने आत्महत्या केल्याची घटना औरंगाबादमध्ये घडली आहे. मला ती पसंतच नाही, अशी सुसाइड नोट (Suicide note) लिहून I Quit असे स्टेटस ठेवून तरुणाने राहत्या घरात गळफास घेतला. शहरातील मुकुंदवाडी परिसरातील राजनगरात ही घटना घडली. अजय समाधान साबळे असे या गळफास घेतलेल्या तरुणाचे नाव आहे. लग्न झाल्यापासूनच तो नाराज असल्याचे पोलिसांच्या चौकशीतून समोर आले.

नेमकं कारण काय?

या प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अजय समाधान साबळे असे मृताचे नाव आहे. तो मुकुंदवाडी परिसरात राजनगर येथे आई-वडील व पत्नीसोबत राहत होता. प्लंबरचे काम करणाऱ्या अजयचे पाच महिन्यांपूर्वी लग्न झाले होते. पण लग्नानंतर तो नाराजच होता. त्याच्या सोशल मीडिया अकाउंटलाही निराशाजनक विचार होते. काही दिवसांपूर्वी त्याची पत्नी माहेरी गेली होती. रविवारी रात्री साडेनऊच्या सुमारास जेवण केल्यानंतर दुसऱ्या मजल्यावरील खोलीत जाऊन त्याने गळफास घेतला.

हे सुद्धा वाचा

स्टेटसवरून उलगडले कारण

दरम्यान, आत्महत्या करण्यापूर्वी अजयने आय क्वीट असे व्हॉट्सअप स्टेटस ठेवले. ते पाहून त्याचे मित्र घरी भेटण्यासाठी आले. मित्र खोलीत गेले असता अजयने गळफास घेतल्याचे दिसले. सदर घटनेची माहिती मुकुंदवाडी पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी अजयला बेशुद्धावस्थेत दाखल केले. डॉक्टरांनी तपासून तो मृत असल्याचे घोषित केले. अजयच्या खोलीत पोलिसांना सुसाइड नोट मिळाली. त्यात त्याने लिहिले होते की, बायको मनासारखी मिळाली नाही, तिला साडीही नीट नेसता येत नाही. हॉटेलमध्ये गेल्यावरही जेवणाचे ताट उचलून ठेवते, असे लिहिले होते. आता या चिठ्ठीतील हस्ताक्षर अजयचेच आहे का, याचा तपास पोलीस करत आहेत. या प्रकरणी मुकुंदवाडी ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद कऱण्यात आली.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.