ही तर सैतानाचा अवतार, नग्न करुन महिलेचा बळी देण्याचा प्रयत्न, रडण्याच्या आवाजाने शेजाऱ्यांचा थरकाप

कुटुंबातील महिला ही सैतानाचा अवतार असल्याचे समजत नग्न करुन तिचा बळी देण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना बरामतीमध्ये घडली आहे. महिलेच्या कुटुंबीयांनी मांत्रिकाच्या सल्ल्याने हा अघोरी प्रकार केला आहे. बारामती तालुक्यातील करंजेपूल येथील ही घटना आहे.

ही तर सैतानाचा अवतार, नग्न करुन महिलेचा बळी देण्याचा प्रयत्न, रडण्याच्या आवाजाने शेजाऱ्यांचा थरकाप
सैतानाचा अवतार असल्याचे म्हणत महिलाचा बळी देण्याचा प्रयत्न करण्यात आला.
Follow us
| Updated on: Oct 22, 2021 | 11:06 PM

पुणे : कुटुंबातील महिला ही सैतानाचा अवतार असल्याचे समजत नग्न करुन तिचा बळी देण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना बरामतीमध्ये घडली. महिलेच्या कुटुंबीयांनी मांत्रिकाच्या सल्ल्याने हा अघोरी प्रकार केला. बारामती तालुक्यातील करंजेपूल येथील ही घटना आहे. या प्रकरणी मांत्रिकासह पाच जणांविरोधात बारामती शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ट व अघोरी प्रथा, जादूटोणा प्रतिबंधक कायद्यान्वये ही कारवाई करण्यात आली.

महेंद्र माणिकराव गायकवाड, राजेंद्र माणिकराव गायकवाड, कौशल्‍या माणिकराव गायकवाड, नीता अनिल जाधव आणि तात्या नावाचा मंत्रिक अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. करंजेपुल येथे राहणाऱ्या महिलेने याबाबत बारामती शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे..

हुंडा दिला नाही म्हणून छळ करायचे 

दाखल तक्रारीनुसार या महिलेला लग्न झाल्यापासून सासरच्या लोकांकडून त्रास दिला जात होता. हुंडा दिला नाही म्हणून तिचा छळ करण्यात यायचा. त्यानंतर दोन्ही दिराने आणि सासूने भूतबाधा झाली असल्याचे पसरवत तात्या नामक मांत्रिकाला घरी बोलवले. त्याने सांगितल्यानुसार आरोपीकडून लिंबू उतरवणे अंग धुपारे टाकणे, भस्म लावणे अनैसर्गिक कृत्य करण्यास भाग पाडणे, उपाशी ठेवणे असे प्रकार केले.

रिंगण तयार करून महिलेला नग्न करुन बसवण्यात आले

कुटुंबीयांनी तात्या नावाच्या मांत्रिकाला घरी बोलावून घेतले. हळदी-कुंकवाचे रिंगण तयार करून त्यात महिलेला नग्न करुन बसवण्यात आले. तिच्या तोंडात कापसाचा बोळा कोंबून तिला दाबून ठेवलं गेलं. हा प्रकार पती आणि मुलाला सांगितला तर तुला ठार मारू अशी धमकीदेखील महिलेला देण्यात आली.

शेजारी राहणाऱ्या लोकांनी महिलेची सुटका केली

मात्र, अचानकपणे महिलेच्या रडण्याचा आवाज आल्याने शेजारी थोडे घाबरले. नंतर महिलेच्या घराकडे धाव घेत शेजाऱ्यांनी पीडित महिलेची सुटका केली. त्यानंतर महिलेने ही घटना आई-वडिलांना आपल्या माहेरी कळवली. महिलेच्या आई-वडिलांनी बारामतीत येत सासरच्या लोकांच्या विरोधात फिर्याद दाखल केली आहे. शहर पोलिसांनी हा गुन्हा वडगाव निंबाळकर पोलिसांकडे वर्ग केला आहे. या प्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. मात्र, महिलेला नग्न करुन तिचा बळी देण्याचा प्रयत्न करण्यात आल्यामुळे बारामतीमध्ये खळबळ उडाली आहे. पोलिसांनी आरोपींना लवकरात लवकर अटक करवी अशी मागणी करण्यात येत आहे.

पाहा व्हिडीओ :

इतर बातम्या :

पुण्यात दोन सराईत गुन्हेगारांच्या टोळीमध्ये राडा, भर चौकात दिवसाढवळ्या थेट एकमेकांवर गोळीबार

चांगला ठणठणीत होता, फक्त ताप आलेला, त्यांनी थेट त्याचं ऑपरेशन केलं, डॉक्टरांच्या निष्काळजीपणाने जीव घेतला

8 ते 11 वर्षाच्या मुलांकडून 6 वर्षीय चिमुकलीसोबत भयावह कृत्य, आपली वाटचाल नेमकी कुठल्या दिशेला चाललीय?

(black magic in baramati family member tried to kill woman think that she is ghost case registered against four accused )

उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.