भाजप कार्यकर्त्याचा मृतदेह फासावर लटकवला, बंगालमधील हिंसाचार शिगेला
पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीच्या आधी राजकीय हिंसाचाराच्या घटना वाढतच चालल्या आहेत (BJP Mandal President Amit Sarkar was found dead near party office in Dinhata West Bengal).
कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीच्या आधी राजकीय हिंसाचाराच्या घटना वाढतच चालल्या आहेत. बंगालच्या कूचबिहार लोकसभा क्षेत्रात दिनहाटाचे विभागीय अध्यक्ष अमित सरकार यांचा फासावल लटकवलेला मृतदेह आढळला आहे. पक्ष कार्यालयाच्या जवळच त्यांचा मृतदेह सापडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेवरुन भाजप कार्यकर्त्यांनी तृणमूल काँग्रेसवर निशाणा साधला आहे. ही एकप्रकारे अमित सरकार यांची पूर्व नियोजित हत्याच आहे, असा आरोप भाजपकडून करण्यात येतोय (BJP Mandal President Amit Sarkar was found dead near party office in Dinhata West Bengal).
निवडणूक आयुक्तांकडून चिंता व्यक्त
भाजपने या प्रकरणाची तक्रार निवडणूक आयोगाकडे केली आहे. मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा सध्या बंगालच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी या घटनेवर चिंता व्यक्त केली आहे. याप्रकरणी त्यांनी विशेष पोलीस पर्यवेक्षकाकडे संपूर्ण घटनेचा अहवाल मागितला आहे.
Coochbehar: A Bharatiya Janata Party (BJP) Mandal President was found dead near party office in Dinhata, earlier today.
“It’s a pre-planned murder. They (TMC) want us (BJP workers) to just sit at home out of fear but we will continue our fight,” says a BJP worker. #WestBengal pic.twitter.com/wo6tsc5K1h
— ANI (@ANI) March 24, 2021
कैलाश विजयवर्गीय यांचा तृणमूल काँग्रेसवर निशाणा
भाजपचे महासचिव कैलाश विजयवर्गीय यांनी या घटनेवरुन भाजपवर निशाणा साधला आहे. विजयवर्गीय यांनी ट्विटरवर बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर टीका केली आहे. “दीदीचा खेळ सुरु, ममता सरकारचा राजनैतिक हिंसाचाराचा अंत अजूनही झालेला नाही. कूचबिहार लोकसभा क्षेत्रातील दिनहाटाचे विभागीय अध्यक्ष अमित सरकार यांना टीएमसीच्या गुंडांनी फाशीवर लटकवलं. राज्यात आतापर्यंत 130 पेक्षा जास्त भाजप कार्यकर्त्यांच्या हत्येला ममतांचा पक्ष जबाबदार आहे”, असा आरोप विजयवर्गीय यांनी केलाय.
दीदी का ‘खेला ‘ शुरू !!!
ममता राज की राजनीतिक हिंसा का अभी अंत नहीं हुआ। कूचबिहार लोकसभा क्षेत्र के दिनहाटा के मंडल अध्यक्ष श्री अमित सरकार को #TMC के गुंडों ने फांसी पर लटका दिया। राज्य में अभी तक 130 से अधिक भाजपा कार्यकर्ताओं की हत्या के लिए ममता की पार्टी ही जिम्मेदार है। pic.twitter.com/ieHRCoc2BE
— Kailash Vijayvargiya (@KailashOnline) March 24, 2021
याआधी देखील घडलीय अशीच घटना
याआधी देखील एका भाजप कार्यकर्त्याचा मृतदेह झाडाला लटकवलेल्या अवस्थेत मिळाला होता. ही घटना कोलकाता जवळील सोनरपुर गावात घडली होती. विकास नस्कर असं मृत कार्यकर्त्याचं नाव होतं. त्यावेळी देखील भाजपकडून टीएमसीवर गंभीर आरोप करण्यात आला होता. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील बंगालमधील हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर ममता सरकारवर निशाणा साधला आहे.
27 मार्चला पहिल्या टप्प्यातील निवडणूक
बंगालमध्ये 27 मार्चपासून विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. या निवडणुकीसाठी आठ टप्प्यांमध्ये मतदान होणार असून ते 29 एप्रिलपर्यंत सुरु राहणार आहे. त्यानंतर 2 मे रोजी निवडणुकीचा निकाल जाहीर होईल (BJP Mandal President Amit Sarkar was found dead near party office in Dinhata West Bengal).
हेही वाचा : ममता बॅनर्जींच्या पराभवासाठी भाजपचा खास प्लॅन; ‘हे’ पाच नेते गेमचेंजर ठरणार?