गौर से देखो इस शख्स को… ऑर्केस्ट्रात गाणं गायला जिथे गेला, तिथेच संसार थाटला; 4 राज्यात 6 बायका; असा घावला तावडीत

छोटू कुमार हा देवघरच्या माँ शारदा ऑर्केस्ट्रात काम करतो. त्याने 2011मध्ये रांची येथील कलादेवीशी विवाह केला होता. त्यांना चार मुलं आहेत.

गौर से देखो इस शख्स को... ऑर्केस्ट्रात गाणं गायला जिथे गेला, तिथेच संसार थाटला; 4 राज्यात 6 बायका; असा घावला तावडीत
ऑर्केस्ट्रात गाणं गायला जिथे गेला, तिथेच संसार थाटलाImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Nov 30, 2022 | 10:30 AM

पाटणा: हिंदू विवाह कायद्यानुसार व्यक्तिला एकच लग्न करण्याचा अधिकार आहे. पण अनेकदा पुरुष आणि महिला लपूनछपून अनेक विवाह करताना दिसतात. बिहारच्या जमूई जिल्ह्यातही अशीच एक घटना उघडकीस आली आहे. एका व्यक्तीने एक दोन नव्हे तर सहा लग्न केले. सहाही पत्नींशी संसार करत आहे. एवढच नव्हे तर त्याला मुलंही आहेत. धक्कादायक बाब म्हणजे ज्या राज्यात गेला तिथे त्यानं संसार थाटल्याचं आढळून आलं आहे. छोटूकुमार असं या 30 वर्षीय व्यक्तीचं नाव आहे. तो आर्केस्ट्रॉमध्ये गाणं गातो. चार राज्यात त्याच्या सहा बायका आहेत. विशेष म्हणजे त्याच्या एकाही पत्नीला त्याच्या या लग्नाचा सुगावा नव्हता.

आपल्या पहिल्या पत्नीसोबत जमूई रेल्वे स्थानकावर पकडल्या गेल्यानंतर त्याच्या इतर लग्नांचा भांडाफोड ढाला. छोटूला त्याच्या मेव्हण्याने रेल्वे स्थानकावर दुसऱ्या महिलेसोबत पाहिले. मेव्हण्याने ही माहिती घरी दिली.

हे सुद्धा वाचा

त्यामुळे त्याच्या कुटुंबीयांनी रेल्वे स्थानकावर धाव घेतली असता हा भांडाफोड झाला. छोटूने बंगाल, दिल्ली, झारखंड आणि बिहारमध्येही तिथल्या मुलींशी लग्न केलं आहे. त्याने आतापर्यंत सहा विवाह केले आहेत, असा आरोप छोटूच्या दुसऱ्या पत्नीच्या आईने केला आहे.

सोमवारी छोटू पहिल्या पत्नीसोबत कोलकात्याला चालला होता. त्याचवेळी दुसऱ्या पत्नीच्या भावाने त्याला पकडलं, असं छोटूच्या पहिल्या पत्नीच्या आईने सांगितलं. छोटू हा जमुई जिल्ह्यातील जावातरी गावात राहतो.

छोटू ऑर्केस्ट्रात गाणं गातो. तो ऑर्केस्ट्रात गाणं गायला जिथे जातो तिथे तो लग्न करतो, असा आरोप त्याच्या दुसऱ्या पत्नीने केला आहे. त्याच्या दुसऱ्या पत्नीने याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. सध्या पोलिसांनी दोघांनाही समजावलं असून घरी जाऊन शांतपणे यातून मार्ग काढण्याचा सल्ला दिला आहे.

छोटू कुमार हा देवघरच्या माँ शारदा ऑर्केस्ट्रात काम करतो. त्याने 2011मध्ये रांची येथील कलादेवीशी विवाह केला होता. त्यांना चार मुलं आहेत. त्यानंतर 2018मध्ये त्याने लक्ष्मीपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सुंदरटांड येथे मंजू देवीशी विवाह केला. मंजूदेवीला दोन मुलं आहेत. गेल्या दीड वर्षापासून छोटू मंजूला भेटलेला नाहीये.

रेल्वेस्थानकावर पकडल्या गेल्यानंतर हे प्रकरण पोलीस ठाण्यात गेलं. तेव्हा पहिल्या पत्नीने छोटूचीच बाजू घेतली. नवऱ्याच्या आनंदातच माझा आनंद आहे, असं ती म्हणाली. कलावतीला छोटूच्या दुसऱ्या विवाहाची कल्पना आहे.

त्यामुळेच तिने त्याच्या या लग्नाला माझी हरकत नसल्याचं म्हटलं. छोटूला एकूण सहा बायका आहेत. सहाही बायकांना मुलं आहेत. विशेष म्हणजे तो कोणत्याही पत्नीसोबत तो एक ते दीड वर्षापेक्षा अधिक काळ राहिलेला नाही.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.