AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मॉडेल मोना राय हत्येचे गूढ उकललं, बिल्डरच्या बायकोने सुपारी देऊन संपवलं, धक्कादायक कारण समोर

अनिता देवी उर्फ मोना राय ही टिक-टक स्टार होती. टिक-टॉकवर प्रसिद्धी मिळाल्यानंतर तिने मॉडेलिंगला सुरुवात केली. याशिवाय मोनाने अनेक भोजपुरी अल्बममध्ये काम केलं होत. गेल्या वर्षभरापासून ती मॉडेलिंग क्षेत्रात आपलं नशिब आजमावत होती.

मॉडेल मोना राय हत्येचे गूढ उकललं, बिल्डरच्या बायकोने सुपारी देऊन संपवलं, धक्कादायक कारण समोर
बिहारमध्ये मॉडेल मोना रायची हत्या
| Edited By: | Updated on: Oct 25, 2021 | 1:18 PM
Share

पाटणा : पाटण्यातील 36 वर्षीय मॉडेल मोना रायच्या मृत्यूचे गूढ अखेर उकलले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका बिल्डरच्या पत्नीने सुपारी देऊन मोनाची हत्या केली होती. 12 ऑक्टोबर रोजी घराबाहेर मोनाच्या मुलीसमोरच तिच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. पाच दिवसांच्या उपचारानंतर 17 ऑक्टोबर रोजी मोनाचा मृत्यू झाला.

कोण होती मोना राय?

अनिता देवी उर्फ मोना राय ही टिक-टक स्टार होती. टिक-टॉकवर प्रसिद्धी मिळाल्यानंतर तिने मॉडेलिंगला सुरुवात केली. याशिवाय मोनाने अनेक भोजपुरी अल्बममध्ये काम केलं होत. गेल्या वर्षभरापासून ती मॉडेलिंग क्षेत्रात आपलं नशिब आजमावत होती. तिचा पती हा एका खासगी कंपनीत काम करतो. पण आपली कुणासोबतही दुश्मनी नाही, अशी प्रतिक्रिया पतीने दिली होती.

मॉडेल मोना रायच्या हत्या प्रकरणाच्या तपासादरम्यान पोलिसांनी कॉल डिटेल्स शोधले असता राजू नावाच्या बिल्डरचे नाव समोर आले. पोलिसांनी त्याच्या घराची झडती घेतली असता तिथे दारु सापडली मात्र खुनाचा कोणताही सुगावा लागला नाही. त्यावेळी पोलिसांनी राजूला दारू बाळगल्याबद्दल तुरुंगात पाठवले.

बिल्डरच्या बायकोचा हात

तपासादरम्यान पोलिसांना आणखी एक मोबाईल क्रमांक मिळाला जो भीम यादव नावाच्या शूटरचा होता. पोलिसांनी त्याला आरा येथील उदवंतनगर येथून अटक केली. या सगळ्यामागे बिल्डर राजूच्या पत्नीचा हात असल्याचे तपासादरम्यान पोलिसांना समजले.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राजूची मोनाशी जवळीक वाढत होती. त्याने मोनाला एक फ्लॅटही दिला होता. मोना आपला संसार उद्ध्वस्त करु शकते, अशी भीती राजूच्या पत्नीला सतावत होती. म्हणून तिने सुपारी देऊन मोनाचा खून केल्याचा आरोप आहे.

मोनाच्या हत्येसाठी 5 लाख रुपयांची सुपारी देण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. मात्र, या प्रकरणी पोलिसांनी अद्याप कुठलीही माहिती देण्यास नकार दिला आहे. या प्रकरणात, पोलीस आणखी एका शूटरचा शोध घेत आहेत. बिल्डरला या षडयंत्राची माहिती होती का, याचाही पोलीस तपास करत आहेत.

हेही वाचा :

बिहारमध्ये भर दिवसा महिला मॉडेलवर गोळीबार, मोना रायची प्राणज्योत मालवली, हत्येमागील रहस्य रहस्यच राहिल?

क्या हुआ तेरा वादा? अनेक वर्ष शारीरिक संबंध, पण लग्नाच्यावेळी पाठ दाखवली, पीडितेची मन हेलावणारी कहाणी

प्रसूती होताना ओरडतेस का?, म्हणत गरोदर महिलेला डॉक्टरकडून अमानुष मारहाण, दौंडमधील संतापजनक घटना

ठाकरे बंधूंचं मराठी-मुस्लीम कॉम्बिनेशन, BMC निवडणुकीसाठी मतांची रणनीती
ठाकरे बंधूंचं मराठी-मुस्लीम कॉम्बिनेशन, BMC निवडणुकीसाठी मतांची रणनीती.
'लाव रे तो व्हिडीओ'तून भाजपनं काढले राज ठाकरेंचे जुने VIDEO
'लाव रे तो व्हिडीओ'तून भाजपनं काढले राज ठाकरेंचे जुने VIDEO.
निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शेलारांनी घेतली शिंदेंची भेट, कुठं एकत्र?
निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शेलारांनी घेतली शिंदेंची भेट, कुठं एकत्र?.
मतदारांना डांबलं तर 100 महिला नजरकैदेत! स्थानिक म्हणाले, भाजपच्या....
मतदारांना डांबलं तर 100 महिला नजरकैदेत! स्थानिक म्हणाले, भाजपच्या.....
अजित पवार कुठं स्वतंत्र लढणार? फडणवीसांसोबतच्या तासभर बैठकीत काय ठरल?
अजित पवार कुठं स्वतंत्र लढणार? फडणवीसांसोबतच्या तासभर बैठकीत काय ठरल?.
काँग्रेसचा 'मविआ'ला जबर धक्का, BMC निवडणुकीच्या तोंडावर मोठी घोषणा
काँग्रेसचा 'मविआ'ला जबर धक्का, BMC निवडणुकीच्या तोंडावर मोठी घोषणा.
राऊत पुन्हा शिवतीर्थवर, राज ठाकरेंसह युती, जागावाटप नेमकी कशावर चर्चा?
राऊत पुन्हा शिवतीर्थवर, राज ठाकरेंसह युती, जागावाटप नेमकी कशावर चर्चा?.
300 GB डेटा अन् 95 हजार फोटो... Epstein वरून पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
300 GB डेटा अन् 95 हजार फोटो... Epstein वरून पृथ्वीराज चव्हाणांचा दावा.
कुठं बोगस मतदार, कुठं पैशांचं वाटप तर..; अंबरनाथमध्ये मतदानाला गालबोट
कुठं बोगस मतदार, कुठं पैशांचं वाटप तर..; अंबरनाथमध्ये मतदानाला गालबोट.
निवडणूक आयोग नालायक... विजय वडेट्टीवार यांची तीव्र शब्दांत टीका
निवडणूक आयोग नालायक... विजय वडेट्टीवार यांची तीव्र शब्दांत टीका.