आईशी अनैतिक संबंध असल्याचा राग, गळा आवळून डॉक्टरला फासावर लटकवलं, हत्येचा उलगडा होताच खळबळ

छत्तीसगडची राजधानी असलेल्या रायपूरमधील एका हॉटेलमध्ये डॉक्टरचा मृतदेह लटकलेला आढळल्यानंतर छत्तीसगड तसेच मध्यप्रदेशसह देशात खळबळ उडाली होती. फासाला लटकलेल्या डॉक्टरचे नाव डॉ. जितेंद्र विश्वकर्मा असून ते मूळचे मध्यप्रदेशमधील आहेत.

आईशी अनैतिक संबंध असल्याचा राग, गळा आवळून डॉक्टरला फासावर लटकवलं, हत्येचा उलगडा होताच खळबळ
सांकेतिक फोटो
Follow us
| Updated on: Sep 28, 2021 | 8:02 PM

रायपूर : छत्तीसगडची राजधानी असलेल्या रायपूरमधील एका हॉटेलमध्ये डॉक्टरचा मृतदेह लटकलेला आढळल्यानंतर छत्तीसगड तसेच मध्यप्रदेशसह देशात खळबळ उडाली होती. फासाला लटकलेल्या डॉक्टरचे नाव डॉ. जितेंद्र विश्वकर्मा असून ते मूळचे मध्यप्रदेशमधील आहेत. विशेष म्हणजे ही आत्महत्या नसून सुनियोजित खून असल्याचे समोर आले आहे. डॉ. विश्वकर्मा यांची त्यांचा मित्र अजय निषाद याने गळा आवळून हत्या केलीय. आपल्या आईशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून निषादने हे कृत्य केले आहे. (boy murdered his doctor friend suspicion of havingan affair with mother)

नेमके प्रकरण काय आहे ?

मिळालेल्या माहितीनुसार 25 सप्टेंबर रोजी रायपूर येथील एका हॉटेलमध्ये डॉ. जितेंद्र विश्वकर्मा यांचा मृतदेह फासाला लटकलेल्या स्थितीत आढळला होता. ही घटना समोर येताच पोलिसांनी तपास सुरु केला होता. हॉटेलमधील खोलीमध्ये संशयास्पद वातावरण तसेच निषाद आणि विश्वकर्मा यांच्यात वाद झाल्यामुळे विश्वकर्मा यांचा खून झाला असावा, असा संशय पोलिसांना आला होता. विशेष म्हणजे विश्वकर्मा यांचा खून गळा आवळून झाल्याचे आज पोस्टमॉर्टमच्या रिपोर्टमधून समोर आले आहे. या हत्येमागे अनैतिक संबंधाच्या संशय असल्याचे सांगितले जात आहे.

आईसोबत अनैतिक संबंध असल्याचा निषादला संशय

अजय निषाद आणि डॉ. विश्वकर्मा हे मूळचे मध्यप्रदेशमधील असून जवळचे मित्र होते. जवळचे संबंध असल्यामुळे विश्वकर्मा यांचे आपल्या आईशी अनैतिक संबंध असल्याचा संशय निषादच्या मनात बळावला होता. याच संशयापोटी निषात विश्वकर्मा यांना बहिणीची गुणपत्रिका रिन्यूअल करण्यासाठी रायूपरमध्ये घेऊन गेला. हे दोघेही एका हॉटेलमध्ये थांबले. यादरम्यान, दोघांमध्येही कडाक्याचे भांडण झाले. तसेच हा वाद नंतर टोकाला गेला. याच वादातून नंतर निषादने विश्वकर्मा यांची गळा आवळून हत्या केली.

हत्या करुन रुम बंद करून गेला

आपल्या आईसोबत अनैतिक संबंध असल्याच्या संशयामुळे निषादने विश्वकर्मा यांच्यासोबत वाद घालणे सुरु केले. मात्र, विश्वकर्मा तसे काहीही नाही, असे सांगण्याचा प्रयत्न करत होते. मात्र, नंतर वाद टोकाला गेल्यामुळे निषादने विश्वकर्मा यांची गळा आवळून हत्या केली. तसेच मृतदेह फासाला लटकवून खोली बंद करून तो बाहेर पडला.

दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार विश्वकर्मा यांचा लटकलेला मृतदेह निषादनेच खाली उतरवला होता. मात्र त्यानेच विश्वकर्मा यांची हत्या केल्याचे समोर आले आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून गुन्हा दाखल करण्यात आलाय.

इतर बातम्या :

बॉडी बिल्डर मनोज पाटील आत्महत्येचा प्रयत्न प्रकरण, हायकोर्टाचा साहिल खानला दिलासा

कोल्हापुरात दोन गँगमध्ये तुंबळ हाणामारी, तीन गाड्यांची तोडफोड, आरोपींच्या शोधासाठी पोलीस पथकं रवाना

भावना गवळींचे निकटवर्तीय सईद खान यांचा तुरुंगातील मुक्काम वाढला, 1 ऑक्टोबरपर्यंत ईडी कोठडी

(boy murdered his doctor friend suspicion of havingan affair with mother)

'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.