Cricketer Death : 4 धावांची गरज असताना सिक्स मारुन मॅच काढली, पण आयुष्याने विकेट काढली! भिवंडीतील हृदयद्रावक घटना
Bhiwandi News : विजयासाठी दोन चेंडूंमध्ये चार धावांची गरज होती. यावेळी संजय ठाकरे ही 45 वर्षांची व्यक्ती बॅटिंग करत होती. अगदी चुरशीच्या लढतीत संजय यांनी षटकार ठोकून विजय मिळवून दिला होता.
भिवंडी : क्रिकेट (Cricket) खेळताना एका 45 वर्षांच्या इसमाचा मृत्यू झाला. स्थानिक क्रिकेट टुर्नामेन्टच्या वेळी घडलेल्या या घटनेनं सगळेच हादरुन गेलेत. मॅचमध्ये दोन चेंडूत चार धावांची गरज होती. त्यावेळी या व्यक्तीनं सिक्स मारुन संघाला विजय मिळवून दिला. त्यानंतर या इसमाच्या छातीमध्ये कळ (Heart pain) आली आणि तो जागच्या जागी कोसळला. यात 45 वर्षांच्या इसमाने मैदानातच प्राण सोडले. त्याला तातडीने उपचारासाठी घेऊन जाण्यात आलं होतं. पण त्याआधीच या इसमाचा मृत्यू झाला होता. संजय ठाकरे असं 45 वर्षांच्या मृत इसमाचं नाव आहे. त्यांच्या मृत्यूने क्रिकेट टुर्नामेन्टसाठी जमलेल्या सगळ्यांनाच मोठा धक्का बसलाय. भिवंडी (Biwandi News) तालुक्यात क्रिकेट स्पर्धेदरम्यान, ही घटना घडली.
मॅच जिंकली, पण आयुष्य हरले!
संजय ठाकरे यांनी भिवंडीतील क्रिकेट टुर्नामेन्टमध्ये एका संघातून सहभाग घेतला होता. भिवंडीच्या अंबाडी परिसरात फोर्टी प्लस या 40 वर्षीय क्रिकेट स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं. या क्रिकेट टुर्नामेन्टच्या एका सामन्यादरम्यान काळजाला चटका लावणारी घटना घडली.
एका संघाला विजयासाठी दोन चेंडूंमध्ये चार धावांची गरज होती. यावेळी संजय ठाकरे ही 45 वर्षांची व्यक्ती बॅटिंग करत होती. अगदी चुरशीच्या लढतीत संजय यांनी षटकार ठोकून विजय मिळवून दिला होता. पण त्यानंतर संजय यांच्या छातीत कळ आली आणि हृदयविकाराच्या झटक्यानं उपचाराआधी त्यांचा मृत्यू झाला.
पाहा विधान परिषद निवडणुकीची महत्त्वाची बातमी : Video
दुर्दैवी!
मृत्यू किती अचानक गाठू शकतो, हे अधोरेखित करणारी आणखी एक घटना भिवंडीतून समोर आली आहे. याआधी परभणीत एका मिरवणुकीमध्ये गाणं गाणारी महिलाही गाता गाता कोसळली होती. या महिलेचाही हार्ट अटॅकने मृत्यू झाला होता. या धक्कादायक घटनेनंतर हळहळ व्यक्त केली जात होती. तर नुकताच प्रसिद्ध गायक याचाही लाईव्ह कॉन्सर्टनंतर अवघ्या काही मिनिटांच्या आत कार्डिऍक अरेस्टने मृत्यू झाला होती.
दरम्यान, याआधीही अचानक छातीत दुखू लागून मृत्यू ओढवल्याच्या घटना कॅमेऱ्यातही कैद झाल्या आहेत. आता भिवंडीतील घटनेनं मृत्यू किती अचानक येऊ शकतो, हे अधोरेखित झालंय.