सोलापुरात ट्रिपल तलाकचा पहिला गुन्हा दाखल, पत्नीला शिवीगाळ करत तलाक देणं महागात

पत्नीला शिवीगाळ करत तीन वेळा तलाक तलाक म्हटल्याप्रकरणी सोलापुरात पतीविरोधात गुन्हा (Case Against Husband) दाखल करण्यात आला आहे. यामध्ये पती एजाज शेख, सासरे इम्तियाज शेख आणि आयाज शेख या तिघांविरोधात (Solapur Police) गुन्हा दाखल झालाय.

सोलापुरात ट्रिपल तलाकचा पहिला गुन्हा दाखल, पत्नीला शिवीगाळ करत तलाक देणं महागात
सांगलीत चित्तथरारक पाठलाग करत पोलिसांनी पकडला चोरीला गेलेला ट्रॅक्टरImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Mar 26, 2022 | 10:26 PM

सोलापूर : तिहेरी तलाक (Triple Talaq) बंदीचा कायदा संमत झाल्यानंतर सोलापुरात पहिल्यांदाच गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पत्नीला शिवीगाळ करत तीन वेळा तलाक तलाक म्हटल्याप्रकरणी सोलापुरात पतीविरोधात गुन्हा (Case Against Husband) दाखल करण्यात आला आहे. यामध्ये पती एजाज शेख, सासरे इम्तियाज शेख आणि आयाज शेख या तिघांविरोधात (Solapur Police) गुन्हा दाखल झालाय. मुस्लिम महिला विवाह अधिकारी संरक्षण अधिनियम 2019 च्या कलम 4 प्रमाणे हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोलापुरातील सदर बझार पोलीस स्टेशनमध्ये हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिडीतेने आपला पती नांदवत नसल्याने पतीविरोधात सोलापुरातील महिला तक्रार निवारण समितीकडे तक्रारी अर्ज दाखल केला होता. त्याची चौकशी झाल्यानंतर कार्यालयाबाहेर आल्यावर रागात पत्नीला चापट मारून तीन वेळा तलाक म्हंटल्याचा आरोप करत सोलापुरातील सदर बझार पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला.

पत्नीशी वाद पतीला नडला

भादंवि 323, 504, 34 आणि मुस्लिम महिला विवाह अधिकार संरक्षण अधिनियम 2019 चे कलम 4 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिस निरीक्षक अश्विनी भोसले यांनी दिली. फिर्यादी महिलेचा मुळच्या सोलापुरातील एजाज शेख या तरुणाशी विवाह झाला होता. त्यानंतर नोकरीनिमित्त एजाज आणि त्याची पत्नी पुण्यात वास्तव्यास होते. त्यांना एक वर्षाचे मूलही झाले. मात्र त्यानंतर एजाज शेख याचे पिडीतेशी वाद झाले. त्यानंतर पिडित महिला आपल्या माहेरी सोलापुरात आली. मात्र हा वाद काही मिटला नाही. पतीने पत्नीला नांदवले नाही. त्यामुळे पिडितेने सोलापुरात महिला तक्रार निवारण समितीकडे तक्रार नोंदविली होती.

महिलेची पोलिसांत धाव

या सदर चौकशीचे कामकाज संपवून माघारी निघत असताना फिर्यादी महिलेचे सासरे इम्तियाज शेख आणि आयाज शेख यांनी मुलगा एजाज शेख याला, “तुझी बायको एवढ्या किरकोळ गोष्टीसाठी पोलिसात तक्रार दिलीय.” त्यामुळे चिडलेला पती एजाज शेख याने पिडीत पत्नीला चापट मारत शिवीगाळ करत तीन वेळा तलाकचा उल्लेख केला. त्यामुळे सदर घटनेविरोधात पिडीतेने आपले पती आणि सासरे यांच्यासह एकूण तीन जणांविरोधात गुन्हा नोंदवला. दरम्यान या घटनेची दखल घेत सोलापुरातील पहिला तिहेरी तलाकचा गुन्हा दाखल केला. त्यामुळे आता पुढे यावर काय कारवाई होते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

उल्हासनगरमधील दुकानदाराला चोरट्यांचा चकवा, गल्ल्यावर केला हात साफ, दोघांना बेड्या

चुलतीचं घर हडपण्यासाठी पठ्ठ्यानं थेट न्यायाधिशांचीच सही हाणली, बनावट शिक्काही छापला!

मोबाईलवर बसला म्हणून दिव्यांगाला बेदम मारहाण, कुठं घडला अमानुष प्रकार?

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.