मेहुणीला लग्नाचं वचन, बायकोचा मर्डर, महिला पोलिसांशी अनैतिक संबंध, स्त्रीलंपट नवऱ्याला अटक

गावात असलेल्या पुलावर ही घटना घडल्याचा दावा पतीने केला होता, मात्र गोळ्यांचा आवाज कोणालाच कसा ऐकू आला नाही, हे पोलिसांना समजत नव्हते. त्यामुळे या प्रकरणाच्या तळापर्यंत जाण्यासाठी पोलिसांनी सुधीर यादवलाही रडारवर घेतले.

मेहुणीला लग्नाचं वचन, बायकोचा मर्डर, महिला पोलिसांशी अनैतिक संबंध, स्त्रीलंपट नवऱ्याला अटक
प्रातिनिधिक फोटो
Follow us
| Updated on: Jan 17, 2022 | 10:33 AM

पाटणा : बिहारमधील सिवान जिल्ह्यातील एका तरुणाचे आपल्या मेहुणीशी विवाहबाह्य संबंध (Extra Marital Affair) असल्याचा आरोप केला जात होता. अनेक महिला पोलिसांशीही तो अनैतिक संबंध ठेवत होता. हा प्रकार पत्नीला समजल्यानंतर दोघांमध्ये कडाक्याची भांडणं सुरु झाली. पत्नी वारंवार पतीला सुधारण्याचा इशारा देत होती. मात्र रोजच्या कटकटींना कंटाळलेल्या पतीने तिचा आक्षेप कायमचा मोडून काढण्यासाठी एक निर्णय घेतला. तिचा आवाज कायमचा दाबण्यासाठी नवऱ्याने तिच्या हत्येचा कट रचला. मध्य प्रदेशातून बिहारमधील सिवानला येत त्याने हत्याकांड घडवून आणलं. हत्येनंतर नामानिराळा राहण्याचा त्याने आटोकाट प्रयत्न केला. बायकोच्या हत्या प्रकरणात त्याने हात वर केले होते. मात्र आरोपीच्या मोबाईलच्या सीडीआरने हे प्रकरण उघडकीस आणले. पोलिसांनी सुधीर यादव नावाच्या तरुणाला अटक केली आहे.

काय आहे प्रकरण?

सुधीर आधी सिवानमधील त्याच्या गावी आला. परीक्षेच्या निमित्ताने पत्नीला घेऊन पाटण्याला गेला. परीक्षा संपल्यानंतर ती पतीसोबत सिवानला परत येत होती. यादरम्यान संधी मिळताच सुधीरने पत्नीची हत्या केली. पत्नीची अज्ञात गुन्हेगारांनी गोळ्या झाडून हत्या केल्याची माहिती त्यानेच पोलिसांना दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला.

गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिसांनी आठ जानेवारीपासून या प्रकरणाचा तपास सुरु केला. सिवानमधील मधेशीलापूर गावात असलेल्या पुलावर ही घटना घडल्याचा दावा पतीने केला होता, मात्र गोळ्यांचा आवाज कोणालाच कसा ऐकू आला नाही, हे पोलिसांना समजत नव्हते. त्यामुळे या प्रकरणाच्या तळापर्यंत जाण्यासाठी पोलिसांनी सुधीर यादवलाही रडारवर घेतले.

मोबाईल लोकेशनमुळे पोलखोल

हत्येचा तपास करणारे एसएचओ मनोज कुमार यांनी सुधीरसोबतच त्याची मयत पत्नी रिया देवीचा मोबाईलही ताब्यात घेतला. पोलिसांनी दोन्ही क्रमांकांचे सीडीआर काढून त्यांचा सखोल तपास सुरु केला. तपासात सुधीरचा मोबाईल कायम पत्नीसोबत अॅक्टिव्ह असल्याचे समोर आले. त्याचे मोबाईल लोकेशनही नेहमी पत्नीच्या सोबतच असल्याचे दिसले.

त्याआधारे पोलिसांनी तपास करुन सुधीरची चौकशी सुरू केली, त्यात सुधीर यादवनेच पत्नीची हत्या केल्याचे निष्पन्न झाले. एसएचओ मनोज कुमार यांनी सुधीरची कसून चौकशी केली असता, त्याने खुनाची कबुली दिली. पोलिसांनी सुधीरला अटक करुन रविवारी तुरुंगात पाठवले.

मेहुणीला लग्नाचे आश्वासन

सुधीरने आपल्या मेहुणीला लग्न करण्याचे आश्वासन दिल्याचे चौकशीदरम्यान समजले. मेहुणीशिवाय त्याचे अनेक महिला पोलिसांशी अनैतिक संबंध होते. सुधीरच्या मोबाईलमध्ये अनेक महिलांसोबत चॅटिंग आणि त्यांचे फोटो सापडले आहेत. पोलिस मध्य प्रदेश पोलिसांशी संपर्क साधून सुधीरबाबत अधिक माहिती घेत आहेत. लवकरच आरोपपत्र दाखल केल्यानंतर सुधीरला न्यायालयात हजर केले जाईल, असे पोलिसांनी सांगितले आहे.

संबंधित बातम्या :

औरंगाबादेत गँगवॉर! 9 जणांनी मिळून तरुणावर केले तब्बल 35 चाकूचे वार, निर्घृण खून!

नवऱ्याला सरप्राईज गिफ्ट देण्याची तयारी, बायकोलाच बसला शॉक, फसवणुकीमुळे आनंदावर विरजण

मागाल ते देतो, काळजाच्या तुकड्याला सोडा, पुण्यातील अपहृत चिमुरड्याच्या वडिलांची भावनिक पोस्ट, नेटिझन्स हळहळले

'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.