मारहाण झालेल्या युवकाचा काकाला अखेरचा कॉल; “काका मला वाचवाची आर्त हाक…”
मला लवकर वाचवायला या अशी आर्त हाक मृत्यूपूर्वी नितीनने दिली होती. फोनवरून झालेला अखेरचा संवाद व्हायरल झालाय. नितीनला खाजगी रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर तेथून शासकीय रुग्णालयात नेत असताना त्याचा मृत्यू झाला.
सोलापूर : मारहाणीत (Beating) मृत्यू झालेल्या युवकाचा आपल्या काकाला केलेला अखेरचा कॉल ठरला. “काका मला वाचवाची आर्त हाक…” तो देत होता. पण, सासरा आणि मेहुण्याचा मारहाणीत त्याचा मृत्यू झाला. घटस्फोट (Divorce) देण्याच्या कारणावरून सासरा आणि मेहुण्याकडून जावयाला बेदम मारहाण केली. सासरा आणि मेहुण्याकडून केलेल्या मारहाणीत जावयाचा मृत्यू झाला. नितीन पतंगराव (Nitin Patangrao) असे या 27 वर्षीय मृत जावयाचे नाव आहे. मुलीला सोडचिट्टी का देतोस या वादातून सासऱ्याने जावयाला मारहाण केल्याचा मुलाच्या कुटुंबीयांचा आरोप आहे. सासरे महेश शेजेराव आणि मेहुणा हर्षवर्धन शेजेराव यासह आठ ते दहा जणांनी लोखंडी रॉड आणि काठीने मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला.
रुग्णालयात मोठी गर्दी
जबर मारहाण झाल्याने खाजगी रुग्णालयातून पुढील उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर शासकीय रुग्णालयात नेत असताना उपचारापूर्वीच नितीन पतंगराव यांचा मृत्यू झाला. नातेवाईकांना घटनेची माहिती कळताच शासकीय रुग्णालयात मोठी गर्दी केली होती.
अखेरचा संवाद व्हायरल
मारहाण झाल्यानंतर तरुणाने काकाला कॉल लावून मारहाणीची माहिती दिली. त्याचबरोबर मला डोक्यात मारहाण केलीय. मला लवकर वाचवायला या अशी आर्त हाक मृत्यूपूर्वी नितीनने दिली होती. फोनवरून झालेला अखेरचा संवाद व्हायरल झालाय. नितीनला खाजगी रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर तेथून शासकीय रुग्णालयात नेत असताना त्याचा मृत्यू झाला.
वाद घटस्फोट देण्यापर्यंत
नितीन पतंगराव याचे बायकोसोबत पटत नव्हते. त्यामुळं त्यांच्यात वाद होता. हा वाद घटस्फोट देण्यापर्यंत गेला. पण, मुलीला घटस्फोट देऊ नये, अशी सासरा आणि त्याच्या मेहुण्याची मागणी होती. पण, या मागणीवर नितीन ठाम होता. यामुळं सासरा आणि जावयाने नितीनला चांगलीच मारहाण केली.
तो कॉल काकाकडून रेकॉर्ड
मारहाण झाल्यानंतर नितीनने आपल्या काकाला कॉल केला. तो कॉल काकाकडून रेकॉर्ड केला गेला. नितीनच्या मृत्यूनंतर तो कॉल रेकॉर्ड व्हायरल होत आहे. त्यामुळं काकाला केलेला शेवटचा कॉलही नितीनला वाचवू शकला नाही, याची खंत काकाला आहे. आठ ते दहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यामुळं ते आता अडचणीत आले आहेत.