पगार न मिळाल्याने सटकली; ड्रायव्हरने एकापाठोपाठ पाच लक्झरी बसेस पेटवल्या

पगार न मिळाल्याने एका ड्रायव्हरचं टाळकं सटकल्याने त्याने एकापाठोपाठ पाच लक्झरी बसेस जाळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. (Buses Set On Fire in borivali, driver arrested)

पगार न मिळाल्याने सटकली; ड्रायव्हरने एकापाठोपाठ पाच लक्झरी बसेस पेटवल्या
Follow us
| Updated on: Jan 23, 2021 | 4:44 PM

मुंबई: पगार न मिळाल्याने एका ड्रायव्हरचं टाळकं सटकल्याने त्याने एकापाठोपाठ पाच लक्झरी बसेस जाळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आधी ही आग शॉर्टसर्किटने लागल्याचा अंदाज होता. मात्र अधिक तपास केल्यानंतर ड्रायव्हरनेच हा पराक्रम केल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे. (Buses Set On Fire in borivali, driver arrested)

बोरिवलीत पाच लक्झरी बसेसला आग लागली होती. या आगीत या पाचही लक्झरी बसेस जळून खाक झाल्या होत्या. सुरुवातीच्या चौकशीत ही आग शॉर्टसर्किटने लागली असावी अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. या प्रकरणी पोलिसात गुन्हाही दाखल करण्यात आला. पोलीस चौकशीतही ही आग शॉर्टसर्क्रिटने लागल्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता. मात्र, पोलिसांनी अधिक खोलवर तपास केला. यावेळी एमएचबी पोलिसांनी बसच्या चालक अजय रामपाल सारस्वतला ताब्यात घेतले. त्यानंतर त्याची सखोल चौकशी केली. त्यावेळी त्यानेच बसेसला आग लावल्याची कबुली दिली. पगार न मिळाल्याने पाच बसेसला आग लावल्याची कबुली या ड्रायव्हरने दिली.

अजय सारस्वतने गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली. त्याला कोर्टासमोर हजर करण्यात येणार आहे. दरम्यान, या पाचही बसेसची किंमत सुमारे 3 कोटी 30 लाख रुपये इतकी आहे. या पाचही बसेसचा विमा उतरविण्यात आलेला नसल्याचं वरिष्ठ पोलीस निरीक्षक पोपट येले यांनी सांगितलं. (Buses Set On Fire in borivali, driver arrested)

संबंधित बातम्या:

वर्दीवाले दरोडेखोर… गोरखपूरमध्ये पोलिसांकडून व्यापाऱ्यांची लूट

15 हजाराच्या बिलासाठी बाऊन्सरकडून फायरिंग, MMRDA चे काम बंद, बाऊन्सर ताब्यात

आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या पुतण्याला ईडीकडून अटक; पीएमसी घोटाळा भोवणार?

(Buses Set On Fire in borivali, driver arrested)

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.