Baba Siddique Death: बाबा सिद्दिकी यांच्यावरील गोळीबारानंतर सलमान खानचा ‘तो’ मोठा निर्णय, अभिनेत्याने थेट…
baba siddique and salman khan relation: बाबा सिद्दिकी याच्या हत्येनंतर सलमान खान खूप दु:खी झाला आहे. बाबा सिद्दिकी सलमानसाठी फक्त मित्रच नव्हते तर एक परिवारातील सदस्य होते. या घटनेनंतर अरबाज खान आणि सोहेल खान प्रचंड दु:खी झाले आहे.
baba siddique and salman khan relation: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दिकी यांच्या हत्येनंतर संपूर्ण बॉलीवूड हादरला आहे. बाबा सिद्दिकी यांच्या हत्येमुळे अभिनेता सलमान खान यांच्यावर मोठा अघात झाला आहे. सलमान खान याचे बाबा सिद्दिकी यांचे भावासारखे नाते होते. बाबा सिद्दिकी यांनीची सलमान खान आणि शाहरुख खान यांच्यातील वाद मिटवला होता. आता या प्रकरणानंतर सलमान खान याच्याही सुरक्षेबाबत चिंता निर्माण झाली आहे. त्यामुळे वांद्रे येथील त्याच्या गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये सुरक्षा वाढवली आहे. तसेच सलमान खानचा परिवार आणि जवळच्या मित्रांनी त्यांना आता बाबा सिद्दिकी यांच्या घरी जाऊ नको, असा सल्ला दिला होता. परंतु सलमान खान याने तो सल्ला धुकडकून लावत बाबा सिद्दिकी यांचे निवास्थान गाठले. तसेच त्याचे आगामी सर्व शुटिंग रद्द केले आहे.
सलमान खान याच्या जवळच्या मित्राने ‘इंडिया टुडे’ला सांगितले की, बाबा सिद्दिकी याच्या हत्येनंतर सलमान खान खूप दु:खी झाला आहे. बाबा सिद्दिकी सलमानसाठी फक्त मित्रच नव्हते तर एक परिवारातील सदस्य होते. नुकतेच बाबा सिद्दिकी यांचा मुलगा जीशान हे सलमान खानच्या निवास्थानी पोहचले. त्यावेळी सलमानकडून त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले होते. सलमान या घटनेनंतर तातडीने सर्व सोडून बाबा सिद्दिकी यांच्या घरी पोहचला.
सलमान रात्रभर झोपला सुद्धा नाही…
बाबा सिद्दिकी यांच्या हत्येनंतर सलमान खान शनिवारीच लीलावती रुग्णालयात पोहचले. घरी आल्यानंतर सलमान रात्रभर झोपू सुद्धा शकला नाही. सतत जीशानकडून प्रत्येक अपडेट घेत होता. फोनवर दफनविधीच्या तयारीची माहिती घेत होता. तसेच सलमान खान याने पुढील काही दिवसांसाठी आपले सर्व कार्यक्रम रद्द केले आहे. बाबा सिद्दिकी फक्त सलमान याच्या जवळचे नव्हते तर त्याच्या परिवारातील सदस्यांच्या जवळचे होते. त्यामुळे या घटनेनंतर अरबाज खान आणि सोहेल खान प्रचंड दु:खी झाले आहे. इफ्तार पार्टीत ते सर्व नेहमी एकत्र दिसत होते.
इफ्तार पार्टीत असते अख्खे बॉलीवूड
बाबा सिद्दिकी बॉलीवूडमध्ये अनेकांचे जवळचे होते. बॉलीवूडमधील लोकांच्या इतक्या जवळ असणारे ते एकमेव राजकीय नेते होते. त्यामुळे त्यांच्याकडून दिल्या जाणाऱ्या इफ्तार पार्टीत बॉलीवूडमधील सर्वच दिग्गज हजेरी लावत होते. या हत्येची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोई गँगने घेतली असली तरी मुंबई पोलिसांनी अजून त्याला दुजोरा दिला आहे.