AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हत्या केली, मृतदेह गोणीत बांधला! पण अर्धवट फाटलेल्या प्रिस्क्रिप्शनच्या कागदानं गेम फिरवला

Bhiwandi Murder : अखेर 5 दिवसांच्या आत पोलिसांनी तपासाची सगळं कौशल्य पणाला लावत मारेकऱ्यांना अटक केली आहे. आता याप्रकरणी अधिक तपास मारेकऱ्यांकडून केला जातो आहे.

हत्या केली, मृतदेह गोणीत बांधला! पण अर्धवट फाटलेल्या प्रिस्क्रिप्शनच्या कागदानं गेम फिरवला
प्रातिनिधिक फोटो
| Edited By: | Updated on: Jan 26, 2022 | 2:25 PM
Share

भिवंडी : अनैतिक संबंधातून भिवंडीत एक हत्या (Bhiwandi Murder) झाली होती. 20 जानेवारीला एक मृतदेह भिवंडीतील पुलाखाली आढळून आला. गोणी बांधलेल्या अवस्थेत असलेला हा मृतदेह (Dead Body) नेमका कुणाचा आहे, इथपासून पोलिसांना सगळा शोध घ्यायचा होता. दरम्यान, याच सोबत मृतदेह आढळलेल्या व्यक्तीच्या मारेकऱ्यांपर्यंतही पोहोचण्याचं आव्हान पोलिसांसमोर होतं. अखेर 5 दिवसांच्या आत पोलिसांनी तपासाची सगळं कौशल्य पणाला लावत मारेकऱ्यांना अटक केली आहे. आता याप्रकरणी अधिक तपास मारेकऱ्यांकडून केला जातो आहे. मृतदेहाच्या शर्टाच्या खिशात एका कागद पोलिसांना आढळला होता. या कागदानं पोलिसांनी मारेकऱ्यांपर्यंत पोहोचवलंय. हत्येचा सगळा थरार पोलिसांनी आपल्या तपासातून उलगडला असून हत्या करण्यात आलेल्या व्यक्तीच्या पत्नीचे परपुरुषासोबत अनैतिक संबंध असल्याचं उघड झालंय. त्यातून हत्येची ही घटना घडल्याचं चौकशीतून समोर आलं आहे.

नेमकं प्रकरण काय?

20 जानेवारी रोजी कांबे पॉवर हाऊस जुनादुरखी रस्त्यावर असलेल्या रुपाला ब्रिजच्या खाली एक संशयास्पद गोणी आढळून आली होती. या गोणीत चक्क एक मृतदेह आढळून आल्यानं एकच खळबळ उडाली होती. पोलिसांनी याप्रकरणी मृतदेहाची तपासणी केली असता मृतदेहाच्या शर्टाच्या खिशात एक अर्धवट फाटलेला कागद आढळून आला होता. हा कागद म्हणजे एका डॉक्टरनं दिलेलं औषधांचं प्रिस्क्रिप्शन असल्याचं समोर आलं. त्यानंतर पोलिसांनी या प्रिस्क्रिप्शनच्या मदतीनं तपासाची सूत्र फिरवत अधिक तपास सुरु केली. या प्रिस्क्रिप्सनेनच पोलिसांना या इसमाच्या मारेकऱ्यांपर्यंत पोहोचवलं आहे.

कुणाचा मृतदेह आहे?

पुलाखाली गोणीत आढलेला मृतदेह अरमान शेर अली शाह यांचा असल्याचं स्पष्ट झालंय. हत्या झालेल्या व्यक्तीच्या पत्नीचे मोहम्मद सलमान अब्दुल मुकीद शेख याच्यासोबत अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरुन अरमान शाह याने सलमानला जाब विचारला होता. याचाच राग मनात ठेवून सलमाननं अरमानची हत्या केली आणि त्याचा मृतदेह गोणीत भरुन पुलाखाली फेकला होता.

तिघांना अटक

या हत्याकांडप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. पोलीस उपायुक्त योगेश चव्हाण यांनी याबाबत माहिती दिली. सलमानने तस्लिमा अन्सारी आणि बिलाल अन्सारी यांच्या मदतीनं अरमान शाहची हत्या केली असल्याचं पोलीसांच्या तपासात उघड झालं आहे. या तिघांनी पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून या तिघांचीही आता कसून चौकशी केली जाते आहे.

संबंधित बातम्या :

अनेक दिवसांपासून दोघांमध्ये वाद, अखेर पतीनेच पत्नीला संपवलं, कोल्हापुरात खुनाचा थरार

नाशिकमध्ये महापालिकेच्या महिला वैद्यकीय अधिकाऱ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ

अक्कलकोटला देवदर्शनासाठी निघाले, वाटेत ट्रकची मागून धडक, कारमध्ये लहान बाळ होतं, त्याचं काय झालं?

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.