Malaika Arora Accident : मलायका अरोराचा खोपोलीत अपघात, थोडक्यात बचावली, तीन-चार गाड्या आदळल्या

अभिनेत्री मलायका अरोरा हिच्या गाडीची ठोकर एका स्विफ्ट गाडीला लागल्याने मलायका अरोरा ही किरकोळ जखमी झाली आहे. तिच्या गाडीत ड्रायव्हर आणि तिचा बॉडीगार्ड होता मात्र त्यांना काहीही दुखापत झाली नसून अभिनेत्री मलायका अरोरा हिला दुखापत झाली आहे.

Malaika Arora Accident : मलायका अरोराचा खोपोलीत अपघात, थोडक्यात बचावली, तीन-चार गाड्या आदळल्या
मलायका अरोराचा खोपोलीत अपघातImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Apr 02, 2022 | 10:54 PM

नवी मुंबई / रवी खरात (प्रतिनिधी) : अभिनेत्री मलायका अरोरा (Malaika Arora) हिच्या गाडीचा खालापूर टोल नाक्याजवळ अपघात (Accident) झाला आहे. या अपघातात मलायकावला दुखापत झाली असून तिला उपचारासाठी नवी मुंबईतील अपोलो हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. मुंबई-पुणे हायवेवर मोठ्या प्रमाणात ट्राफिक झाल्याने अचानक ब्रेक लावल्याने तीन ते चार गाड्या एकावर एक आदळल्या. अभिनेत्री मलायका अरोरा हिच्या गाडीची ठोकर एका स्विफ्ट गाडीला लागल्याने मलायका अरोराही किरकोळ जखमी झाली आहे. तिच्या गाडीत ड्रायव्हर आणि तिचा बॉडीगार्ड होता मात्र त्यांना काहीही दुखापत झाली नसून अभिनेत्री मलायका अरोरा हिला दुखापत झाली आहे. तर गाडीचे समोरून मोठे नुकसान झाले आहे. अपघातग्रस्त वाहनांमध्ये सोलापूर येथून आलेल्या मनसैनिकांच्या बसचाही समावेश आहे. (Bollywood actress Malaika Arora’s car crashed near Khalapur Toll Naka admitted to Apollo Hospital for treatment)

मनसेच्या मेळाव्यामुळे मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर ट्रॅफिक जॅम

गुढीपाडव्यानिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आज मुंबईत शिवाजी पार्क येथे मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यासाठी महाराष्ट्रातील मनसैनिक आले होते. या मेळाव्याला येणाऱ्या मुंबईत येणाऱ्या मनसैनिकांच्या गाड्यांमुळे मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक झालं होतं. या ट्रॅफिकमुळेच अचनाक ब्रेक लागल्याने तीन ते चार गाड्या एकमेकांवर आदळल्या. यामध्ये अभिनेत्री मलायका अरोराचीही गाडी एका स्विफ्ट कारवर आदळली. यावेळी मलायकाच्या कारमध्ये मलायकासह तिचा ड्रायव्हर आणि बॉडीगार्डही होते. मात्र ड्रायव्हर आणि बॉडीगार्ड सुखरुप असून मलायका किरकोळ जखमी झाली आहे. मलायकाला तात्काळ उपचारासाठी नवी मुंबईतील अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. (Bollywood actress Malaika Arora’s car crashed near Khalapur Toll Naka admitted to Apollo Hospital for treatment)

इतर बातम्या

Nagpur Crime | दारुड्याचा पोलीस ठाण्यातच आत्महत्येचा प्रयत्न, रॉकेल ओतून लावली आग, प्रसंगावधानामुळे टळला अनर्थ

Firing : लष्कराच्या जवानाकडून चुकून गोळीबार, दोन नागरिक जखमी; अरुणाचल प्रदेशातील खळबळजनक घटना

श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.