Buldana | वृध्देचा गळा आवळून खून, अंगावरील दागिन्यासह 62 हजारांचा ऐवज लंपास…

खामगांव तालुक्यातील उमरा लासुरा येथील घटनेनंतर परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कमलाबाई सोनोने या घरामध्ये एकट्याच असतांना अज्ञात व्यक्तीने घरात प्रवेश करून त्यांचा गळा आवळून हत्या केली.

Buldana | वृध्देचा गळा आवळून खून, अंगावरील दागिन्यासह 62 हजारांचा ऐवज लंपास...
Image Credit source: tv9
Follow us
| Updated on: Aug 21, 2022 | 9:51 AM

बुलढाणा : खामगांव तालुक्यातील उमरा लासुरा येथील 65 वर्षीय महिलेचा गळा आवळून खून (Murder) करण्यात आलायं. हा घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडालीयं. अंगावरील आणि घरातील सोन्याचांदीचे दागिने तसेच गल्ल्यातील 9 हजार रूपये असा एकूण 62 हजार 200 रूपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना उघडकिस आलीयं. बुलढाणा (Buldana) जिल्ह्यातील खामगाव तालुक्यात येत असलेल्या उमरा येथील रहिवाशी कमलाबाई जनार्धन सोनोने ह्या दुपारी घरात एकट्याच असल्याचा गैरफायदा चोरट्यांनी घेऊन ही चोरी (Theft) आणि खून केलायं.

कमलाबाई सोनोने या घरामध्ये एकट्याच असतांना चोरट्यांचा घरात प्रवेश

खामगांव तालुक्यातील उमरा लासुरा येथील घटनेनंतर परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कमलाबाई सोनोने या घरामध्ये एकट्याच असतांना अज्ञात व्यक्तीने घरात प्रवेश करून त्यांचा गळा आवळून हत्या केली. त्यानंतर कमलाबाई यांच्या अंगावरील सोन्या चांदीचे दागिने आणि गल्ल्यातील नगदी 9 हजार रूपये असा एकूण 62 हजार 200 रूपयाचा ऐवज चोरून नेलाय.

हे सुद्धा वाचा

खून करत चोरट्यांनी पळावले अंगावरील दागिन्यासह 62 हजार

चोरी करून अज्ञात व्यक्तीने घटनास्थळावरून पळ काढला. ही घटना वृद्ध महिलेचे नातेवाईक घरी आल्यावर उघडकिस आली. याप्रकरणी जनार्धन रामचंद्र सोनोने यांनी खामगाव ग्रामीण पोलिस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात आरोपीविरूध्द भादंवि कलम 302,392 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलायं. तर संशयित चार आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास ग्रामीण पोलिस करत आहेत.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.