वडील-बायकोच्या प्रेमसंबंधाची कुणकुण, जाब विचारल्याने मुलाची हत्या

सचिनने आपल्या वडिलांना त्यांच्या अनैतिक संबंधांचा जाब विचारला. त्यावरुन दोघांमध्ये कडाक्याचं भांडण झालं. त्यानंतर पिता मिथिलेशने आपल्याच मुलाची गळा दाबून हत्या केली.

वडील-बायकोच्या प्रेमसंबंधाची कुणकुण, जाब विचारल्याने मुलाची हत्या
पित्याकडून पोटच्या मुलाची हत्या
Follow us
| Updated on: Jul 27, 2021 | 2:48 PM

पाटणा : आपले वडील आणि बायको यांच्यामध्ये असलेल्या अनैतिक संबंधांची कुणकुण लागल्याने मुलाने जाब विचारला. त्यामुळे चिडलेल्या वडिलांनी पोटच्या मुलाचीच गळा दाबून हत्या केली. त्यानंतर स्वतःच पोलिसात जाऊन पित्याने मुलगा हरवल्याची तक्रारही दिली. बिहारची राजधानी पाटणा येथील कोद्रा भागात नातेसंबंधांची चिरफाड करणारी ही घटना घडली.

नेमकं काय घडलं?

बिहारचा 22 वर्षीय सचिन गुजरातमध्ये नोकरीला होता. तर त्याची पत्नी आणि वडील मिथिलेश रवीदास हे बिहारमधील मूळगावीच राहत होते. सचिन घरात नसताना सासरे-सुनेचं सूत जुळलं. आपल्या वडिलांच्या या उद्योगाची कुणकुण सचिनला लागली आणि तो शाहनिशा करण्यासाठी 7 जुलैला बिहारला आला.

मुलाचं अपहरण झाल्याची खोटी तक्रार

सचिनने आपल्या वडिलांना त्यांच्या अनैतिक संबंधांचा जाब विचारला. त्यावरुन दोघांमध्ये कडाक्याचं भांडण झालं. त्यानंतर पिता मिथिलेशने आपल्याच मुलाची गळा दाबून हत्या केली. त्याचा मृतदेह त्याने पाटण्यातील एका बागेत लपवला. त्यानंतर मिथिलेशने आपला मुलगा सचिन हरवल्याची तक्रार पोलिसात दाखल केली. आपल्या मुलाचं अपहरण झाल्याची शंका व्यक्त करत त्याने पाच संशयितांची नावंही दिली.

पिता मिथिलेश रवीदासला अटक

दोन दिवसांनी पोलिसांना सचिनचा मृतदेह आढळला. तपासादरम्यान पोलिसांना मिथिलेश आणि त्याच्या सूनेतील संबंधांची माहिती मिळाली. पोलिसांनी कसून चौकशी केली असता त्याने हत्येची कबुली दिली. पोलसांनी आरोपी पिता मिथिलेश रवीदास याला अटक केली असून पुढील तपास सुरु आहे.

बीडमध्ये विवाहित नर्सची आत्महत्या 

दुसरीकडे, बीडमध्ये सोनाली जाधव या विवाहित नर्सचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला. बीड तालुक्यातील मांजरसुंबा घाटात पालीजवळ सोमवारी दुपारी चार वाजताच्या सुमारास ही घटना घडली. मांजरसुंबा घाटातील एका झाडाला ओढणीच्या सहाय्याने गळफास लावलेल्या अवस्थेत हा मृतदेह होता. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

संबंधित बातम्या :

विवाहित प्रियकराचा लग्नास नकार, विवाहित नर्सचा ओढणीने गळफास

वयाच्या 20 व्या वर्षी बॉयफ्रेण्डसोबत विषप्राशन, अशी झाली होती अभिनेत्री प्रत्युषाच्या आयुष्याची अखेर

मायलेकीचे एकाच प्रियकराशी प्रेमसंबंध, पाळत ठेवणाऱ्या तरुणाची हत्या

(Bihar Man Murders Son Over Affair With Daughter in Law)

मंत्रिमंडळ विस्तारात नाराजीरावांचा पूर, खातेवाटपाच्या वेळी काय होणार?
मंत्रिमंडळ विस्तारात नाराजीरावांचा पूर, खातेवाटपाच्या वेळी काय होणार?.
भुजबळांचं मंत्रिपद दादांनी मंत्रिपद नाकारलं? भुजबळ मोठा निर्णय घेणार?
भुजबळांचं मंत्रिपद दादांनी मंत्रिपद नाकारलं? भुजबळ मोठा निर्णय घेणार?.
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.