दोन्ही कुटुंबांच्या संमतीने विवाह ठरला, नवरदेवाला चैन पडेना, लग्नाआधीच तरुणीवर बलात्कार

पीडित तरुणीची ओळख लग्न सोहळ्यात भिलाई-दुर्ग येथे राहणाऱ्या हिमांशू विश्वकर्मा या तरुणाशी झाली होती. त्याने ओळख वाढवून तरुणीशी मोबाईलवर बोलणे सुरू केले. तू मला आवडतेस, असं सांगत त्याने थेट तिला लग्नाची मागणी घातली

दोन्ही कुटुंबांच्या संमतीने विवाह ठरला, नवरदेवाला चैन पडेना, लग्नाआधीच तरुणीवर बलात्कार
छत्तीसगडमध्ये 7 वर्षांच्या मुलीवर अल्पवयीन मुलांकडून सामूहिक बलात्कार
Follow us
| Updated on: Feb 01, 2022 | 1:25 PM

रांची : छत्तीसगडमधील (Chhattisgarh) कोरबा येथे एका तरुणाने लग्नाच्या आमिषाने तरुणीवर बलात्कार (Rape on Pretext of Marriage) केल्याची घटना उघडकीस आली आहे. तक्रारीनंतर अवघ्या 24 तासांत पोलिसांनी आरोपीला दुर्ग जिल्ह्यातून अटक केली आहे. नातेवाईकाच्या लग्नात सहभागी होण्यासाठी गेलेल्या तरुणीला तिच्याच जातीतील तरुणाने लग्नाचा प्रस्ताव दिला होता. दोघांच्या कुटुंबांनी लग्नाला होकार दिला. यानंतर तरुणाने आपल्या भावी वधूवर बलात्कार केल्याचा आरोप आहे. मात्र दोन वर्षांनंतर त्याने लग्न करण्यास नकार दिला. तरुणीच्या तक्रारीनंतर कोरबा येथील माणिकपूर पोलिसांनी आरोपीला अटक केली. माणिकपूर चौकीचे प्रभारी उपनिरीक्षक मयंक मिश्रा यांनी सांगितले की, संबंधित तरुणी 4-5 वर्षांपूर्वी चंपा येथे तिच्या नातेवाईकाच्या घरी लग्न समारंभासाठी गेली असताना आरोपीने तिला आपल्या जाळ्यात ओढले होते.

काय आहे प्रकरण?

छत्तीसगडमध्ये राहणाऱ्या पीडित तरुणीची ओळख लग्न सोहळ्यात भिलाई-दुर्ग येथे राहणाऱ्या हिमांशू विश्वकर्मा या तरुणाशी झाली होती. त्याने ओळख वाढवून तरुणीशी मोबाईलवर बोलणे सुरू केले. तू मला आवडतेस, असं सांगत त्याने थेट तिला लग्नाची मागणी घातली. मुलीच्या घरच्यांशी फोनवरच बोलून त्याने लग्नाचा प्रस्ताव ठेवला, त्यांनीही लग्नाला होकार दिला. 14 सप्टेंबर 2019 रोजी हिमांशू फिरण्याच्या बहाण्याने मुलीच्या घरी पोहोचला, तिथे त्याने संधी साधून लवकरच लग्न करु, असे सांगून मुलीवर बलात्कार केला.

दोन वर्षांनी लग्नास नकार

तब्बल 9 महिन्यांनंतर तो पुन्हा तिच्या घरी पोहोचला. मुलीच्या आईला भेटल्यानंतर त्याने दुसऱ्या ठिकाणी तिचं लग्न न जुळवण्याची गळ घातली. त्यानंतर त्याने मुलीवर पुन्हा बलात्कार केला. असे करत दोन वर्षे उलटून गेली तरी तो लग्नाचे नाव काढत नव्हता. मुलीने दबाव आणताच त्याने स्पष्ट शब्दात तिला लग्नासाठी नकार दिला. त्यानंतर पीडितेने माणिकपूर चौकी गाठून तक्रार नोंदवली.

आरोपीला राहत्या घरी अटक

या प्रकरणी पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला. महिलांच्या गुन्ह्याशी संबंधित प्रकरण असल्याने, एसपी भोजराम पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांचे पथक दुर्गला पोहोचले आणि त्यांनी आरोपीच्या घराला घेराव घातला. त्यानंतर हिमांशूला त्याच्या राहत्या घरी अटक केली. त्याला कोर्टात हजर करून त्याची रवानगी कारागृहात करण्यात आली आहे.

संबंधित बातम्या :

अकरावीतील विद्यार्थिनीला हॉटेलवर बोलावलं, गुंगीचं औषध पाजून 22 वर्षीय तरुणाकडून बलात्कार

पतीच्या बर्थडेनिमित्त हॉटेलात जेवायला, पुण्यात विवाहितेवर पाच जणांचा गँगरेप

लग्नाच्या आमिषाने कॉन्स्टेबलचा तरुणीवर बलात्कार, गरोदर राहिल्याने अघोरी कृत्य

सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.